Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, March 5, 2019

    Current affairs 5 March 2019 Marathi | 5 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 5 March 2019 Marathi |   5 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी


    अमेरिका भारताचा ‘प्राधान्यकृत व्यापार दर्जा’ काढून घेण्याच्या विचारार्थ

    भारत आणि टर्की यांना दिलेला ‘प्राधान्याची सर्वसाधारण प्रणाली (GSP) कार्यक्रमाच्या अंतर्गत लाभार्थी विकसनशील देश’ म्हणजेच ‘प्राधान्यकृत व्यापारासंबंधीचा हा दर्जा काढून घेण्याच्या विचारार्थ असल्याची घोषणा अमेरिकेच्या सरकारने केली आहे.
    हा दर्जा काढून घेतल्यास त्याचा भारताच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
    अलीकडेच भारताकडून USD 5.6 अब्जचा माल अमेरिकेत दाखल झाला. प्राधान्यकृत व्यापार दर्जामुळे करात मिळालेल्या सूटमुळे ही निर्यात ड्यूटी-फ्री आहे. त्यामुळे देशाच्या उत्पन्नात तूट निर्माण होते.
    संयुक्त राज्ये अमेरिका (USA/US/अमेरिका) हा उत्तर अमेरिकेतला एक देश आहे. वॉशिंग्टन डी.सी. हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि अमेरिकन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.

    जम्मू व काश्मीरच्या जमात-ए-इस्लामी गटावर 5 वर्षांसाठी बंदी घातली

    भारत सरकारने दिनांक 1 मार्च 2019 रोजी जम्मू व काश्मीर राज्याच्या ‘जमात-ए-इस्लामी’ गटावर बंदी घातली आहे.
    या सामाजिक-राजकीय धार्मिक संघटनेवर लादलेले बंदीनंतर पोलीसांनी 250 हून अधिक नेत्यांची आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली.
    सय्यद अबूल अला मौदूदी हा ‘जमात-ए-इस्लामी’ गटाचा संस्थापक आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 5 March 2019 Marathi |   5 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    भारत-बांग्लादेश सीमेवर BOLD–QIT प्रकल्पाचे उद्घाटन

    केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग यांनी आसामच्या धुबरी जिल्ह्यात भारत-बांग्लादेश सीमेवर CIBMS (कॉम्प्रिहेन्सीव इंटीग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टम) कार्यक्रमाच्या अंतर्गत BOLD–QIT (बॉर्डर इलेक्ट्रॉनिकली डॉमिनेटेड QRT इंटरसेप्शन टेक्निक) प्रकल्पाचे उद्घाटन केले.
    सीमेवरील सुरक्षा भक्कम करण्यासाठी ही यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. ही योजना सीमा सुरक्षा दलाला (BSF) ब्रह्मपुत्रा नदी आणि त्याच्या उपनद्यांच्या अविभाज्य नदीच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदकांसह सीमा सुसज्ज करण्यासाठी सक्षम करते.
    बांग्लादेश हा बंगालचा उपसागरालगत असलेला भारताच्या पूर्वेकडे असलेला दक्षिण आशियाई देश आहे. ढाका ही देशाची राजधानी असून चलन बांग्लादेशी टाका हे आहे. भारत बांग्लादेशासोबत 4,096 किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा सामायिक करते.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 5 March 2019 Marathi |   5 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय सर्वसाधारण गतिशीलता कार्डचे (NCMC) अनावरण

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वदेशी विकसित केलेल्या राष्ट्रीय सर्वसाधारण गतिशीलता कार्डचे (National Common Mobility Card -NCMC) अनावरण करण्यात आले आहे.
    हे कार्ड रूपे कार्डद्वारे समर्थित आहे. तसेच बँकद्वारे डेबिट/क्रेडिट/प्री-पेड कार्ड उत्पादनांच्या व्यासपीठावर सादर केलेले कार्ड आहे. याला ‘एक राष्ट्र एक कार्ड’ हे नाव देण्यात आले आहे.
    हे कार्ड लोकांना विविध प्रकारचे वाहतूक शुल्क देण्यास सक्षमता प्रदान करते, ज्याद्वारे प्रवासादरम्यान देशभरात कुठेही कार्डधारक बसचे तिकीट, टोल, पार्किंग शुल्क, खरेदारी तसेच पैसेदेखील काढू शकणार.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 5 March 2019 Marathi |   5 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    ISROचा नवा "युवा वैज्ञानिक कार्यक्रम"

    शालेय विद्यार्थ्यांमध्ये संशोधन क्षेत्रात आवड निर्माण व्हावी या उद्देशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) या वर्षापासून "युवा वैज्ञानिक कार्यक्रम" (YUva VIgyani KAryakram - युविका) नावाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा दिनांक 4 मार्च 2019 रोजी आरंभ केला.
    अंतराळात शालेय विद्यार्थ्यांचे स्वारस्य जागृत करण्यासाठी अंतराळ क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञान, शास्त्र आणि अनुप्रयोगांबाबतचे मूलभूत ज्ञान देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
    भारत सरकारच्या "जय विज्ञान, जय अनुसंधान" या दृष्टीकोनाच्या अंतर्गत तयार करण्यात आलेला हा दोन आठवडे चालणारा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आहे, ज्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. दरवर्षी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून CBSE, ICSE आणि राज्य अभ्यासक्रमांमध्ये शिकणार्‍या प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची निवड करण्याचे प्रस्तावित आहे. इयत्ता आठवी पूर्ण करणार्‍या आणि सध्या नववीत असलेल्या विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
    ISRO चा प्रवास
    भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे. दिनांक 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना करण्यात आलेल्या ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) या संस्थेला बदलले.
    ISRO ने 1999 सालापासून व्यावसायिक शाखेच्या मदतीने परदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचा कार्यक्रम सुरू केला. ISRO ने साधलेल्या प्रशंसनीय यशाचा आढावा पुढीलप्रमाणे आहे -
    • 19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या मदतीने आपला पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.
    • 1980 साली पुर्णपणे स्वदेशी बनावटीच्या SLV-3 प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.
    • 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली. या मोहिमेमधून चंद्राच्या ध्रुव क्षेत्रात पाणी असण्याची पुष्टी केली.
    • ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात आणि अगदी कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.
    • फेब्रुवारी 2017 मध्ये एकाचवेळी 7 देशांचे 104 उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा 37 उपग्रहांचा विक्रम मोडीत काढला.
    • ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV) आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (GSLV) विकसित केले.
    • सॅटलाइट सुचालन प्रणाली ‘गगन’ आणि क्षेत्रीय सुचालन उपग्रह प्रणाली ‘IRNSS’ विकसित केले.
    • यानाला पुढे नेणारे अत्यावश्यक असलेले स्वदेशी ‘क्रायोजेनिक इंजन’ तयार केले.


    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 5 March 2019 Marathi |   5 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी


    पंतप्रधानांच्या हस्ते अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातच्या अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रथम टप्प्याचे उद्घाटन केले करण्यात आले आणि द्वितीय टप्प्यासाठी कोणशीला ठेवण्यात आली आहे.
    प्रकल्पाच्या प्रथम टप्प्यात एकूण 40.03 किलोमीटर एवढ्या लांबीच्या मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत, ज्यात 6.5 किलोमीटर अंडरग्राऊंड रेलमार्ग आहे. यातून वस्त्रल आणि थेलतेज गम या दोन ठिकाणांना जोडले गेले आहे.
    द्वितीय टप्प्यात दोन मार्गिका तयार केल्या जाईल, ज्याची एकूण लांबी 28.254 किलोमीटर एवढी असेल. त्यामुळे ग्यासपूर डेपोट ते मोटेरा क्रिडामैदान या दोन ठिकाणांना जोडले जाईल आणि अहमदाबाद व गांधीनगर या दोन शहरांमध्ये वाहतुकीला चालना मिळणार.  

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 5 March 2019 Marathi |   5 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी


    डॅन कोलोव्ह निकोला पेट्रोव्ह कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी 4 पदक जिंकले

    बल्गेरियात खेळल्या गेलेल्या ‘डॅन कोलोव्ह निकोला पेट्रोव्ह स्पर्धा 2019’ या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी दोन सुवर्णपदकांसह चार पदके जिंकली आहेत.
    पुरुष गटात बजरंग पुनिया (65 किलो) तर महिलांमध्ये पूजा धांडा (59 किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. बजरंगने 65 किलो फ्रीस्टाईल गटाच्या अंतिम लढतीत अमेरिकेच्या जॉर्डन ऑलिव्हरचा पराभव केला.
    साक्षी मलिक (65 किलो फ्रीस्टाईल), संदीप तोमर (पुरुषांमध्ये 61 किलो फ्रीस्टाईल गटात) यांनी स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.


    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 5 March 2019 Marathi |   5 मार्च 2019 करेंट अफेयर्स मराठी

    No comments:

    Post a Comment