Current affairs | Evening News Marathi
Current affairs 22 April 2019 Marathi |
22 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
गायिका सौम्या यांना संगीत अकादमीचा 'संगीत कलानिधी' सन्मान मिळाला
प्रसिद्ध कर्नाटकी शास्त्रीय गायिका डॉ. एस. सौम्या यांना संगीत अकादमीचा यावर्षीचा 'संगीत कलानिधी' सन्मान प्राप्त झाला. तसेच इतर पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा मद्रास संगीत अकादमीकडून करण्यात आली आहे.इतर पुरस्कारांचे विजेते –
- कर्नाटकामधील कर्नाटकी संगीताच्या जेष्ठ गायिका सीता नारायणन आणि एम. एस. शीला यांना ‘संगीता कला आचार्य पुरस्कार’ जाहीर झाला.
- नागास्वरम कलाकार 'व्यासारपदी' कोथानदरमन यांना TTK पुरस्कार मिळाला.
- गायक राजकुमार भारती यांना TTK पुरस्कार मिळाला.
- बेंगळुरूच्या जैन विद्यापीठातील्या सहायक प्राध्यापिका आरती एन. राव यांना संगीत तज्ञ पुरस्कार मिळाला.
- भरतनाट्यम नृत्यांगना प्रियदर्शिनी गोविंद यांना ‘नृत्य कलानिधी’ सन्मान मिळाला.
मद्रास संगीत अकादमी बाबत
मद्रास संगीत अकादमी हे दक्षिण भारतातल्या सर्वात जुन्या संगीत अकादमींपैकी एक आहे. प्रामुख्याने कर्नाटकी संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. 1927 साली मद्रासमध्ये झालेल्या पहिल्या अखिल भारतीय संगीत परिषदेत संगीतासाठी एक संघटना तयार करण्याचा निर्णय घेतला गेला. अकादमीचे 18 ऑगस्ट 1928 रोजी औपचारिकपणे उद्घाटन करण्यात आले. पहिला संगीत महोत्सव डिसेंबर 1927 मध्ये आयोजित केला गेला होता. डॉ. यू. रामा राव हे अकादमीचे संस्थापक अध्यक्ष आणि बशीर अहमद सईद संस्थापक उपाध्यक्ष होते.
विवेक कोहली: राष्ट्रकुल टेबल टेनिस महासंघ (CTTF) याचे अध्यक्ष
भारताचे विवेक कोहली यांची राष्ट्रकुल टेबल टेनिस महासंघ (CTTF) याच्या अध्यक्ष (चेअरमन) पदासाठीच्या निवडणूकीमधून निवड झाली. याशिवाय, भारताच्याच एम. पी. सिंग यांची महासचिव पदी निवड झाली आहे.दिनांक 20 जुलै रोजी भुवनेश्वर येथे झालेल्या निवडणुकीत ही निवड झाली.
CTTF याच्या अध्यक्ष (प्रेसिडेंट) पदावर आधीच भारताचे दुष्यंत चौटाला कार्यरत आहेत. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा राष्ट्रकुल टेबल टेनिस महासंघ (CTTF) मधील तीन प्रमुख पदांवर भारतीय आहेत.
CTTF बाबत
राष्ट्रकुल टेबल टेनिस महासंघ (CTTF) कडून आयोजित करण्यात आलेली पहिली अजिंक्यपद स्पर्धा 1971 साली सिंगापूरमध्ये खेळवली गेली होती.
राष्ट्रकुल बद्दल
राष्ट्रकुल (Commonwealth of Nations) हा 53 स्वतंत्र राज्यांचा एक आंतरराष्ट्रीय समूह आहे. ग्रेट ब्रिटन (UK) आणि एके काळी ब्रिटिश साम्राज्यात मोडणाऱ्या पण नंतर स्वतंत्र झालेल्या काही राष्ट्रांची ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ब्रिटिश साम्राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय गरजेतून एक शतकापूर्वी वसाहतींच्या परिषदेच्या (कलोनियन कॉन्फरन्स) रूपात राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) या संस्थेचा उदय झाला. भारत देखील याचा एक भाग आहे.
1917 सालाच्या सुमारास कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांना वसाहतींच्या स्वराज्याचा दर्जा मिळाला होता. 1931 साली सर्व वसाहतींना क्रमाक्रमाने स्वायत्तता देण्याचे धोरण ब्रिटिश सरकारने जाहीर केले. ग्रेट ब्रिटनच्या संसदेने स्टॅट्यूट ऑफ वेस्टमिन्स्टर हा कायदा करून राष्ट्रकुलाला 1931 साली मान्यता दिली आणि साहजिकच इम्पीअरिअल कॉन्फरन्स ही संज्ञा कालबाह्य ठरून ‘ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स’ ही संज्ञा रूढ झाली. 1947 साली ‘ब्रिटिश कॉमनवेल्थ’ या नावातून ब्रिटिश हा शब्द वगळण्यात आला. राष्ट्रकुलाचा प्रभाव कायद्याच्या स्वरूपाचा नसून राजकीय स्वरूपाचा आहे आणि माध्यम राजनैतिक स्वरूपाचे आहे.
पूर्वप्रथेनुसार राष्ट्रकुलाचे प्रमुखपद ब्रिटिश राजमुकुटाकडे (म्हणजे राजा किंवा राणीकडे) (सध्या क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे) आहे, जे की आता संघटनेचे प्रमुख आहेत. 1965 साली राष्ट्रकुलाचे लंडन (UK) या शहरात स्वतंत्र सचिवालय स्थापन करण्यात आले.

No comments:
Post a Comment