Current affairs | Evening News Marathi
Current affairs 13 March 2019 Marathi |
13 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
तामिळनाडू हे सर्वाधिक औद्योगिक राज्य आहे: RBI
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून प्रकाशित करण्यात आलेल्या 'हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेट्स 2018-19' या दस्तऐवजाची चौथी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यानुसार, 2016-17 या वित्त वर्षापर्यंतच्या काळात देशातल्या एकूण कारखान्यांच्या संख्येच्या 15.84% कारखाने तामिळनाडू राज्यात असून तो त्यासंदर्भात अग्रस्थानी आहे. तामिळनाडूच्या पाठोपाठ महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि उत्तरप्रदेश अश्या राज्यांचा क्रम लागतो आहे.
अहवालानुसार -
- तामिळनाडू सर्वाधिक औद्योगिक राज्य ठरला. राज्यात 2016-17 या वित्त वर्षापर्यंत 37220 कारखाने कार्यरत होते.
- गुंतवणुकीचे भांडवल आणि उत्पादक भांडवल याच्यासंदर्भात, गुजरात अग्रस्थानी असून त्याच्यापाठोपाठ महाराष्ट्र आघाडीवर आहे.
- अंदमान व निकोबार 18 कारखान्यांसह सर्वात कमी कारखाने असलेला किमान औद्योगिक राज्य ठरला. त्याच्याआधी सिक्कीम (71), मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.
- भारतातला सर्वात प्रदूषित शहर ठरलेल्या दिल्लीत 3507 कारखाने होते.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 13 March 2019 Marathi |
13 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
डॉ. ए. के. मोहंती: भाभा अणू संशोधन केंद्राचे नवे संचालक
दिनांक 12 मार्च 2019 रोजी भाभा अणू संशोधन केंद्र (BARC) याच्या संचालक पदाची जबाबदारी डॉ. अजित कुमार मोहंती यांनी स्वीकारली.डॉ. मोहंती एक प्रसिद्ध वैज्ञानिक आणि भाभा अणू संशोधन केंद्राच्या भौतिक समूहाचे संचालक आहेत. त्यांच्या 36 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी आण्विक भौतिकशास्त्राच्या विविध क्षेत्रात कार्य केले आहे.
BARC विषयी
भाभा अणू संशोधन केंद्र (BARC) या संस्थेची दिनांक 3 जानेवारी 1954 रोजी अटॉमिक एनर्जी इस्टेब्लिशमेंट, ट्रॉम्बे (AEET) या नावाने स्थापना झाली. पुढे 1966 साली भाभा यांच्या मृत्यूनंतर, दिनांक 22 जानेवारी 1967 रोजी केंद्राचे वर्तमान नावाने नामकरण करण्यात आले.
ही भारतातली प्रमुख अणू संशोधन विषयक सुविधा आहे. त्याचे मुख्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे आहे. डॉ. होमी जे. भाभा त्याचे संस्थापक मानले जातात.
भारताचे पहिले-वहिले पॉवर रिएक्टर ‘तारापूर अणू वीज केंद्र’ येथे अमेरिकेच्या मदतीने स्थापन करण्यात आले.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 13 March 2019 Marathi |
13 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
सायबर सेन्सरशिपच्या विरोधात जागतिक दिन: 12 मार्च
दरवर्षी 12 मार्च या दिवशी ‘सायबर सेन्सरशिपच्या विरोधात जागतिक दिन’ (World Day Against Cyber Censorship) पाळला जातो, जो दरवर्षी आयोजित केला जाणारा एक वार्षिक ऑनलाइन कार्यक्रम आहे.सबंध आणि मुक्त इंटरनेट या संकल्पनेला समर्थन देणारी ही चळवळ सर्वांना मुक्त इंटरनेट सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने चालविण्यात आली आहे. तसेच जगभरातल्या सरकारांकडून भाष्य-स्वातंत्र्यावर लादल्या जाणार्या बंधनाच्या प्रश्नाला संबोधित करण्यासाठी हा दिन पाळला जातो.
दिनाविषयी
रीपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स (पॅरिसची आंतरराष्ट्रीय अशासकीय संस्था) आणि अॅमेनिस्टी इंटरनॅशनल या संस्थांच्या विनंतीवरून दिनांक 12 मार्च 2008 रोजी पहिल्यांदा ‘सायबर सेन्सरशिपच्या विरोधात जागतिक दिन’ पाळला गेला होता.
हा आता रीपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स यांच्या नेतृत्वात आयोजित केला जाणारा एक वार्षिक जागतिक कार्यक्रम बनला आहे. 2010 साली रीपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स तर्फे ‘नेटिझन पारितोषिक’ देण्याचे सुरू करण्यात आले, जो ऑनलाइन अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखण्यात उत्कृष्ट योगदान देणारा इंटरनेट वापरकर्ता/ब्लॉगर/व्यक्ती/गट यांना दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 13 March 2019 Marathi |
13 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
ग्रामीण भारताचे उत्पन्न वाढविण्यासाठी NRETP प्रकल्पाला जागतिक बँक 250 दशलक्ष डॉलरचे कर्ज देणार
भारताच्या 13 राज्यांच्या ग्रामीण भागांमध्ये राहणार्या नागरिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी भारत सरकारने चालविलेल्या ‘राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प’ (NRETP) या कार्यक्रमाला जागतिक बँकेकडून 250 दशलक्ष डॉलर (जवळपास 38.82 कोटी रुपये) एवढ्या रकमेचे कर्ज दिले जाणार असून त्यासंबंधीच्या करारावर भारत सरकार आणि जागतिक बँक यांची स्वाक्षरी झालेली आहे.हा निधी ग्रामीण कुटुंबातल्या महिलांना कृषक आणि अकृषक उत्पादनांसाठी व्यवहार्य उपक्रम विकसित करण्यास मदत करेल.
प्रकल्पाविषयी
भारत सरकार ‘दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मोहीम’ (DAY-NRL) अंतर्गत ‘राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प’ (National Rural Economic Transformation Project -NRETP) या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणार आहे.
या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून वित्तपुरवठा होणार आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे उच्चस्तरीय हस्तक्षेपांमुळे डिजिटल अर्थसहाय्य आणि उपजीविकेच्या क्षेत्रात केल्या जाणार्या हस्तक्षेपांच्या बाबतीत वृद्धी करणार्या उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल, असे अपेक्षित आहे.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार मोहीम (NRLM) भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे अंमलबजावणी करण्यात आलेला एक दारिद्र्य निर्मूलन प्रकल्प आहे. 1999 साली स्वर्णजयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना (SGSY) सुरू केली गेली. पुढे 2011 साली योजनेला NRLM मध्ये बदलण्यात आले.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 13 March 2019 Marathi |
13 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
RBI 14 मार्चला OMOs द्वारे अर्थव्यवस्थेत 12,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दिनांक 14 मार्च 2019 रोजी ओपन मार्केट ऑपरेशन (OMOs) याच्याद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेत 12,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.प्रचलित चलनविषयक तरलतेसंबंधी परिस्थितींचे मूल्यांकन तसेच चालना मिळण्यासाठी असलेल्या टिकाऊ तरलतेसंबंधी गरजांच्या आधारावर, RBIने एकाधिक किंमत पद्धतीचा वापर करून लिलावाद्वारे OMOs याच्या अंतर्गत सरकारी सिक्युरिटी (समभाग) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ओपन मार्केट ऑपरेशन (OMO) म्हणजे काय ?
ओपन मार्केट ऑपरेशन हा केंद्रीय बँकेद्वारे चालवला जाणारा एक उपक्रम आहे, ज्यामधून त्याच्या चलनामध्ये एखाद्या बँक किंवा बँकांचा एक गट यांच्यासाठी चलनविषयक तरलता प्रदान केली जाते.
केंद्रीय बँक खुल्या बाजारात सरकारी कर्जरोखे/बॉन्ड/समभाग यांची खरेदी किंवा विक्री करू शकते. केंद्रीय बँक स्पष्ट केलेल्या कालावधीसाठी ठेव म्हणून पैसे देते आणि संकलितपणे दुय्यम म्हणून पात्र मालमत्ता घेते. केंद्रीय बँक चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्राथमिक साधन म्हणून OMOचा वापर करते.
RBI विषयी
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनी त्याच्या कार्यपद्धती संदर्भात शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतले.
RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उप गव्हर्नर नियुक्त केले जातात. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 13 March 2019 Marathi |
13 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी
अमेरिका देशाबाहेरील त्यांची इमिग्रेशन सेवा कार्यालये बंद करण्याच्या मार्गावर
संयुक्त राज्ये अमेरिकेच्या सरकारने देशाबाहेर कार्यरत असलेली त्यांची इमिग्रेशन सेवा कार्यालये बंद करण्याच्या दिशेने पावले उचललेली आहे.अमेरिकेच्या सिटिजनशीप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस या विभागाने स्पष्ट केलेल्या माहितीनुसार, सरकार 20 देशांमधील त्यांची कार्यालये बंद करण्यासंबंधीच्या चर्चेच्या प्रारंभिक टप्प्यावर आहे. देशांतर्गत प्रश्नांना संबोधित करण्यासाठी आणि त्यामधून वर्षभरात लाखो डॉलर्सची रक्कम बचत करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात आहे.
सद्यस्थितीत ब्रिटन, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, इटली, भारत, फिलीपिन्स, चीन आणि इतर देशांमध्ये अमेरिकेची इमिग्रेशन सेवा कार्यालये असून तिथे जवळपास 70 कर्मचारी कार्यरत आहेत.
संयुक्त राज्ये अमेरिका (USA/US/अमेरिका) हा उत्तर अमेरिका उपखंडातला एक देश आहे. वॉशिंग्टन डी.सी. हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि यूएस डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.
No comments:
Post a Comment