Current affairs | Evening News MarathiCurrent affairs 20 November Marathi | 20 नोव्हेंबर 2019 करेंट अफेयर्स
IMD वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2019
स्वित्झर्लंडच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) या संस्थेकडून ‘IMD वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2019’ या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल देशात प्रतिभावंत व्यक्तित्व तयार करण्यासाठीच्या हेतूने गुंतवणूक व विकास, मागणी आणि तत्परता या तीन मुख्य श्रेणीमध्ये देशांनी केलेल्या कामगिरीवर आधारित आहे.
ठळक बाबी
- टॅलेंट रँकिंगमध्ये स्वित्झर्लंड अग्रस्थानी आहे. घटक पातळीवर, गुंतवणूक व विकास तसेच तत्परता यात त्याचा द्वितीय क्रमांक आणि मागणीमध्ये त्याचा प्रथम क्रमांक आहे.
- यादीतले प्रथम दहा देश – स्वित्झर्लंड, डेन्मार्क, स्वीडन, ऑस्ट्रिया, लक्झेमबर्ग, नॉर्वे, आईसलँड, फिनलँड, नेदरलँड्स, सिंगापूर.
- यादीतल्या पहिल्या दहा राष्ट्रांच्या बाहेर, सर्वात मोठी वाढ तायवान, चीन या देशांनी नोंदवलेली आहे आणि ते 7 स्थानांनी वरती चढत 20 व्या स्थानावर आले आहेत. तसेच लिथुआनिया 8 स्थानांची उडी घेत 28 व्या क्रमांकावर तर फिलिपिन्स 6 स्थानांची उडी घेत 49 व्या क्रमांकावर आणि कोलंबिया 6 स्थानांची उडी घेत 54 व्या क्रमांकावर आहे.
- कॅनडाने अधिक तीव्र घसरणीचा अनुभव घेतला आहे आणि ते 7 स्थानांनी खाली घसरत 13 व्या क्रमांकावर आले आहे. तर पोर्तुगाल गेल्या वर्षीच्या 17 व्या स्थानावरून यावर्षी 23 व्या स्थानावर आले आहे, जापान 6 स्थानांनी खाली येत 35 व्या स्थानी, जॉर्डन 10 स्थानांनी खाली येत 51 व्या स्थानी, टर्की 7 स्थानांनी खाली येत 58 व्या स्थानी आहे.
- भारत 53 व्या स्थानावरुन 59 व्या स्थानावर घसरला आहे. मुख्यताः मागणीच्या घटकाच्या संदर्भातल्या कामगिरीच्या परिणामामुळे भारताची घसरण झाली. प्रदूषणाच्या (कण-स्वरुपात असलेल्या प्रदूषणाचा संपर्क) उपाययोजनेच्या बाबतीत भारताचा क्रमांक 61 वा आहे. जीवनमानाची गुणवत्ता या बाबतीत 51 व्या स्थानी आहे, तर अर्थव्यवस्थेत बुद्धिमत्तेतली घट यात दिसून येणारे नकारात्मक परिणाम या बाबतीत 31 व्या स्थानी आहे आणि प्रतिभा आकर्षित करणे व टिकवून ठेवण्याचा प्राधान्यक्रम या बाबतीत 41 व्या स्थानी घसरले. कामगारांना प्रेरणा या बाबतीत 35 व्या स्थानी अश्या किंचित घसरणीमुळे परदेशी अति-कुशल व्यक्तींना (40 वा क्रमांक) आकर्षित करण्यासाठी योग्य वातावरण होते. प्रति विद्यार्थी शिक्षणावर होणारा एकूण सार्वजनिक खर्च आणि शिक्षणाची गुणवत्ता राखण्याबाबत केलेल्या उपाययोजना या बाबतीत भारताचा 62 वा क्रमांक आहे.
- एकूण 39.12 गुणांसह भारत 59 व्या स्थानी आहे. त्याच्याखाली मेक्सिको, ब्राझील, व्हेनेझुएला आणि शेवटी मंगोलिया या देशांचा क्रम लागतो आहे. BRICS देशांमध्ये भारत चीन (42 वा), रशिया (47 वा) आणि दक्षिण आफ्रिका (50 वा) या देशांच्याही मागे आहे.
जागतिक बालदिन: 20 नोव्हेंबर
दरवर्षी 20 नोव्हेंबर या दिवशी जगभरात ‘सार्वत्रिक बालदिन / जागतिक बालदिन / जागतिक बालहक्क दिन’ (World Children’s Day) साजरा केला जातो.
यावर्षी 1989 साली संयुक्त राष्ट्रसंघाकडून “बालहक्क करारनामा” (Convention on the Rights of the Child) स्वीकारण्यात आल्याच्या घटनेला 30 वर्ष पूर्ण झालीत.
लहान मुलांमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान व विविध संप्रदाय वा धर्मांबाबतचे सामंजस्य वाढावे तसेच त्यांच्या अधिकारांची जाणीव पालकांमध्ये निर्माण व्हावी या हेतूने हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक बालदिनाची पार्श्वभूमी
20 नोव्हेंबर ही तारीख निवडण्यामागचे कारण म्हणजे, 1959 साली ह्याच दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने “बालहक्क घोषणापत्र” (Declaration of the Rights of the Child) स्वीकारले होते. शिवाय 1989 साली ह्याच दिवशी बालहक्कांच्या मसुद्यावर स्वाक्षर्या झाल्या.
सर्वात पहिला बालदिन ऑक्टोबर 1953 मध्ये जिनेव्हाच्या 'इंटरनॅशनल युनियन फॉर चाइल्ड वेल्फेअर' या संघटनेच्या पुढाकाराने जगभर साजरा करण्यात आला. त्यानंतर व्ही. के. कृष्णमेनन ह्यांनी आंतरराष्ट्रीय बालदिनाची संकल्पनेला प्रोत्साहन देत ती सभेपूढे मांडली, जी 1954 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने स्वीकारली. त्यानुसार, 1954 साली 20 नोव्हेंबरला प्रथम जागतिक बालदिन साजरा झाला.
बालहक्कांमध्ये जगण्याचा अधिकार, ओळख, आहार, पोषण आणि आरोग्य, विकास, शिक्षण आणि मनोरंजन, नाव आणि राष्ट्रीयत्व, कुटुंब आणि कौटुंबिक वातावरण, दुर्लक्ष होण्यापासून सुरक्षा, शोषण, दुर्व्यवहार तसेच बालकांच्या बेकायदेशीर व्यापारापासून बचाव आदी बाबींचा समावेश होतो.
भारतात बालकांची देखरेख आणि सुरक्षा यासाठी मार्च 2007 मध्ये राष्ट्रीय बाल अधिकार सुरक्षेसाठी एक आयोग वा संवैधानिक संस्थेची निर्मिती करण्यात आली. बालहक्कांबाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी गैर-सरकारी संस्था, सरकारी विभाग, नागरी समाज, स्वयंसेवी संघटना आदी यांच्याद्वारा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment