Current affairs | Evening News Marathi
Current affairs 20 Marathi |
20 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स
चीनमध्ये ‘जागतिक लष्करी खेळ 2019’ याचा आरंभ
चीनच्या वुहान या शहरात 18 ऑक्टोबर 2019 रोजी सातव्या “आंतरराष्ट्रीय लष्करी क्रिडा परिषद (CISM) लष्करी जागतिक खेळ” या कार्यक्रमाचा आरंभ झाला.
यावर्षी या कार्यक्रमात सुमारे 100 देशांमधून जवळपास 10 हजार लष्करी कर्मचारी एकत्र आले आहेत. यंदा स्पर्धेसाठी 23 क्रिडा प्रकारांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे जगातला सर्वात मोठा 3डी स्टेज तयार करण्यात आला आहे.
CISM बाबत
दिनांक 18 फेब्रुवारी 1948 रोजी बेल्जियम, डेन्मार्क, फ्रान्स, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड्स पाच संस्थापक राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय लष्करी क्रिडा परिषद (CISM) याची स्थापना केली. आज या संघटनेचे 133 सदस्य राष्ट्र आहेत. त्याचे मुख्यालय ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे आहे.
सप्टेंबर 1995 मध्ये रोममध्ये पहिल्या लष्करी जागतिक खेळांचे आयोजित करण्यात आले होते. तेव्हापासून दर चार वर्षांनी ही स्पर्धा खेळवली जात आहे. हा सर्वात मोठा क्रिडा कार्यक्रम देखील आहे.
2021-22 या सत्रापासून सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश
केंद्र सरकारने महिला सशक्तीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलत सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी 2021-22 या सत्रापासून सैनिक शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
मिझोरममधील सैनिक स्कूल चिंगचिप येथे दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतर संरक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा एक भाग म्हणून लैंगिक समानतेच्या दृष्टीने सशस्त्र दलात महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढवा या उद्दीष्टेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment