Current affairs | Evening News Marathi
Current affairs 13 April 2020 Marathi |
13 एप्रिल मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
कोविड-19 संदर्भात मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नवे “युक्ती” संकेतस्थळ
A new "trick" website of the Ministry of Manpower Development in the Covid-19 context
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल “निशंक” यांच्या हस्ते नवे ‘YUKTI’ (यंग इंडिया कॉम्बीटिंग कोविड विथ नॉलेज, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन) संकेतस्थळ आणि डॅशबोर्डचे उद्घाटन करण्यात आले आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर हाती घेतलेले उपक्रम आणि उपाययोजनांची नोंद ठेवणे तसेच त्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या व्यासपीठावर सर्व शिक्षणसंस्थांच्या विविध उपक्रम आणि संशोधनाची माहिती देण्यात आली आहे.
WADA संस्थेच्या नेतृत्वात 9 एप्रिलला 'प्ले ट्रू' दिन साजरा
Celebrate 'Play True' day on April 9 led by WADA organization
9 एप्रिल 2020 रोजी जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था (WADA) यांच्यावतीने ‘प्ले सेफ ऑन प्ले ट्रू डे 2020’ कार्यक्रम आयोजित केला गेला होता.
संलग्न राष्ट्रीय संस्थांच्या सहभागाने 2014 सालापासून दरवर्षी 'प्ले ट्रू' दिवस पाळला जात आहे. उत्तेजक द्रव्य रहित क्रिडा विश्व तयार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हा दिन पाळला जातो.
No comments:
Post a Comment