Current affairs | Evening News Marathi
Current affairs 6 April 2020 Marathi |
6 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
UNGAने कोरोना महामारीशी लढा देण्याकरिता WHOचा जागतिक सहकार्याचा प्रस्ताव मंजूर केला
जागतिक आरोग्य संघटनेनी ‘ग्लोबल सॉलिडरिटी टू फाइट द कोरोनावायरस डिसीज 2019 (कोविड-19)’ विषयक ठराव संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत मांडला होता. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ महासभेनी (UNGA) एकमताने मान्यता दिली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) महामारीशी लढा देण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून केला जाणार आहे. 188 देशांनी हा ठराव स्वीकारला.
ठरावात माहिती, वैज्ञानिक ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करून तसेच जागतिक आरोग्य संघटनेनी सुचवलेल्या संबंधित मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करून महामारीला रोखणे, कमी करणे आणि पराभूत करण्यासाठी गहन आंतरराष्ट्रीय सहकार्याची मागणी केली गेली आहे.
जागतिक आरोग्य दिन: 7 एप्रिल
दरवर्षी 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक आरोग्य दिन’ पाळला जातो.
यावर्षी म्हणजेच 2020 साली “सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईव्ह्ज” ही या दिनाची संकल्पना आहे.
यावर्षी जागतिक आरोग्य दिन आरोग्य सेवा पुरविण्यात सर्व परिचारिका आणि सुईणींची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका जगापुढे मांडत आहे आणि त्यांचे कार्यदल बळकट करण्यासाठी जगाला आवाहन करीत आहे.
No comments:
Post a Comment