Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, June 23, 2017

    चालू घडामोडी (23 जून 2017)

    Views


    ध्वनिक्षेपकास शांतता क्षेत्रात परवानगी नाही :

    • 'शांतता क्षेत्रात' ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी न देण्याचा आदेश राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली.
       
    • सरकारने दिलेल्या या माहितीनंतर उच्च न्यायालयाने माहीम पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांवर काढलेली अवमान नोटीस रद्द केली.
       
    • 'शांतता क्षेत्रात' मोडणाऱ्या माहीम पोलीस ठाण्यातच उरूसदरम्यान ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली. त्यामुळे उच्च न्यायालयाने माहीम पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना व साहाय्यक पोलीस आयुक्तांना अवमान नोटीस बजावली. गेल्या सुनावणीत दोन्ही अधिकाऱ्यांनी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली.
       
    • मात्र राज्य सरकारकडून 'शांतता क्षेत्रात' ध्वनिक्षेपक लावू न देण्यासंदर्भात कोणतेही ठोस आश्वासन मिळत नसल्याने न्यायालयाने दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांची माफी स्वीकारली नाही.

    साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार ल.म. कडू यांना जाहीर :

    • मराठी साहित्यासाठीचा यंदाचा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार ल.म. कडू यांना तर युवा पुरस्कार राहुल कोसंबी यांना जाहीर झाला.
       
    • कडू यांना 'खारीच्या वाटा' या कादंबरीसाठी तर कोसंबी यांना 'उभा आडवा' या निबंधासाठी पुरस्कार मिळाला.
       
    • तसेच ताम्रपत्र व 50 हजार रुपये रोख असे या पुरस्कारांचे स्वरूप असून 14 नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात ते प्रदान करण्यात येतील.
       
    • कोकणी भाषेतील युवा पुरस्कार अमेय विश्राम नाईक यांना (मोग डॉट कॉम हा काव्यसंग्रह) आणि विन्सी क्वाड्रोस यांना (जादूचे पेतुल कादंबरीबालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
       
    • अकादमीचे अध्यक्ष प्रा. विश्वनाथ त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या गुवाहाटी येथे झालेल्या बैठकीत 24 भाषांमधील साहित्याची बालसाहित्य पुरस्कार व युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

    नासाकडुन सर्वात छोट्या उपग्रहाचे प्रक्षेपण :

    • तामिळनाडूतील विद्यार्थ्यांच्या एका संघाने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यांनी तयार केलेल्या जगातील सर्वात छोट्या उपग्रहाचे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाने प्रक्षेपण केले. या उपग्रहाचे वजन केवळ 64 ग्रॅम आहे.
       
    • तामिळनाडूच्या पल्लापट्टी येथील रिफाथ शारुक या विद्यार्थ्याने नासासाठी जगातील सर्वात छोटा आणि हलका उपग्रह तयार केला होता. त्याचे प्रक्षेपण करून रिफाथ व त्याच्या सहकाऱ्यांनी जागतिक अंतराळ क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला.
       
    • 'कलामसॅट' असे या उपग्रहाचे नाव आहे. भारताचे मिसाइल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावरून ते ठेवण्यात आले होते.
       
    • 21 जून रोजी नासाचे रॉकेट या उपग्रहासह अंतराळात झेपावल्यानंतर इतिहास घडला. भारतीय विद्यार्थ्यांचा अंतराळ प्रयोग नासाने स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ होती.

    धूत ट्रान्समिशन स्कॉटलंडची कंपनी खरेदी करणार :

    • जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी 'धूत ट्रान्समिशन' या कंपनीने स्कॉटलंडमधील 'टीएफसी केबल्स असेंब्लिज लिमिटेड' ही कंपनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
       
    • तसेच युरोपमध्ये व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने कंपनीचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
       
    • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या करारामुळे धूत ट्रान्समिशनला पश्चिम युरोपातील बाजारपेठेत अधिक जोरकसपणे प्रवेश करणे सुकर होईल. मुंबईस्थित गुंतवणूक बँक सिंगी अ‍ॅडव्हायजर्स हे या व्यवहाराचे सल्लागार आहेत.

    दिनविशेष :

    • 23 जून 1927 रोजी भारतीय नभोवाणी प्रारंभ झाला.