Current affairs | Evening News Marathi
Current affairs 8 November Marathi |
8 नोव्हेंबर 2019 करेंट अफेयर्स
‘टायगर ट्रायम्फ 2019’: भारत आणि अमेरिका यांच्यातला त्रि-दलीय लष्करी सराव
'Tiger Triumph 2019': Trilateral military exercises between India and the US
13 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत आंध्रप्रदेशाच्या विशाखापट्टणम आणि काकीनाडा या शहरांच्या जवळ भारत आणि अमेरिका यांच्यातला पहिला त्रि-दलीय लष्करी सराव होणार आहे. ‘टायगर ट्रायम्फ 2019’ हे या सरावाचे नाव आहे.
या सरावात सुमारे 12 हजार भारतीय आणि 500 अमेरिकेचे भू-सैनिक, नौ-सैनिक आणि हवाई सैनिक भाग घेणार आहेत.
या सरावात आपत्ती निवारण आणि मानवतावादी मदत या घटकांवर भर दिला जाणार आहे. शिवाय दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये सामंजस्य वाढविण्यावर भर दिला जाणार आहे आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यात येणार आहे.
संयुक्त राज्ये अमेरिका (USA)
उत्तर अमेरिका खंडातला संयुक्त राज्ये अमेरिका (अमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा संयुक्त संस्थाने – USA/US) हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका या नावाने ओळखला जातो. देशातली प्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. केंद्रीय स्तरावरचा राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो. भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत.
अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' येथे आहे आणि अमेरिकन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.
19 नोव्हेंबर 1493 रोजी ख्रिस्तोफर कोलंबस याला अमेरिकेचा शोध लागला. त्यानंतर ब्रिटिश आणि फ्रान्स राजवटींनी त्या प्रदेशात आपले वर्चस्व वाढवले. शेवटी 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेला ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळाले.
ब्राझीलमध्ये 11 व्या BRICS शिखर परिषदेचे आयोजन
The 11th BRICS Summit in Brazil organized
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 नोव्हेंबर आणि 14 नोव्हेंबर रोजी ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात ‘BRICS शिखर परिषद 2019’ मध्ये भाग घेणार आहेत. ही परिषद ब्राझिलिया या शहरात भरणार आहे.
ही परिषद 'इकोनॉमिक ग्रोथ फॉर अॅन इनोव्हेटिव्ह फ्युचर' या संकल्पनेखाली भरविण्यात येणार आहेत.
परिषदेदरम्यान घडणार्या काही ठळक घटनांचा आढावा
- परिषदेत व्यापार, गुंतवणूक आणि दहशतवाद विरोधात लढा अशा महत्त्वाच्या बाबींवर विचारविनिमय करण्याची अपेक्षित आहे. सहभागी देशांचे नेते BRICS समाजाच्या आर्थिक विकासासाठी आंतर-BRICS सहकार्याबाबत चर्चा करणार आहेत.
- ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो यांच्या अध्यक्षतेत ‘BRICS बिजनेस फोरम’ हा कार्यक्रम शेवटच्या दिवशी आयोजित केला जाणार आहे.
- शिवाय नेते ‘BRICS बिझनेस कौन्सिल’ सोबत बैठक घेणार आहेत.
- व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन विषयक BRICS देशांच्या संस्थांच्या दरम्यान एक BRICS सामंजस्य करार केला जाणार आहे.
- ‘विमेन बिझनेस अलायन्स’ची स्थापना करण्याविषयीचा करार होण्याचे अपेक्षित आहे.
- ‘i-BRICS’ (इनोव्हेशन BRICS नेटवर्क) याचे अनावरण करण्यात येणार आहे, ज्यामधून विज्ञान उद्याने, संगोपन केंद्र, प्रवेगक अश्या संशोधन संस्थांचे जाळे तयार करण्यात येणार.
BRICS विषयी
BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली या समूहाची स्थापना झाली. 2011 मध्ये BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले. रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 2009 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.
सध्या या समूहाचे अध्यक्षपद ब्राझीलकडे आहेत.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment