Current affairs | Evening News Marathi
Current affairs 18 September Marathi |
18 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी
विंग कमांडर अंजली सिंग बनल्या प्रथम महिला सैन्य मुत्सद्दी
भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर अंजली सिंग ह्या भारतीय हवाई दलातल्या प्रथम महिला अधिकारी बनल्या आहेत, ज्या परदेशात भारतीय मिशनमध्ये सैन्य मुत्सद्दी म्हणून तैनात आहेत. अंजली सिंग ह्यांना 10 सप्टेंबर 2019 रोजी रशियाच्या भारतीय दूतावासात ‘डिप्टी एअर अटॅची’ म्हणून नियुक्त केले गेले आहे. या पदावर असताना त्या भारतीय हवाई दल आणि रशियाचे सरकार यांच्यामधला दुवा म्हणून काम पाहणार.
BBPS द्वारे सर्व आवर्ती बिले भरण्यास RBIची परवानगी
16 सप्टेंबर रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) यांच्या देयकांसंबंधी सेवांमध्ये (प्रीपेड रिचार्ज वगळता) सर्व आवर्ती बिलांसंबंधी देयकांना (शालेय शुल्क, विमा भत्ता आणि पालिका कर) समाविष्ट करून व्याप्ती वाढविलेली आहे.
सध्या, BBPS DTH, वीज, गॅस, दूरसंचार आणि पाणी या पाच विभागांच्या बिलांसाठी सेवा पुरवित आहे. आता त्याच्या सेवांमध्ये सर्व बिलांचा समावेश करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment