Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, May 11, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 11 May 2020 Marathi | 11 मे मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 11 May 2020  Marathi |
       11 मे  मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स



    राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन: 11 मे

    दरवर्षी 11 मे या दिवशी भारतात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करतात. या दिनानिमित्त, 11 मे 2020 रोजी नवी दिल्लीत ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला पुनर्चालना (RESTART)’ विषयक एक उच्चस्तरीय डिजिटल परिषद भरविण्यात आली. हा कार्यक्रम विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) आणि भारतीय उद्योग संघ (CII) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
    सन 1998 मध्ये 11 मे या दिवशी भारताने अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन शक्ती’ (पोखरण-2) ही दुसरी अणुचाचणी यशस्वी पार पाडली होती. ही चाचणी पोखरण (राजस्थान) या ठिकाणी आयोजित केली गेली होती. तसेच 11 मे 1998 रोजी ‘हंसा-3’ या पहिल्या स्वदेशी विमानाची बेंगळुरुमध्ये चाचणी घेण्यात आली होती. या ऐतिहासिक घटनांच्या स्मरणार्थ भारतात 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन पाळला जातो.

    'मिशन सागर': क्षेत्रीय मित्र राष्ट्रांच्या मदतीसाठी भारत सरकारची मोहीम

    कोविड-19 महामारीच्या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने इतर देशांपुढे मदतीचा हात दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'मिशन सागर' अंतर्गत भारतीय नौदलाचे ‘INS केसरी’ हे जहाज इतर देशांसाठी अन्न, आवश्यक औषधे अशी मदत सामुग्री घेवून 10 मे 2020 रोजी रवाना झाले.
    मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मॅडागास्कर आणि कॉमोरोस या देशांना मदत पुरवण्यासाठी जहाज रवाना झाले. या जहाजातून अन्नसामुग्री, कोविड-19 महामारीवर उपयोगी ठरत असलेल्या HCQ औषधाच्या गोळ्या आणि विशेष आयुर्वेदिक औषधे तसेच वैद्यकीय सहाय्यकांचे पथक पाठवण्यात आले. संपूर्ण क्षेत्रामध्ये अशी मोहीम चालवून परदेशांना असा मदतीचा हात पुढे करणारा भारत पहिला देश आहे.

    No comments:

    Post a Comment