Current affairs | Evening News Marathi
Current affairs 29 January 2020 Marathi |
29 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
फक्त 10 रुपयांमध्ये “शिवभोजन” योजना: महाराष्ट्र सरकार
राज्यातल्या दरिद्री आणि गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी राज्यात 26 जानेवारी 2020 पासून करण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने चालू वित्तीय वर्षात उर्वरित तिमाहीसाठी 6.48 कोटी रुपयांची रक्कम अनुदान म्हणून उपलब्ध करून दिली आहे.
योजनेमध्ये थाळीची किंमत शहरी भागात प्रती थाळी 50 तर ग्रामीण भागामध्ये 35 रुपये राहणार आहे. ज्यामध्ये केवळ 10 रुपये ग्राहकांकडून घेतले जाणार आणि उर्वरित रक्कम सरकार अनुदान स्वरुपात प्रदान करणार.
आफ्रिकेतला चित्ता भारतीय जंगलात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
दक्षिण आफ्रिकेतला चित्ता हा वन्यजीव भारतात आणण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिली आहे.
भारतातल्या योग्य अधिवासात आफ्रिकेतला चित्ता आणता येणार आहे. आपल्या चपळतेसाठी ओळखला जाणारा चित्ता भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
भारतीय चित्ता देशातून जवळपास नामशेष झाला आहे, त्यामुळे आफ्रिकेतल्या नामिबिया देशामधून चित्ता आणण्याची परवानगी मागणारी याचिका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (NTCA) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment