Current affairs | Evening News Marathi
Current affairs 19 September Marathi |
19 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय वंशाच्या लोकांनी सर्वाधिक संख्येनी स्थलांतरण केले: संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघाने ‘इंटरनॅशनल मायग्रेंट स्टॉक 2019’ हे शीर्षक असलेला एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्या स्थलांतरणाविषयीची माहिती देण्यात आली आहे. आज विविध कारणांमुळे लोक परदेशात वास्तव्य करताना आढळून येते.
अहवालाच्या मते, आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या स्थलांतरित लोकांमध्ये 2019 साली भारतीय नागरिकांची सर्वाधिक संख्या असून आज 17.5 दशलक्ष भारतीय वंश असलेले नागरिक परदेशात वास्तव्यास आहेत आणि या संख्येच्या बाबतीत भारत हा सर्व देशांमध्ये अग्रगण्य देश ठरला आहे.
भारतापाठोपाठ द्वितीय क्रमांकावर मेक्सिको (11.8 दशलक्ष), त्यानंतर चीन (10.7 दशलक्ष), रशिया (10.5 दशलक्ष), सिरिया (8.2 दशलक्ष), बांग्लादेश (7.8 दशलक्ष), पाकिस्तान (6.3 दशलक्ष), युक्रेन (5.9 दशलक्ष), फिलिपिन्स (5.4 दशलक्ष) आणि अफगाणिस्तान (5.1 दशलक्ष) या देशांचा क्रम लागतो आहे. या पहिल्या 10 देशांमधून सर्व आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांपैकी एक तृतीयांश लोक परदेशात आहेत.
एयरटेल पेमेंट्स बँकेचा नवा ‘भरोसा बचत खाता’
एयरटेल पेमेंट्स बँकेनी 'भरोसा बचत खाता' या शीर्षकाखाली नवे बचत खाते सादर केले आहे. या खात्याच्या ग्राहकांना बँकेच्या देशभरातल्या 6.5 लक्षाहून जास्त संख्येनी असलेल्या आधार-एनेबल पेमेंट सिस्टम (AePS) केंद्रांवर रोख रक्कम काढता येणार, रक्कम तपासता येणार आणि खात्याचे मिनी स्टेटमेंट मिळविता येणार. याव्यतिरिक्त ग्राहकाला 5 लक्ष रूपयांचा मोफत अपघाती विमा दिला जाणार आहे.
No comments:
Post a Comment