Current affairs | Evening News Marathi
Current affairs 30 January 2020 Marathi |
30 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
गर्भावस्थेच्या 20 ते 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करता येणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘वैद्यकीय गर्भपात (दुरूस्ती) विधेयक-2020’ याला मंजुरी देण्यात आली आहे. याद्वारे ‘वैद्यकीय गर्भपात कायदा-1971’ यामध्ये दुरूस्ती केली जाणार आहे. गर्भावस्थेच्या 20 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी एका डॉक्टरचा आणि गर्भावस्थेच्या 20 ते 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यासाठी दोन डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक राहणार.
काही विशिष्ट घटनांच्या बाबतीत महिलांसाठी गर्भपाताच्या मुदतीची मर्यादा 20 वरून 24 आठवडे करण्यात आली आहे. अश्या महिलांमध्ये बलात्कार पिडीत, दिव्यांग महिला, अल्पवयीन यासह इतर महिलांचा समावेश राहणार.
NITI आयोगाने ‘आकांक्षी’ जिल्ह्यांसाठी क्रमवारीता जाहीर केली
आरोग्य व पोषण, कृषी व जलसंपदा, आर्थिक समावेशन, शिक्षण, कौशल्य विकास आणि मूलभूत पायाभूत सुविधा या सहा विकासात्मक क्षेत्रात 1 जून 2018 ते 31 ऑक्टोबर 2018 या काळात केलेल्या प्रगतीच्या आधारे NITI आयोगाकडून ‘आकांक्षी’ जिल्ह्यांसाठी द्वितीय क्रमवारीता (डेल्टा रँकिंग) जाहीर करण्यात आली आहे.
एकूणच, सर्वात सुधारित जिल्हा म्हणून तामिळनाडूच्या विरुधुनगर याला पहिला क्रमांक मिळालेला आहे. सर्वात सुधारित जिल्ह्यांमध्ये विरुधुनगरच्या पाठोपाठ न्युपाडा (ओडिशा), सिद्धार्थनगर (उत्तरप्रदेश), औरंगाबाद (बिहार), कोरापुट (ओडिशा) यांचा क्रम लागतो आहे.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment