Current affairs | Evening News Marathi
Current affairs 18 January 2020 Marathi |
18 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाने पाचवा वर्धापन दिन साजरा केला
15 जानेवारी 2020 रोजी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) यांनी त्यांचा पाचवा वर्धापन दिन नवी दिल्लीत साजरा केला.
केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) हे भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाचे एक वैधानिक मंडळ आहे. हे मंडळ भारतीय बालकांना दत्तक घेण्याकरता केंद्रीय मंडळाच्या स्वरुपात कार्य करते तसेच देशांतर्गत आणि आंतर-देशांतर्गत दत्तक घेण्याच्या कार्यावरही देखरेख आणि नियंत्रणास जबाबदार आहे.
अरुणाचल प्रदेश विधानसभेनी नवीन बोधचिन्ह स्वीकारले
अरुणाचल प्रदेश राज्याच्या विधानसभेनी नवीन बोधचिन्हाचा स्वीकार केला आहे, जो राज्याची विशिष्ट ओळख आणि संस्कृती प्रतिबिंबित करतो.
नवीन बोधचिन्हामध्ये राष्ट्रीय चिन्ह आणि फॉक्सटेल ऑर्किड (राइन्कोस्टाईलिस रेटुसा) हे राज्य पुष्प आहे.
No comments:
Post a Comment