Current affairs | Evening News Marathi
Current affairs 15 April 2020 Marathi |
15 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
कोविड-19 रुग्णांपासून नमुना गोळा करण्यासाठी DRDOने एक ‘कक्ष’ विकसित केले
संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या अंतर्गत येणारी हैदराबादची संरक्षण संशोधन व विकास प्रयोगशाळा (DRDL) येथे ‘कोविड-19 रुग्णांपासून नमुने गोळा करण्यासाठी “कोविड सॅम्पल कलेक्शन कियोस्क (COVSACK)” विकसित करण्यात आले आहे. हैदराबादच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या चिकित्सकांच्या सहकार्याने हे कक्ष विकसित करण्यात आले आहे.
हे कक्ष स्वच्छ करण्यासाठी मानवी मदतीची गरज नाही, ते आपोआप निर्जंतुक केले जाऊ शकते. रुग्ण या कक्षातून बाहेर पडल्यावर, चार नोझल्समधून निर्जंतुक द्रव्याचा फवारा 70 सेकंदांसाठी कक्षात केला जातो. त्यानंतर पाणी आणि अतिनील किरणांद्वारे त्याला अधिक निर्जंतुक केले जाते.
शालेय विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायामाची प्रात्यक्षिके देण्यासाठी फिट इंडिया आणि CBSE यांच्यात भागीदारी
कोविड-19 महामारीच्या वेळी बंदीच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना दिलेल्या तंदुरुस्त रहाण्याच्या आणि रोगप्रतिबंधक शक्ति वाढवण्याच्या आवाहनानुसार 'फिट इंडिया चळवळ' आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) विद्यार्थांच्या तंदुरुस्तीसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
भारत सरकारच्या फिट इंडिया चळवळीच्या ‘फिट इंडिया अँक्टिव्ह डे प्रोग्राम’ मधून व्यायामाची प्रात्यक्षिके प्रदान केली जातात. आता विद्यार्थ्यांना सुदृढ राहण्यासाठी नव्या कार्यक्रमाच्या मालिकेची सुरुवात फिट इंडिया चळवळीद्वारे करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment