Current affairs | Evening News Marathi
Current affairs 2 January 2020 Marathi |
2 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
UNICEFचा “जागतिक लोकसंख्या अहवाल”
संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) यांचा “जागतिक लोकसंख्या अहवाल” प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अहवालात असे म्हटले आहे की 2027 सालापर्यंत जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारत चीनला मागे टाकणार.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2020 रोजी अंदाजे 67,385 नवजात बाळ भारतात जन्मले जो की एक विक्रम झाला आहे. त्या दिवशी जगात जन्मलेल्या अंदाजे 392,078 बाळांपैकी 17% भारतात जन्माला आली. यांपैकी एक चतुर्थांश नवजात बाळ ही दक्षिण आशियामध्ये जन्माला आली आहेत.
निवडणूक आयोगाची नवी यंत्रणा: “पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)”
अर्जदारांना अर्जांची स्थिती जाणून घेता यावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) “पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)” नावाची नवी यंत्रणा कार्यरत केली आहे.
1 जानेवारी 2020 पासून याबाबतचे नवीन नियम लागू झाले. त्याच्या अंतर्गत, 1 जानेवारीपासून राजकीय निवडणूक पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज करणारे अर्जदार विनंतीची प्रगती मागू शकतात आणि SMS व ई-मेलद्वारे स्थिती प्राप्त करू शकण्यास सक्षम झाले आहेत.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment