Current affairs | Evening News Marathi
Current affairs 14 April 2020 Marathi |
14 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
ऋषिकेशच्या AIIMS संस्थेनी भारतातली पहिली ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’ विकसित केली
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BHEL) या सरकारी कंपनीच्या सहकार्याने ऋषिकेशच्या अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्थेनी (AIIMS) भारतातली पहिली ‘दूरस्थ आरोग्य संनियंत्रण प्रणाली’ विकसित केली आहे. या प्रणालीसाठी एक संकेतस्थळ आणि मोबाईल अॅप्लिकेशन देखील तयार करण्यात आले आहे.
या सुविधेमुळे रुग्णाच्या शरीराचे तापमान आणि इतर बाबी प्रत्यक्षात उपस्थित नसताना चिकित्सक आपल्या ठिकाणीच मिळवू शकतील, ज्यामुळे आजारांचा संसर्ग टाळता येणार.
पहिला “जागतिक चगास रोग दिन”: 14 एप्रिल 2020
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नेतृत्वात जागतिक समुदायाने 14 एप्रिल 2020 रोजी पहिला ‘जागतिक चगास रोग दिन’ पाळला. चगास रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि रोगाला आळा घालण्यासाठी आवश्यक संसाधने वाढविणे हा या दिनाचा हेतू आहे.
संक्रमित रक्त-शोषक ट्रायटोमाइन किड्याच्या मल-मूत्राच्या संपर्कात आल्यामुळे त्यातले ‘टी. क्रूझी’ परजीवी शरीरात प्रवेश करतात. ट्रायटोमाइन किडे सामान्यत: भिंतीतल्या किंवा छताच्या भेगांमध्ये राहतात आणि त्यांची संख्या ग्रामीण किंवा उपनगर भागात असलेल्या कमकुवत घरांमध्ये अधिक दिसून येते. सर्वसाधारणपणे ते दिवसा लपून असतात आणि रात्री सक्रिय होतात. ते मानवी रक्तावर जीविका करतात.
1909 साली ब्राझीलमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. त्यावेळी डॉ. कार्लोस रिबेरो जस्टिनिओ चगास यांनी या आजाराचे निदान केले होते.
No comments:
Post a Comment