Current affairs | Evening News Marathi
Current affairs 19 November Marathi |
19 नोव्हेंबर 2019 करेंट अफेयर्स
किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS) याच्या वार्षिक बैठकीचे नवी दिल्लीत आयोजन
हिर्यांच्या उद्योगांच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेली जागतिक संघटना ‘किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम’ (KPCS) याची वर्षातली शेवटची बैठक 18 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2019 या काळात नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे.भारत ‘किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम’ (KPCS) याच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे आणि सन 2019 साठी ‘किंबर्ली प्रोसेस’ याचा अध्यक्ष आहे. भारताच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव बी. बी. स्वाइन हे “KP चेअर” तर वाणिज्य विभागाचे आर्थिक सल्लागार रूपा दत्ता या “KP फोकल पॉईंट” आहेत.
22 नोव्हेंबर 2019 रोजी बैठकीच्या शेवटी भारत KPचे अध्यक्षपद रशियाकडे सोपविणार आहे.
पहिल्या ‘AIBA क्रिडापटू आयोग’वर एल. सरिता देवी ह्यांची सदस्य म्हणून निवड झाली
आशियाई विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघाने (AIBA) प्रथमच क्रिडापटू आयोगावर पाच खंडांमधून सहा लोकांची निवड केली आहे.त्यात, भारतीय महिला मुष्टियोद्धा एल. सरिता देवी ह्यांची ‘AIBA क्रिडापटू आयोग’ (AIBA अॅथलीट्स कमिशन) याचा सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
AIBA क्रिडापटू आयोगामध्ये आशिया, ओशिनिया, युरोप, अमेरिका आणि आफ्रिका या पाच खंडांमधून प्रत्येकी एक पुरुष आणि एक महिला अश्या दोघांचा समावेश केला जात आहे.
No comments:
Post a Comment