Current affairs | Evening News Marathi
Current affairs 13 May 2020 Marathi |
13 मे मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
पंतप्रधानांकडून MSME क्षेत्राला 20 लक्ष कोटी रुपयांचा निधी जाहीर
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या देशाच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी 20 लक्ष कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. तसेच “आत्मनिर्भर भारत” अभियानाची घोषणा यावेळी केली गेली.
भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10 टक्के ठरणाऱ्या या निधीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी MSME उद्योग, ग्रामोद्योग आणि कुटीर उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण केल्या आहेत.
या निधीमुळे 11 कोटीपेक्षा अधिक लोकांना रोजगार देणाऱ्या आणि GDPच्या सुमारे 29 टक्के योगदान देणार्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राला आत्मनिर्भर बनण्यास मदत होणार.
एप्रिल 2020 मध्ये खतांच्या विक्रीत 71 टक्के वाढ झाली: राष्ट्रीय खते मर्यादित
रसायन व खते मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय खते मर्यादित (NFL) या सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमाने एप्रिल 2020 मध्ये खत विक्रीत 71 टक्के वाढ नोंदवली आहे.
एप्रिलमध्ये कोविड-19 लॉकडाऊनमुळे देशात कडक निर्बंध असूनही कंपनीने गेल्या वर्षीच्या याच कालावधीतल्या 2.12 लक्ष मेट्रिक टनच्या तुलनेत एप्रिल 2020 मध्ये 3.62 लक्ष मेट्रिक टन खत विक्री नोंदवली. या सर्व उत्पादनांसह कंपनीने 2019-20 या आर्थिक वर्षात 57 लक्ष मेट्रिक टन इतकी सर्वाधिक विक्री सलग पाचव्यांदा नोंदवली.
No comments:
Post a Comment