Current affairs | Evening News Marathi
Current affairs 19 January 2020 Marathi |
19 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
परदेशातून सुवर्ण खरेदी करण्यात रिझर्व्ह बँक सहाव्या क्रमांकावर
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) इतर देशांच्या प्रमुख केंद्रीय बँकांच्या तुलनेत परदेशातून सुवर्ण खरेदी करण्यात सहावा सर्व मोठा खरेदीदार ठरला आहे. RBIने भारत सरकारच्या ‘सार्वभौम सुवर्ण बाँड’साठी 2019 या वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांमध्ये 25.2 टन खरेदी केले होते त्यामुळे RBI सहाव्या क्रमांकाचा खरेदीदार झाला.
2019 या साली भारताच्या आधी अनुक्रमे चीन, रशिया, कझाकस्तान, तुर्की, पोलंड या देशांच्या केंद्रीय बँका परदेशातून सुवर्ण खरेदी करण्यात सर्वात मोठे खरेदीदार ठरले.
RBI कडे 625.2 टन सुवर्ण (सोने) आहे आणि ते प्रमाण परकीय चलन साठ्याच्या 6.6 टक्के आहे.
भारताचा ‘सेसेमिक हझार्ड मायक्रोझोनेशन प्रोजेक्ट’
भारत सरकारच्या भू-शास्त्र मंत्रालयाने आवश्यक त्या उपाययोजना करून भूकंपामुळे येणार्या आपत्तींना कमी करण्यासाठी देशभरात ‘सेसेमिक हझार्ड मायक्रोझोनेशन प्रोजेक्ट’ नावाचा प्रकल्प राबवत आहे.
‘सेसेमिक हझार्ड मायक्रोझोनेशन’ ही भूगर्भीय आणि भूभौतिकीय वैशिष्ट्यांच्या आधारे भूकंप-प्रवण क्षेत्र ओळखण्याची एक प्रक्रिया आहे.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment