Current affairs | Evening News Marathi
Current affairs 7 April 2020 Marathi |
7 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
राष्ट्रीय सागरी दिन: 5 एप्रिल
भारत देशात दरवर्षी 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन (National Maritime Day) पाळला जातो. राष्ट्रीय सागरी दिनाची ही 57 वी आवृत्ती आहे.
‘एस. एस. लॉयल्टी’ या भारताच्या स्वतःच्या पहिल्या वाफेवर चालणार्या जहाजाने 5 एप्रिल 1919 रोजी मुंबईकडून ब्रिटनकडे प्रवास सुरू करून इतिहास तयार केला होता. या घटनेच्या स्मृतीत हा दिवस साजरा करण्यात येतो.
महामारीविरुद्धच्या लढ्यासाठी एका वर्षासाठी सर्व खासदारांच्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय
कोविड-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत एका आर्थिक वर्षासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपालांसह सर्व खासदारांच्या पगारात 30 टक्के कपात करून तो निधी कोविड-19 महामारी विरुद्ध लढ्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, 2020-21 आणि 2021-22 या दोन आर्थिक वर्षासाठी खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी (MPLAD) स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निधी देशात कोविड-19 चा प्रतिकूल परिणाम आणि रोगामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न बळकट करण्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे.
No comments:
Post a Comment