Current affairs | Evening News Marathi
Current affairs 18 April 2019 Marathi |
18 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
चंदीगडमध्ये ‘मार्शल अर्जुन सिंग स्मारक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा 2019’ आयोजित
चंदीगड या शहरात द्वितीय ‘मार्शल अर्जुन सिंग स्मारक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा 16 एप्रिल ते 25 एप्रिल या काळात हवाई दल क्रिडा नियंत्रण मंडळाने आयोजित केली आहे. ही स्पर्धा मार्शल अर्जुन सिंग यांच्या स्मरणार्थ आयोजित केली जाते.
मार्शल अर्जुन सिंग कोण आहेत?
भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जुन सिंग हे सन 1964 ते सन 1969 या काळात भारतीय हवाई दलाचे प्रमुख होते. ते सन 1966 साली भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदोन्नत्ती मिळविणारे पहिले IAF अधिकारी ठरले. 2002 साली ते भारतीय हवाई दलाचे प्रथम आणि एकमेव अधिकारी ठरले, ज्यांना भारतीय हवाई दलाचे मार्शल म्हणून फाइव्ह-स्टार रँकवर पदोन्नती मिळाली.
#sports
“IN-VPN BILAT EX-2019”: भारत आणि व्हिएतनाम यांचा संयुक्त सागरी सराव
दोन्ही देशांमधील सागरी संबंध वाढविण्याच्या उद्देशाने, भारत आणि व्हिएतनाम यांच्या नौदलांचा संयुक्त सागरी सराव म्हणून यावर्षी “IN-VPN BILAT EX” या मालिकेची द्वितीय आवृत्ती आयोजित करण्यात आली.
व्हिएतनामच्या काम रान उपसागरालगतच्या प्रदेशात 13 एप्रिल ते 16 एप्रिल या काळात हा सरावाभ्यास यशस्वीपणे पार पाडण्यात आला. या कार्यक्रमात भारताच्या INS कोलकाता आणि INS शक्ती या जहाजांनी भाग घेतला.
दोन्ही देशांमध्ये 2016 साली झालेल्या 'व्यापक सामरिक भागीदारी'च्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
व्हिएतनाम हा आग्नेय आशियातला एक देश आहे. हनोई हे देशाचे राजधानी शहर आहे. व्हिएतनामी डोंग हे राष्ट्रीय चलन आहे.
#defence&Security
No comments:
Post a Comment