Current affairs | Evening News Marathi
Current affairs 8 April 2020 Marathi |
8 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
‘जन औषधी सुगम’ मोबाइल अॅप
कोविड-19 महामारीशी लढा देण्यासाठी प्रधानमंत्री जन औषधी केंद्राचे “स्वास्थ के सिपाही” या नावाने ओळखले जाणारे औषधविक्रेते भारत सरकारच्या प्रधानमंत्री जनौषधी परीयोजनेच्या (PMBJP) अंतर्गत रुग्णांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी अत्यावश्यक सेवा आणि औषधे वितरीत करीत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ते सरकारच्या सामाजिक अंतराच्या उपक्रमाला पाठबळ देत आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना निकटचे जनौषधी केंद्र शोधण्यासाठी आणि औषधांच्या किंमतीसह त्यांची उपलब्धता तपासण्यासाठी “जन औषधी सुगम” हे मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे.
बेरोजगारीचा दर वाढून 23.4 टक्के झाला: CMIE
सेंटर फॉर मॉनिटरींग इंडिया इकोनॉमी (CMIE) या संस्थेनी कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेवरील मंदीचा प्रभाव पाहता बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, मार्च महिन्याच्या मध्याकाळात भारतात बेरोजगारीचा दर वाढून 8.40 टक्क्यांवरून 23.4 टक्के झाला आहे.
तर शहरी भागात बेरोजगारीचा दर वाढून 30.90 टक्के इतका झाला आणि एकूणच हा दर 23.4 टक्क्यांवर पोहचलेला आहे.
No comments:
Post a Comment