Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, September 11, 2019

    Current affairs | Evening News Marathi | Current affairs 11 September Marathi |   11 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 11 September  Marathi | 
      11 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी

    कॅप्टन संग्राम पवार अमेरिकेतल्या बलून फेस्टिवलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार

    भारतीय हवाई दलाचे कॅप्टन संग्राम पवार हे अमेरिकेत होणार्‍या वार्षिक ‘48व्या अल्बुक्वेर्क इंटरनॅशनल बलून फिएस्टा (AIBF)’ या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. हा कार्यक्रम 5 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2019 या काळात न्यू मेक्सिकोच्या अल्बुक्वेर्क येथे होणार आहे. यावर्षी भारत प्रथमच या कार्यक्रमात भाग घेणार आहे.

    ‘अल्बुक्वेर्क इंटरनॅशनल बलून फिएस्टा (AIBF)’ हा जगातला सर्वात मोठा 'हॉट एयर बलून' कार्यक्रम आहे, ज्यामध्ये 25 देशांमधून 650 वैमानिक भाग घेतात. 770 KOB रेडिओच्या 50 व्या वर्धापनदिनाच्या उत्सवाचे आकर्षण म्हणून हा कार्यक्रम 1972 सालापासून आयोजित केला जातो.

    भारतीय हवाई दलाचे कॅप्टन संग्राम पवार 10 ऑगस्ट 2019 रोजी ओमान देशाच्या इतिहासातले 'हॉट एयर बलून' उडविणारे पहिले वैमानिक बनले. तसेच ते पुणे (महाराष्ट्र) शहरातले प्रथम बलून पायलट आणि 1947 सालापासून भारतातले 24 वे बलून पायलट म्हणून विक्रम नोंदविला आहे.



    जगातली सर्वोच्च उंचीवरची मॅरेथॉन लद्दाखमध्ये झाली

    7 आणि 8 सप्टेंबर 2019 रोजी जम्मू व काश्मीरच्या लेह या शहरात जगातली सर्वोच्च उंचीवरची धावशर्यत असलेल्या ‘लद्दाख मॅरेथॉन’ची आठवी आवृत्ती आयोजित केली गेली होती. या कार्यक्रमात भारताच्या विविध भागातून आणि 25 परदेशांमधून 6 हजाराहून अधिक धावपटू सहभागी झाले होते. हा कार्यक्रम लद्दाख ऑटोनोमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल (LAHDC) यांच्याद्वारे प्रायोजित होता.
    स्पर्धेचे विजेते
    • 72 किलोमीटर अल्ट्रा खारडुंग ला चॅलेंज - शबीर हुसेन (पुरुष), क्रिस्टीना वॉल्टर (आयर्लंड)
    • 42 किलोमीटर फूल मॅरेथॉन - जिग्मेट डोल्मा (महिला) (सलग तिसर्‍या वर्षी अव्वल स्थान), शबीर हुसेन (पुरुष)
    • हाफ मॅरेथॉन (महिला) - ताशी लाडोल
    स्पर्धेविषयी
    • मॅरेथॉन समुद्रसपाटीपासून 11,000 फूटांहून अधिक उंचीवर आयोजित केले जाते. ही जगातली सर्वोच्च उंचीवरची मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते.
    • हा कार्यक्रम चार वर्गांमध्ये विभागला जातो; ते आहेत – 72 किलोमीटर अल्ट्रा खारडुंग ला चॅलेंज, 42 किलोमीटर फूल मॅरेथॉन आणि 21 किलोमीटर हाल्फ मॅरेथॉन आणि 7 किलोमीटर रन फॉर फन.
    • ही मॅरेथॉन प्रथम सन 2012 मध्ये आयोजित करण्यात आली होती. मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे.

    No comments:

    Post a Comment