Current affairs | Evening News Marathi
Current affairs 1January 2020 Marathi |
1 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
दुसरी तेजस एक्सप्रेस अहमदाबाद-मुंबई मार्गावर धावणार
देशातली पहिली खासगी रेलगाडी दिल्ली-लखनऊ या मार्गावर सुरू झाल्यानंतर आता मुंबई-अहमदाबाद मार्गावर दुसरी ‘तेजस’ एक्सप्रेस 17 जानेवारी 2020 पासून प्रवाशांच्या सेवेसाठी तयार असणार आहे.
तेजस एक्सप्रेस
- या रेलगाडीचे व्यवस्थापन खासगी तत्त्वावर राखले जाते.
- या गाडीमध्ये प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या सुखसोयी व आरामदायी व्यवस्था आहे. तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना वाचनासाठी वैयक्तिक रीडिंग लाइट, मोफत वायफाय, प्रवाशांच्या सुविधेसाठी कर्मचारी, बायोटॉयलेट, स्वयंचलित दरवाजे, आरामदायी जागा आदी सुविधा उपलब्ध आहेत.
- इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) यांच्यावतीने तेजस एक्सप्रेस चालविण्यात येत आहे. केंद्र सरकारने IRCTC ला ही रेलगाडी भाडेतत्त्वावर दिली आहे.
- पहिली तेजस एक्सप्रेस दिल्ली-लखनऊ मार्गावर ऑक्टोबर 2019 मध्ये धावली.
- आठवड्यातला गुरुवार वगळता इतर सर्व दिवशी तेजस एक्सप्रेस धावणार.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ही रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत भारतीय रेल्वेची उपकंपनी आहे, जी भारतीय रेल्वेचे खानपान, पर्यटन आणि ऑनलाईन तिकिटे या कार्यांची हाताळणी करते. ‘लाइफलाइन ऑफ द नेशन’ हे IRCTCचे घोषवाक्य आहे. दिनांक 27 सप्टेंबर 1999 रोजी IRCTCची स्थापना झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
“फौस्टा” या नावाच्या जगातल्या सर्वात वयोवृद्ध काळ्या गेंड्याचे टांझानियात निधन झाले
टांझानिया या देशातल्या ‘नगोरोंगोरो संवर्धन प्रकल्प’ येथे ठेवण्यात आलेल्या “फौस्टा” या नावाच्या आतापर्यंतच्या जगातल्या सर्वात वयोवृद्ध काळ्या गेंड्याचा 27 डिसेंबर 2019 रोजी नैसर्गिक मृत्यू झाला. ती एक दोन-शिंगी काळी मादी गेंडा होती. ती 57 वर्षांची होती.ही मादी गेंडा पहिल्यांदा 1965 साली दार एस सलाम विद्यापीठाच्या वैज्ञानिकांना नगोरोंगोरो विवराजवळ आढळली होती. वन्यपशूंच्या हल्ल्यांनंतर गंभीर जखमी अवस्थेत या गेंड्याला 2016 साली अभयारण्यात ठेवण्यात आले होते.
गेंड्याचे आयुष्य जंगलात साधारणपणे 37 ते 43 वर्षे या वयोगटादरम्यान असते आणि ते अभयारण्यात 50 वर्ष व त्यापेक्षा अधिक काळ जगू शकतात.
गेल्याच महिन्यात फ्रान्समध्ये ‘सॅना’ नावाचा एक पांढरा गेंडा मृत्यूमुखी पडला ज्याचा वय 55 वर्ष होते आणि ज्याला सर्वात वयोवृद्ध गेंडा मानले गेले होते. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (International Union for Conservation of Nature -IUCN) यांच्या धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या यादीत गेंड्याला ‘नामशेष’ होण्याच्या मार्गावर असलेला प्राणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. गेल्याच वर्षी, जगातल्या शेवटच्या पांढर्या नर गेंड्याचे केनियामध्ये मृत्यू झाला.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment