Current affairs | Evening News Marathi
Current affairs 12 May 2020 Marathi |
12 मे मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन: 12 मे
दरवर्षी 12 मे हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून पाळला जातो. यावर्षी हा दिन "नर्सेस: ए वॉइस टू लीड – नर्सिंग द वर्ल्ड टू हेल्थ" या संकल्पनेखाली पाळला गेला. परिचारिकांनी समाजात दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची परिचारिका अहोरात्र सेवा करीत असतात. रुग्णाला सकारात्मकता प्रदान करण्याचे, त्यांना आनंद देण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत असतात. कोविड-19 महामारीच्या संकटकाळातही परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातल्या जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत फिरणाऱ्या आणि आधुनिक परिचर्येचा पाया घालणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल (जन्म 12 मे 1820) यांचा जन्मदिवस ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश वंशाच्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका मानले जाते.
अटल पेन्शन योजनेच्या यशस्वी पाच वर्षांमध्ये 2.23 कोटी नावांची नोंदणी झाली
भारत सरकारची प्रमुख समाजिक सुरक्षा योजना ‘अटल पेन्शन योजना’ (APY) या निवृत्ती वेतन योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत.
आतापर्यंत या निवृत्ती वेतन योजनेच्या कक्षेत 2.23 कोटी कामगारांचा समावेश झाला आहे. ही योजना सुरु झाल्यानंतर 9 मे 2020 पर्यंत या योजनेच्या अंतर्गत एकूण 2,23,54,028 नावांची नोंदणी झाली आहे.
असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने 9 मे 2015 रोजी या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. ही योजना वयाच्या 60 वर्षानंतर सरकार किमान निवृत्ती वेतनाची हमी देते. या योजनेचे संचलन ‘निवृत्ती वेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) करते.
No comments:
Post a Comment