Current affairs | Evening News Marathi
Current affairs 21 April 2019 Marathi |
21 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
राष्ट्रपतींनी सहा राज्यांच्या राज्यपालांची नेमणूक केली
नव्याने उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, त्रिपुरा आणि नागालँड अश्या सहा राज्यांच्या नव्या राज्यपालांची नेमणूक करण्यात आली आहे. 20 जुलै 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी यांना मान्यता देत आदेशांवर स्वाक्षर्या केल्या.या नियुक्त्या पुढीलप्रमाणे आहेत: उत्तरप्रदेश - आनंदीबेन पटेल; पश्चिम बंगाल - जगदीप धनखर; मध्यप्रदेश - लालजी टंडन; बिहार - फगु चौहान; त्रिपुरा - रमेश बैंस; नागालँड - आर. एन. रवी.
शिवा थापा: कझाकस्तानच्या प्रेसिडेंट चषक मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारा पहिला भारतीय मुष्टियोद्धा
भारतीय मुष्टियुद्ध खेळाडू शिवा थापा ह्याने कझाकस्तानच्या अस्ताना या शहरात खेळवल्या गेलेल्या ‘2019 प्रेसिडेंट चषक’ मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. कझाकस्तानच्या प्रेसिडेंट चषक या स्पर्धेत असे यश मिळविणारा शिवा थापा हा पहिलाच भारतीय मुष्टियोद्धा आहे.ऑलम्पिकमध्ये 63 किलो वजन गट नव्याने सामील करण्यात आला असून या गटात प्रथमच खेळताना शिवा थापाला कझाकस्तानच्या झाकिर सफिउल्लिनशी अंतिम लढत खेळायची होती. पण दुखापतीमुळे त्याने या लढतीतून माघार घेतल्याने शिवाला विजेता घोषित करण्यात आले.

No comments:
Post a Comment