Current affairs | Evening News Marathi
Current affairs 28 January 2020 Marathi |
28 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
2024 सालापर्यंत सर्व रेलगाड्या वीजेवर धावणार: भारतीय रेल्वे
इंधनावर होणारा प्रचंड खर्च आणि पर्यावरणाचे नुकसान पाहता 2024 या वर्षापर्यंत सर्वच रेलगाड्या वीजेवर चालविण्याचे ध्येय भारतीय रेल्वेनी निश्चित केले आहे. ते साध्य केल्यानंतर 2030 सालापर्यंत संपूर्णपणे (अक्षय ऊर्जेद्वारे) हरित रेल्वे जाळ्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आज, अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारतात जगातले चौथे सर्वात मोठे रेल्वे जाळे आहे. या जाळ्यात सुमारे 7300 स्थानकांना जोडणारा 67,368 किलोमीटर एवढ्या एकूण लांबीचा लोहमार्ग पसरलेला आहे. त्यावर 13 हजार प्रवासी रेलगाड्या धावतात आणि दररोज 23 दशलक्षपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात.
कोलकात्यात हुगळी नदीखाली ‘पाण्याखालून धावणारी देशातली पहिली मेट्रो’
पाण्याखालून धावणारी देशातल्या पहिल्या मेट्रो सेवेचे बांधकाम आता शेवटच्या टप्प्यावर आले आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये हुगळी नदीखालून ही मेट्रो धावणार आहे.
देशातली पहिली पाण्याखालून धावणारी रेलगाडी ‘सॉल्टलेक सेक्टर-5 आणि हावडा मैदान’ यादरम्यान धावणार आहे. तसेच हा रेल्वेमार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येत आहे. त्यातला पहिला टप्पा 2022 सालापर्यंत प्रवाशांसाठी खुला केला जाण्याची अपेक्षा आहे.
नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब असून ती नदीच्या तळापासून 30 मीटरच्या खोलीवर आहे. नदीखालून रेलगाडीला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment