कोझिकोडे नगरपालिका ही केरळ मधील पहिलीवृद्धांसाठी अनुकूल अशी नगरपालिका ठरली आहे
केरळमधील कोझिकोड नगरपालिका ही राज्यातील पहिली वृद्धांसाठी अनुकूल अशी नगरपालिका ठरली आहे. हा दर्जा प्राप्त करण्याचा एक भाग म्हणून, नगरपालिकेनी 75 वार्ड मधील त्यांच्या 543 अंगणवाड्याच्या माध्यमातून शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा मूलभूत तपशील गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे. तसेच प्रत्येक अंगणवाडी अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे क्लब स्थापन करण्यात येईल. राज्यात एकूण लोकसंख्येच्या सुमारे एक तृतीयांश लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची आहे. ही योजना राज्य सरकारच्या वृद्ध कल्याण हेतूने सुरू करण्यात आलेल्या वयोमित्रम प्रकल्पाला जोडून आहे. नगरपालिकाने ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक, शारीरिक आणि भावनिक कल्याणाच्या उद्देशाने 1.75 कोटी रुपये राखीव ठेवले आहे.
मुंबई मध्ये 62 वा फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळापार पडला
62 वा फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळा मुंबई मध्ये पार पडला. आमीर खानच्या चित्रपट ‘दंगल’ ने सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार जिंकलेत. आलिया भट्ट ला उडता पंजाबसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.तसेच 'पीपल्स चॉईस’ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार ‘खामखा’ ला देण्यात आला आहे.
अमेरिकन अभिनेता डिक गौटीएर यांचे निधन
अमेरिकन अभिनेता डिक गौटीएर यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले आहे. ते लॉस एंजेल प्रदेशामधील रहिवासी होते.ब्रॉडवे म्यूजिकल बाय बाय बर्डी मधील गायकासारखा एल्विस ची भूमिका करणार्या आणि हायमेई द रोबोट मालिकेमधील भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी त्यांची कारकीर्द हास्य भूमिकेमधून सुरू केली. ते एक ‘कार्टूननिस्ट’ देखील होते. त्यांनी ट्रान्सफॉर्मर्स आणि स्मर्फ चित्रपटासाठी त्यांचा आवाज दिला होता.
नोटाबंदीनंतर, आगामी पाच वर्षांत GDP 6% ने वाढणार:CMIE
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनमी (CMIE) नुसार नोटाबंदीनंतर चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर हा 6% इतका असला तरीही, आगामी पाच वर्षात तितकाच म्हणजे 6% ने वाढण्याचे अपेक्षित आहे.तसेच, खासगी अंतिम उपभोग खर्च (Private final consumption expenditure -PFCE) हा सन 2016-17 मध्ये 5.5% इतका होण्याची अपेक्षा आहे, जो पुढील वर्षी 6.8% इतका होणार. सन 2015-16 साठी PFCE 7.5% इतका होता. तसेच, गुंतवणूक व GDP मधील प्रमाण हे सुमारे 27-28% राहण्याचे अपेक्षित आहे.
लोप पावलेल्या प्रजाती पुनर्संचयित होण्यास 8 दशलक्षवर्षांचा काळ लागणार: एक अभ्यास
अलीकडेच झालेल्या एका अभ्यासानुसार, प्रजाती नामशेष/लोप पावलेल्या प्रजाती पुनर्संचयित करण्यासाठी किमान आठ दशलक्ष वर्षांचा कालावधी लागणार, असे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेमधील स्टोनी ब्रूक विद्यापीठातील संशोधकानी हे विधान केले आहे.अभ्यासानुसार, फक्त एकट्या कॅरिबियन मध्येच, पानासारखे नाक असलेले वटवाघूळ यासारखे सस्तन प्राण्याच्या निम्म्यापेक्षा अधिक प्रजाती लोप पावलेल्या आहेत. यासाठी संशोधकांनी ‘आयलंड बायोजियोग्राफी’ नावाची पद्धत अवलंबलेली आहे. हा अभ्यास जर्नल नेचर इकोलॉंजी अँड एवल्यूशन मध्ये प्रकाशित झाला आहे
No comments:
Post a Comment