Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, April 9, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 9 April 2020 Marathi | 9 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 9 April 2020  Marathi |
       9 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स

    चंद्रावरील NASA संस्थेचा ‘आर्टेमिस’ अंतराळ कार्यक्रम

    2024 सालापर्यंत पृथ्वीच्या चंद्रावर मानवाला जीवन जगण्यासाठी पाठविण्याची महत्वाकांक्षी योजना अमेरिका देशाच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या संस्थेनी आखली आहे. योजनेनुसार चंद्राच्या भूमीवर मानवाला राहण्यायोग्य एक तळ उभारले जाणार आहे, ज्याला “आर्टेमिस बेस कॅम्प” म्हटले जाणार.
    चंद्राचा शोध घेण्यासाठी मानवाने दीर्घ काळासाठी एखादी मोहीम राबविण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील प्रदेशात असलेल्या ‘शॅक्लेटॉन क्रेटर’च्या मध्यात हे तळ उभारले जाणार आहे, जिथे चार लोकांची व्यवस्था असणार आहे.

    महामारीच्या काळात सुरक्षित कार्य करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी TRIFED आणि UNICEF यांच्यात भागीदारी

    भारतातल्या आदिवासी जमातीचे लोक सुरक्षितपणे आपले काम चालू ठेवण्यासाठी भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) या संस्थेनी संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) या आंतरराष्ट्रीय संघटनेबरोबर भागीदारी केली आहे. भागीदारीनुसार, UNICEF बचत गटांना डिजिटल मल्टीमीडिया सामग्रीच्या रूपात माहिती प्रसारित करण्यासाठी आवश्यक ती मदत देणार.

    कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्याविषयीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी बचत गटांसाठी (SHG) डिजिटल मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक डिजिटल संपर्क धोरण’ विकसित करणे, हे या भागीदारीचे लक्ष्य आहे.

    No comments:

    Post a Comment