Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, July 22, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 20 April 2019 Marathi | 20 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 20 April 2019 Marathi |   
    20 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी


    दिल्लीचा बुद्धिबळपटू प्रितू गुप्ता: भारताचा 64 वा ग्रॅन्डमास्टर

    ‘पोर्तुगाल लीग 2019’ या बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत आयएम लेव्ह यान्केलेविच ह्याला पराभूत करून दिल्लीचा बुद्धिबळपटू प्रितू गुप्ताने ग्रॅन्डमास्टर किताब मिळविला आहे. हा किताब मिळविणारा गुप्ता भारतातील 64 वा बुद्धिबळपटू आहे.
    प्रितू गुप्ताने आपल्या वयाच्या 15 वर्षे, 4 महिने, 10 व्या दिवशी हा प्रतिष्ठेचा किताब मिळविण्याचा पराक्रम केला.
    भारताचा अनुभवी ग्रॅन्डमास्टर विश्वनाथन आनंदने पहिल्यांदा ग्रॅन्डमास्टरचा किताब पटकाविला होता. भारताचा तो पहिला ग्रॅन्डमास्टर असून त्यानंतर म्हणजे 31 वर्षांच्या कालावधीनंतर भारताच्या प्रितू गुप्ताने हा पराक्रम केला आहे. भारताच्या डी. गुकेशने आपल्या वयाच्या 12 वर्षे, 7 महिने आणि 17 व्या दिवशी ग्रॅन्डमास्टरचा किताब मिळविला होता. हा किताब मिळविणारा गुकेश हा सर्वात तरूण भारतीय ग्रॅन्डमास्टर आहे.

    जियो: वापरकर्त्यांच्या बाबतीत भारतातली दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी

    रिलायन्स इंडस्ट्रीजची जियो ही वापरकर्त्यांच्या संख्येच्या बाबतीत भारतातली दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे. प्रतिस्पर्धी असलेल्या भारती एयरटेलला तिने मागे टाकले. अधिकृत आकडेवारीनुसार, मे 2019 या महिन्याच्या अखेरीस, जियोचे देशभरात 323 दशलक्ष वायरलेस ग्राहक आहेत.
    TRAIच्या आकडेवारीनुसार,
    • देशात वायरलेस ग्राहकांची एकूण संख्या 1,162.30 दशलक्षवरून घटून 1,161.86 दशलक्ष झाली आहे.
    • 31 मे पर्यंत देशातल्या एकूण सेल्युलर ग्राहकांपैकी 89.72 टक्के ग्राहक सर्व खासगी दूरसंचार कंपन्यांचे होते, तर सरकारी BSNL आणि MTNL यांचा बाजारपेठेतला वाटा 10.28 टक्के होता.
    • व्होडाफोन आयडिया ही ग्राहकांच्या बाबतीत देशातली सर्व मोठी कंपनी आहे. या कंपनीचे 387.6 दशलक्ष ग्राहक (म्हणजेच बाजारपेठेत 33.36 टक्के वाटा) आहेत.

    No comments:

    Post a Comment