Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, September 22, 2018

    विद्युतचुंबकत्व आणि विद्युत मोटार असे शोध लावणारे विश्वविख्यात भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांची जयंती...

    Views

    विद्युतचुंबकत्व आणि विद्युत मोटार असे शोध लावणारे विश्वविख्यात भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांची जयंती...




    ------------------------------------------
    आपण शाळेत असताना विज्ञानातील विद्युतशास्त्रात जे ‘फॅरेडेचे नियम’ शिकलो तो विश्वविख्यात भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे हा इंग्लंडचा. लंडनच्या बकाल वस्तीत एका गरीब घरात त्याचा जन्म झाला. बालपणी बोबडे बोलणारा फॅरेडे स्वत:चे आडनाव ‘फॅवाडे’ असा उच्चारायचा. शाळेतील मित्र त्याची टर उडवायचे. शिक्षकांकडे यावर काही उपाय नव्हता. बाराव्या वर्षी नाईलाजाने आईच्या सांगण्यावरून त्याने शाळा सोडली. फॅरेडेचे औपचारिक शिक्षण येथेच थबकले.

    पुस्तक बांधणीच्या एका दुकानात तेराव्या वर्षी फॅरेडे नोकरी करू लागला. रोज तो कैक पुस्तकांची बांधणी करी. रात्री मात्र तीच पुस्तके तो वाचत असे. एके दिवशी त्याच्या वाचनात आलेल्या एका पुस्तकामुळे तो ‘विद्युतशास्त्राच्या’ प्रेमात पडला आणि ‘विद्युतशास्त्र’ हे त्याचे जीवनसाथी बनले.

    वयाच्या बाविशीपर्यंत गरिबीने फॅरेडेची पाठ सोडली नाही. १८१२ सालची गोष्ट! एके दिवशी मित्राने भेट दिलेले तिकीट घेऊन तो रॉयल इन्स्टिटय़ूटच्या (लंडन) रसायनशास्त्रज्ञ हम्फ्री डेव्हीच्या व्याख्यानास गेला. आकाशस्थ विजेवरील संशोधनावर तो बोलला. त्याचे व्याख्यान ऐकून प्रभावित झालेल्या फॅरेडेने त्या व्याख्यानाची टिप्पणे काढली. आपल्या टिप्पणांची बांधणी करून त्याचे जणू एक पुस्तकच तयार केले. तेव्हापासून आपण शास्त्रज्ञ व्हायचे असे त्याने ठरवले. गरिबी व अपुरे शिक्षण यामुळे डेव्ही हेच आपले गुरू झाल्यास ते शक्य होईल. पण यास डेव्ही तयार नसल्याने, फॅरेडेने निराश न होता, आपले प्रयत्न चालू ठेवले.

    काही वर्षानी प्रयोग शाळेत रासायनिक स्फोट झाल्याने, डेव्ही अंध झाला. परिणामी हुशार मदतनीसाची गरज भासू लागल्याने, त्याने फॅरेडेची सहाय्यक म्हणून नियुक्ती केली. प्रयोग शाळेची सफाई करताना, फॅरेडेच्या प्रयोगकार्याचे निरीक्षण करत, अभ्यास करत, विज्ञान क्षेत्रात त्याने आगेकूच केली.

    एके दिवशी डेव्ही हा आपला सहकारी विल्यम वॉलस्टॉन याच्यासमवेत ‘विद्युतचुंबकत्त्वावर’ प्रायोगिक संशोधन करताना, विद्युतप्रवाह सोडलेली तार चुंबकाप्रमाणे का कार्य करते? याचा शोध घेत होता. दिवस चालले होते, पण उत्तर सापडत नव्हते. वैतागून फॅरेडेला डेव्ही म्हणाला, झाडू मारून झाल्यावर जरा तुझा या प्रयोगास हात लागू दे. डेव्हीचे उपरोधिक बोलणे एके दिवशी त्यांच्याच अंगाशी आले.

    काही दिवसात, फॅरेडेने डेव्हीच्या प्रश्नाचे उत्तर तर शोधलेच, पण त्याही तो पुढे गेला. ‘यांत्रिकी ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते.’ या तत्त्वावर आधारलेली त्याने पहिली ‘इंडक्शनमोटर’ तयार केली. परिणामी कालांतराने या उपकरणाचा वापर करून पंखा, शिवणयंत्र, चारचाकी, आगगाडी, विमान ही प्रगत साधने तयार केली. पण यास कारणीभूत ठरले डेव्हीचे फॅरेडेला चिडवणे.

    या शोधामुळे एका रात्रीत फॅरेडे जगाला माहीत झाला. त्यावेळी ना कोणी विचारले, त्याचे शिक्षण ना मिळकत. या शिष्याच्या पराक्रमावर डेव्हीगुरुजी खूश होण्याऐवजी ते जळफळू लागले. फॅरेडेच्या नावाने बोटे मोडू लागले. आपल्या प्रगतीआड येणा-या फॅरेडेला दूर करण्यासाठी बव्हेरियम काचेपासून दूरदर्शक दुर्बीण (टेलिस्कोप) व सुक्ष्मदर्शक (मायक्रोस्कोप) केली जायची. त्या काचेतील घटक शोधण्याची जबाबदारी ही डेव्हीने फॅरेडेवर सोपवली. हे काम तो यशस्वी करू शकेल असे मनातून डेव्हीला वाटत नव्हते. डेव्हीच्या मदतीशिवाय फॅरेडेने चिकाटीने चार वर्षे काम करूनही त्याला काचेच्या तुकडय़ातील घटक शोधता आले नाहीत. तो तुकडा मात्र त्याने कपाटात जपून ठेवला.

    १८२९ साली, डेव्हीच्या झालेल्या मृत्यूनंतर फॅरेडे हे डेव्हीच्या प्रयोगशाळेचे प्रमुख झाले. गतिमान चुंबक हा विद्युतप्रवाह निर्माण करतो, यातूनच त्याने विद्युज्जनित्राचा(इलेक्ट्रिक मोटर) शोध लावला. परिणामी भौतिकशास्त्रात फॅरेडेचे नाव कायमचे नोंदले गेले.

    १८४०च्या सुमारास फॅरेडेला विस्मरणाचा विकार जडला. तरी चिकाटीने त्याने संशोधन चालू ठेवले. ‘प्रकाशाचा विद्युतचुंबकत्त्वाशी असलेला संबंध’ त्याला शोधायचा होता. या संशोधनात, बहेरियन काचेचा तुकडा वापरून, चुंबकसान्निध्यात प्रकाश भिन्न दिशांनी न विखुरता, एकतरंगी होऊन एका दिशेने जातो’ हे सिद्ध केले आणि ‘ध्रुवीकरण’ (पोलरायझेशन) या संकल्पनेचा जन्म झाला.

    ‘लोहकिसाजवळ चुंबक नेल्यामुळे त्या किसाची वर्तुळाकार नक्षी तयार होते.’ हे निरीक्षण जेम्स मॅक्सवेल या गणिती भौतिकशास्त्रज्ञाच्या सहयोगाने व त्याच्या मॅक्सवेल समीकरणाच्या आधारे फॅरेडेने सचित्र व सोदाहरण स्पष्ट केले.

    फॅरेडेच्या जीवनकार्याचे कौतुक करताना डॉ. कलाम आदराने म्हणतात, फॅरेडेच्या शोधावर आधारित आजच्या इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन सिस्टिम या आधारलेल्या आहेत. या शोधामुळे तयार झालेल्या, दूरस्थ आकाशगंगांमधील एलियन्सशी संवाद साधता येईल. कष्ट प्रामाणिकपणा व चिकाटीपणाच्या बळावर, फॅरेडेने अशक्यप्राय बाबी शक्य करून दाखवल्या. आव्हानांचा स्वीकार नवसंधी म्हणून त्यांनी केला. ही बाब तरुण संशोधकांना प्रेरक व अनुकरणीय वाटेल.

    No comments:

    Post a Comment