‘भारतमाला’ प्रकल्पाच्या अंतर्गत 2022सालापर्यंत 35000 किमीचे महामार्ग बांधले जाणार: राष्ट्रपती
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 20 जून 2019 रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांना संबोधित करत असताना त्यांनी अभिभाषणात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारने ठेवलेले उद्दिष्ट स्पष्ट केले.
‘भारतमाला’ प्रकल्पाच्या अंतर्गत 2022 सालापर्यंत एकूण 35000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे बांधकाम किंवा त्यात सुधारणा केली जाणार, अशी त्यांनी घोषणा केली.
याव्यतिरिक्त, 'सागरमाला’ प्रकल्पाच्या अंतर्गत, किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये आणि बंदरांना जोडणार्या भागात उत्तम दर्जाचे पक्के रस्ते बांधण्यात येणार आहे, अशी घोषणा केली. तसेच ‘उडे देश का आम नागरिक (UDAN)’ योजनेच्या अंतर्गत लहान गावांपर्यंत हवाई संपर्क प्रस्थापित करण्यासाठी योजनेचा विस्तार केला जात आहे.
भारतमाला प्रकल्प
भारतमाला प्रकल्प हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाला भुपृष्ठ रस्त्यांद्वारे जोडण्यासाठीच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवविला जात आहे. हा राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम (NHDP) यानंतर देशातला दुसरा सर्वात मोठा महामार्ग बांधकाम प्रकल्प आहे, ज्याच्याअंतर्गत देशात सुमारे 50,000 किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.
मालवाहतुकीच्या कार्यक्षम आणि वेगवान हालचालीसाठी सुलभ वाहतूक होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकल्पामधून विशेषकरून आर्थिक मार्गिका व वसाहती, सीमेवरील प्रदेश आणि दुर्गम भागांना दळणवळणाची व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे.
'सागरमाला’ प्रकल्प
‘सागरमाला’ हा जलवाहतुक मंत्रालयाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे. यामध्ये भारताला लाभलेल्या 7516.6 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीचा वापर करून 14,500 किलोमीटर लांबीचे संभाव्य सुचालीत जलमार्ग आणि महत्वपूर्ण आंतरराष्टीय समुद्री व्यापार मार्गांवर भारताच्या धोरणात्मक ठिकाणांना जोडून देशाच्या बंदरांचा व संलग्न बाबींचा विकास केला जात आहे.
जलवाहतुक आणि बंदरांच्या विकासाला चालना देणार्या भारत सरकारच्या महत्वाकांक्षी ‘सागरमाला’ कार्यक्रमाच्या अंतर्गत 600 हून जास्त प्रकल्पांची ओळख पटविण्यात आली आहे आणि त्यात 2020 सालापर्यंत $120 अब्ज (सुमारे 8 लक्ष कोटी रुपये) इतकी गुंतवणूक केली जाणार आहे. ज्यामुळे मालवाहतूकीच्या खर्चात दरवर्षी $6 अब्जची बचत होईल.
UDAN योजना
भारत सरकारची UDAN (उडे देश का आम नागरिक) या नावाची प्रादेशिक जोडणी योजना (RCS) एप्रिल 2017 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत पहिल्या फेरीत 5 हवाईसेवा कंपनींना 128 मार्गिका प्रदान करण्यात आल्या आहेत. योजनेच्या अंतर्गत निवडलेल्या विमान कंपन्यांना त्यांच्या एकूण प्रवासभाड्यापैकी 50% भाडे केंद्र आणि राज्य सरकाराकडून अनुदान किंवा व्यवहार्यता तूट निधीदान (VGF) स्वरुपात मिळण्याचे प्रस्तावित आहे.
QSची ‘जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’
ब्रिटनमधील क्वाकलरी सायमंड्स (QS) या संस्थेकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीनुसार अमेरिकेमधील मॅसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) हे जगातले सर्वोत्कृष्ट विद्यापीठ (शैक्षणिक संस्था) ठरले आहे. MIT ने सलग आठव्यांदा हा सन्मान प्राप्त केला आहे.
ठळक बाबी
जागतिक
- प्रथम पाच सर्वोत्कृष्ट विद्यापीठे – MIT (अमेरिका), स्टॅनफोर्ड विद्यापीठ (अमेरिका), हार्वर्ड विद्यापीठ (अमेरिका), ऑक्सफर्ड विद्यापीठ (ब्रिटन), कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका)
- आशियातले सर्वोत्कृष्ट विद्यापीठ - नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि नानयांग टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी (दोन्ही संयुक्तपणे 11 वे).
- अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांमधील 302 विद्यापीठांपैकी 216 ने कर्मचारी/विद्यार्थी गुणोत्तर तसेच संस्थात्मक शिक्षण क्षमता या घटकांमध्ये अत्याधिक वाईट कामगिरी नोंदवलेली आहे.
- मध्य-पूर्वे प्रदेशातली दोन विद्यापीठे यावेळी पहिल्यांदाच यादीत प्रथम 200 मध्ये समाविष्ट झाली आहेत. सौदी अरबचे ‘किंग अब्दुल अझीझ युनिव्हर्सिटी’ (186) हे त्या प्रदेशातले सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले.
भारतीय
- भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (IIT बॉम्बे) (152 वे) हे सलग दुसर्या वर्षीही सर्वोत्कृष्ट भारतीय विद्यापीठ ठरले आहे. त्यानंतर IIT दिल्ली (182) आणि IISc बेंगळुरू (184) या अन्य दोन भारतीय विद्यापीठांनीही प्रथम 200 मध्ये क्रमांक पटकावला आहे.
- प्रथम 1,000 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत एकूण 23 भारतीय संस्थांचा समावेश आहेत आणि त्यापैकी केवळ चार संस्थांनी स्वताःच्या क्रमांकात वरचाल केली. तसेच त्यात केवळ पाच खासगीपणे चालवल्या जाणार्या शैक्षणिक संस्था आहेत आणि अन्य सरकारी निधी प्राप्त करणारे विद्यापीठे आहेत.
- मणिपाल अकॅडेमी ऑफ हायर एज्युकेशन (जी 701-750 या श्रेणीत आहे) हे भारतातले सर्वोत्कृष्ट खासगी विद्यापीठ ठरले. त्यानंतर ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी (सोनिपत) या खासगी संस्थेला 751-800 या श्रेणीत स्थान मिळाले आहे.
QSने 82 वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या 1000 विद्यापीठांचे सर्वेक्षण केले. संस्थांनी तयार केलेले शोधनिबंध, शिक्षणाची पातळी, पदवीधरांची रोजगार क्षमता, विद्यार्थी-कर्मचारी गुणोत्तर, संशोधनाचा प्रभाव आणि आंतरराष्ट्रीयकरण अश्या घटकांच्या आधारावर ही क्रमवारी प्रदान करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment