Current affairs | Evening News Marathi
Current affairs 7 October Marathi |
7 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स मराठी
विष्णू नंदन: सर्वात मोठ्या आर्क्टिक मोहिमेमध्ये सहभागी झालेला भारतीय
केरळचे 32 वर्षीय ध्रुवीय संशोधक विष्णू नंदन हे ‘मल्टीडिसीप्लिनरी ड्रिफ्टिंग अब्जर्वेटरी फॉर द स्टडी ऑफ आर्क्टिक क्लायमेट’ (MOSAiC) या अभ्यास मोहिमेत सहभागी करून घेण्यात आलेले एकमेव भारतीय ठरले आहेत.
पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावरील आर्क्टिक प्रदेशातल्या वातावरणात होणार्या बदलांविषयी अभ्यास करण्यासाठी यंदा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक बाबी
- ‘वैश्विक तापमानवाढ’चे केंद्र म्हणून आर्क्टिक प्रदेशाचे बारीक निरीक्षण करणे आणि जागतिक हवामान बदलांविषयी अधिक चांगले आकलन व्हावे त्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मूलभूत गोष्टींबाबत अंतर्दृष्टी प्राप्त करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे.
- जगातल्या 300 शास्त्रज्ञांची चमू हा अभ्यास करणार आहे.
- हवामान बदलांचा होणारा परिणाम आणि जागतिक हवामानाविषयी करण्यात येणारा अंदाज सुधारण्यात यामुळे मदत होऊ शकणार.
- जर्मनीचा ‘अल्फ्रेड वेगेनर इन्स्टिट्यूट’ नामक शास्त्रज्ञांच्या संघाच्या नेतृत्वात ही मोहीम संपूर्ण वर्षभर चालवली जाणार आहे. हिवाळ्यातल्या परिस्थितीमुळे पूर्वी कमी कालावधीतच अभ्यास केला गेला आहे.
- यंदा हिवाळ्यापूर्वीच समुद्रातल्या एका मोठ्या बर्फाच्या थराखाली संशोधक स्वतःला बंदिस्त करून घेणार आहेत.
सागरी माहिती सामायिक करण्यास भारताचे IFC-IOR केंद्र कार्यरत
भारतीय नौदलाच्या ‘इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर – इंडियन ओशन रीजन (IFC-IOR)’ या विभागाने हिंद महासागरातून होणार्या सागरी क्रियाकलापांविषयीची माहिती सामायिक करण्यास सुरुवात केली आहे.
‘गोवा मेरीटाईम कॉन्क्लेव्ह 2019’ या परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी IOR क्षेत्रातल्या देशांना या सुविधेचा उपयोग करून घेण्याविषयी प्रस्ताव मांडला.
‘IFC-IOR’ विषयी
- डिसेंबर 2018 मध्ये गुरुग्राम (गुडगाव) येथे भारतीय नौदलाच्या ‘इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर – इंडियन ओशन रीजन (IFC-IOR)’ या विभागाचे उद्घाटन करण्यात आले होते.
- भागीदार देश आणि बहुराष्ट्रीय संस्थांच्या सहयोगाने सागरासंबंधी जागृती वाढविण्यास आणि विशेषकरून व्यवसायिक मालवाहू जहाजांसंबंधी माहिती सामायिक करण्याच्या उद्देशाने हे केंद्र उघडण्यात आले. हे केंद्र आपत्ती निवारणासाठी देखील कार्य करीत आहे.
- केंद्राचे आतापर्यंत 18 देश आणि 15 बहुराष्ट्रीय / सागरी सुरक्षा केंद्रांशी संबंध जोडले गेले आहेत.
हिंद महासागराच्या सागरी क्षेत्रात पाळत ठेवण्यासाठी उपग्रहांचे एक जाळे तयार करण्यासाठी भारत आणि फ्रान्स एकत्र कार्य करीत आहेत. हिंद महासागरी क्षेत्रामधून (IOR) जगातला जवळपास 75% पेक्षा जास्त समुद्री व्यापार आणि जागतिक तेलाचा 50% व्यापार होतो.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment