Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, September 17, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 17 September Marathi | 17 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 17 September  Marathi | 
      17 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी

    मयंक वैद: ‘एंडुरोमॅन ट्रायथलॉन’ स्पर्धा पूर्ण करणारा प्रथम भारतीय

    जगातली सर्वाधिक खडतर अशी ‘एंडुरोमॅन ट्रायथलॉन’ स्पर्धा पूर्ण करून मयंक वैदने नवा विश्वविक्रम केला आहे. 42 वर्षांचा मयंक वैद ही स्पर्धा पूर्ण करणारा पहिला भारतीय तसेच पहिला आशियाई खेळाडू ठरला. ही स्पर्धा पूर्ण करणारी ती जगातली 44 वी व्यक्ती आहे.
    ही स्पर्धा 50 तास 24 मिनिटांत पूर्ण करून त्याने नवा विक्रम केला. आधीचा विक्रम बेल्जिअमच्या ज्युलिअन डेनेअर ह्याच्या नावावर 52 तास 30 मिनिटांचा होता.
    मयंक वैदचा जन्म विलासपूरचा आहे आणि सध्या ते हाँगकाँगचा निवासी आहे. व्यवसायाने वकील असलेले मयंक वैद एका कंपनीत इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी डायरेक्टर आहे.
    स्पर्धेविषयी
    ट्रायथलॉन हा एक वेगवेगळा क्रिडाप्रकार आहे, ज्यात प्रामुख्याने धावणे, पोहणे आणि सायकलिंग असते. ‘एंडुरोमॅन ट्रायथलॉन’ स्पर्धेसाठी लंडनपासून फ्रान्सपर्यंतचे अंतर पार करावयाचे असते.
    140 किलोमीटर धावणे, 33.8 किलोमीटर समुद्रातून पोहून जाणे आणि 289.7 किलोमीटर अंतर सायकलिंग करणे हे भाग या स्पर्धेत आहेत.


    300 ड्रोनचा वापर करून भारताचा नकाशा तयार करणारSoI

    देशाचा नकाशा तयार करण्यासाठी भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI) प्रथमच ड्रोनचा वापर करणार आहे. विभागाने 300 ड्रोनचा वापर करून नकाशा तयार करण्याचे काम हातात घेतले आहे.
    योजनेनुसार ड्रोन या अद्ययावत तंत्राचा वापर करून हाय-रिझोल्यूशन असलेले नकाशे तयार करण्यात येणार आहेत. पुढील दोन वर्षांत भारतीय भूप्रदेशाचा एकूण 75% भौगोलिक भाग, म्हणजेच एकूण 3.2 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी सुमारे 2.4 दशलक्ष चौ.किमी.चा नकाशा तयार केला जाणार आहे.
    सध्या सर्वोत्कृष्ट नकाशांचे रिझोल्यूशन (पृथक्करण) 1: 250000 असे आहे, म्हणजेच नकाशावरील 1 सेंटीमीटर हे भुमीवरील 2500 सेंटीमीटर दर्शविते. योजनेनुसार नवा नकाशा 1:500 रिझोल्यूशनचा असणार आहे.
    भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI)
    भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI) या संस्थेचे मूळ सन 1767 मध्ये आहे. हे भारतातला सर्वांत जुना वैज्ञानिक विभाग आणि जगातल्या सर्वात जुन्या सर्वेक्षण आस्थापनांपैकी एक आहे. सर्व्हेयर जनरल ऑफ इंडिया हे या संस्थेचे प्रमुख आहेत. सध्या हे पद लेफ्टनंट जनरल गिरीश कुमार यांच्याकडे आहे. संस्थेचे मुख्यालय देहारादून (उत्तराखंड) येथे आहे.
    देशाचे शास्त्रीयदृष्ट्या सर्वेक्षण आणि नकाशा तयार करण्यासाठी कर्नल लॅम्ब्टन आणि सर जॉर्ज एव्हरेस्ट या प्रसिद्ध सर्वेक्षकांनी 10 एप्रिल 1802 रोजी ‘ग्रेट ट्रीग्नोमेट्रिक सर्व्हे (GTS)’चा पाया रचला होता.
    भारताचा भूगोल
    भारत देशाचे भौगोलिकदृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिकदृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे.
    भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता. पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व ईशान्य दिशेला वेगाने सरकू लागले. साधारणपणे 5 कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला. आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो. गंगेच्या खोर्‍याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये गणला जातो. अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे. पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूर पठार इत्यादी भूभाग येतो. दख्खनचे पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत. दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालमुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ निर्माण आहेत.
    भारताला एकूण 7,517 किलोमीटर (4,671 मैल) इतका समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यातला 5,423 किलोमीटर (3,370 मैल) इतका द्वीपकल्पीय भाग भारतात आहे तर उर्वरित 2,094 किलोमीटर (1,301 मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे. मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये 43 टक्के वाळूचे किनारे आहे, 11 टक्के खडकाळ तर उर्वरित 46 टक्के दलदलींनी भरलेला आहे.
    बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. दख्खनच्या पठारावरील महत्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी, कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी नद्या आहेत ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात. मध्य भारतातून नर्मदा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते. पश्चिम भारतात कच्छ येथे पृष्ठीय बदलांमुळे खार्‍यापाण्याचे दलदल आहे त्याला ‘कच्छचे रण’ असे म्हणतात. गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्विपसमूह भारताच्या अधिकारात येतात - दक्षिण अरबी समुद्रातले लक्षद्विप आणि इंडोनेशियाजवळचे अंदमान आणि निकोबार.
    स्त्रोत: विकिपीडिया

    No comments:

    Post a Comment