Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, October 4, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 4 October Marathi | 4 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 4 October  Marathi |
     4 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स मराठी

    भारताचे NHSRC बनले प्राधान्यकृत वैद्यकीय उपकरणे आणि आरोग्य तंत्रज्ञान धोरणाच्या संदर्भात WHOचे भागीदारी केंद्र


    India's NHSRC becomes WHO's Partnership Center for Priority Medical Devices and Health Technology Policy

    प्राधान्यकृत वैद्यकीय उपकरणे आणि आरोग्य तंत्रज्ञान धोरणाच्या संदर्भात WHOचे भागीदारी केंद्र म्हणून कार्य करण्यासाठी ‘राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था स्त्रोत केंद्र’ने (NHSRC) जागतिक आरोग्य संघटना (WHO) सोबत करार केला आहे, ज्याच्या अंतर्गत केंद्राची पुनर्रचना करण्यात आली आहे.

    झालेली पुनर्रचना 
    Restructuring done


    NHSRC येथे असलेल्या आरोग्य सेवा तंत्रज्ञान विभागाची नवी कार्ये - राष्ट्रीय आरोग्य मोहिमेच्या अंतर्गत अधिग्रहन करण्यात येणार्‍या तंत्रज्ञानाची तांत्रिक वैशिष्ट्ये निश्चित करणे, वैद्यकीय उपकरणांची देखरेख व व्यवस्थापनासंबंधी धोरणांचे मसुदे तयार करणे, आरोग्यविषयक उत्पादनांच्या कल्पक शोधांचे मूल्यांकन करणे आणि निदानाविषयी पुढाकार, राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम अश्या मुद्द्यांशी संबंधी मंत्रालयाला पाठिंबा देणे.

    WHOच्या भागीदारीने केंद्राने केलेली कार्ये
    Work done by the Center in partnership with WHO
    • केंद्राने आरोग्य मंत्रालयाच्या मोफत निदान संदर्भात पुढाकारासाठी एक मार्गदर्शनपर दस्तऐवज तयार केले आहे.
    • WHOच्या सहकार्याने केंद्राने रक्तदाब मोजण्याचे उपकरण, इन व्हिट्रो डायग्नोस्टिक्स तसेच कर्करोग व हृदयरोगांकरिता उपकरणे यांच्यासंदर्भात तांत्रिक वैशिष्ट्ये निश्चित करण्याबाबत देखील कार्य केले.
    • तसेच ऑक्सिजन ऑक्सिजन केंद्रे आणि पुनर्जीवन यंत्रे अश्या विविध वैद्यकीय उपकरणांच्यासंदर्भात तांत्रिक वैशिष्ट्ये निश्चित करण्याबाबत देखील कार्ये करीत आहे.
    भारताचे NHSRC बनले प्राधान्यकृत वैद्यकीय उपकरणे आणि आरोग्य तंत्रज्ञान धोरणाच्या संदर्भात WHOचे भागीदारी केंद्र


    जागतिक अंतराळ सप्ताह 2019

    World Space Week 2019

    जगभरात दि. 4 ते 10 ऑक्टोबर या काळात ‘जागतिक अंतराळ सप्ताह’चे आयोजन केले जाते.
    2019 संकल्पना : “द मून: गेटवे टू द स्टार्स”
    कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) कर्नाटक राज्यामधल्या सात शैक्षणिक संस्थांशी हातमिळवणी करून विद्यार्थ्यांपर्यंत खगोलशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या फायद्यांविषयी माहिती आणि ज्ञान पोहोचविण्याचे कार्य करीत आहे. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, उपग्रहांचे नमुने, चित्रफिती आणि भारतीय अंतराळ मोहिमांविषयी चर्चा अश्या कार्यक्रमांचा समावेश आहे.
    पार्श्वभूमी
    दि. 4 ऑक्टोबर 1957 या तारखेला सोव्हिएत संघाकडून ‘स्पुतनिक 1’ नावाचा कृत्रिम उपग्रह सर्वप्रथम प्रक्षेपित करण्यात आला होता, तर 10 ऑक्टोबर 1967 रोजी सर्व देशांनी एकत्र येऊन अंतराळनिगडित विविध विषयांवर जागतिक करार (Outer Space Treaty) केला. अंतराळाचा मानवाच्या कल्याणासाठी, मानवाचे जीवन सुखकारक करण्यासाठी वापर करावा, हा उद्देश यामागे होता.
    त्यामुळे या दोन्ही तारखांचे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने दि. 4 ते 10 ऑक्टोबर या काळात जागतिक अंतराळ सप्ताह साजरा करण्याचे घोषित केले. सन 1999 पासून भारतासह जगातल्या विविध 70 देशांमध्ये अंतराळ सप्ताह साजरा करण्यात येतो.

    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स, 

    No comments:

    Post a Comment