Current affairs | Evening News Marathi
Current affairs 16 April 2020 Marathi |
16 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
द्वितीय ‘जी-20 वित्त मंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची बैठक’ संपन्न
15 एप्रिल 2020 रोजी सौदी अरबच्या अध्यक्षतेखाली झालेल्या द्वितीय जी-20 वित्तमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांच्या बैठकीच्या आभासी सत्रामध्ये केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सहभाग घेतला होता. बैठकीत कोविड-19 महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक दृष्टिकोनाबाबत चर्चा केली गेली.
जी-20 सदस्यांनी जी-20 नेत्यांच्या निर्देशानुसार जीवनाचे रक्षण करण्यासाठी, लोकांचे रोजगार आणि उत्पन्नाचे रक्षण करण्यासाठी, आत्मविश्वास पुन्हा आणण्यासाठी, आर्थिक स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी, विकासाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी, मदतीची गरज असलेल्या देशांना मदत देण्यासाठी, सार्वजनिक आरोग्याविषयक समन्वय, वित्तीय उपाययोजना आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे कमी करण्याबाबत कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
क्षेत्र निहाय धोरणांसाठी मदत होणारे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे ‘एकीकृत भू-स्थानाधारित मंच’
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने ‘एकीकृत भू-स्थानाधारित मंच’ (Integrated Geospatial Platform) निर्माण केला आहे. उपलब्ध भौगोलिक माहिती, विश्लेषणात्मक साधने यातून याची निर्मिती करण्यात आली आहे. कोविड-19 महामारीच्या काळात निर्णय घेण्यात आणि विभाग-केन्द्री धोरण ठरवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
सुरवातीला या मंचाद्वारे राज्य आणि केंद्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य सेवा यंत्रणा बळकट करणे अपेक्षित आहे. त्यानंतर नागरिक आणि आरोग्य, सामाजिक-आर्थिक आणि उपजीविकेसंदर्भातली आव्हाने या संदर्भात मदत करणाऱ्या संस्थाना उपयुक्त भू-स्थानाधारित माहिती हा मंच परवू शकणार. हा एकीकृत मंच कोविड-19 संदर्भात देशाचे आरोग्य आपत्कालीन व्यवस्थापन बळकट करणार.
No comments:
Post a Comment