Current affairs | Evening News Marathi
Current affairs 24 February 2019 Marathi | 24 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
दिल्लीच्या रहिवासींचे दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे
‘दिल्ली 2018-2019’ या शीर्षकाखाली केल्या गेलेल्या आर्थिक सर्वेक्षणातून पुढील बाबी दिसून आल्या आहेत –
- दिल्लीच्या रहिवासींचे दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे.
- 2018-19 या आर्थिक वर्षात दिल्लीचे सध्याचे दरडोई उत्पन्न 3,65,529 रुपये एवढे आहे. तर, राष्ट्रीय दरडोई उत्पन्न 1,25,397 रुपये इतके आहे.
- 2017-18 या आर्थिक वर्षात दिल्ली सरकारच्या कर संकलनात 14.7% वाढ नोंदविली गेली आहे, जी 2016-17च्या तुलनेत 3.03% एवढी वाढ आहे.
- 2018-19 या आर्थिक वर्षात, चालू दरानुसार दिल्लीचे सकल राज्य स्थानिक उत्पन्न (GSDP) 7,79,652 कोटी रुपये एवढे होते, जे की गेल्या वर्षाच्या तुलनेत 12.98 टक्क्यांनी अधिक आहे.
- दिल्ली सरकारवर असलेल्या कर्जाचे प्रमाण 2017-18 या आर्थिक वर्षात सकल राज्य स्थानिक उत्पन्न (GSDP) याच्या केवळ 4.86% एवढेच होते, जे 33,569 कोटी रुपये राहिले.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 24 February 2019 Marathi | 24 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
राजकुमारी रिमा बिंत बंदार: सौदी अरबची पहिली महिला राजदूत (अमेरिकेसाठी)
सौदी अरबच्या सरकारने राजकुमारी रिमा बिंत बंदार यांची अमेरिकेसाठी सौदी अरबच्या राजदूत म्हणून निवड केली आहे.
या नियुक्तीसह राजकुमारी रिमा बिंत बंदार या सौदी अरबच्या पहिल्या महिला राजदूत ठरल्या आहेत. ही निवड राजकुमार खालिद बिन सलमान यांच्या जागी केली गेली आहे.
सौदी अरब हा एक आखाती देश आहे, ज्याने अरब खंडाचा 80% भाग व्यापलेला आहे. हा जगातला सर्वात मोठा तेल निर्यातदार आहे. रियाध ही देशाची राजधानी आहे आणि सौदी रियाल हे चलन आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 24 February 2019 Marathi | 24 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
2040 सालापर्यंत गंगा-किनारी राज्यांमधील नापिकीमध्ये तीन पटीने वाढ होणार
जागतिक बँकेच्या मदतीने भारत सरकारच्या केंद्रीय जल आयोगाने केलेल्या एका अभ्यासामधून असे दिसून आले आहे की, सन 2019 ते सन 2040 या कालावधीत गंगा नदीच्या किनार्यालगत असलेल्या राज्यांमध्ये नापिकीमध्ये तीन पटीने वाढ होणार आहे तसेच काही राज्यांच्या बाबतीत पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेत 39 टक्क्यांनी वाढ होणार.
अभ्यासानुसार जर आता कोणताही हस्तक्षेप केला गेला नाही तर -
- उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये सध्याच्या पातळीच्या तुलनेत 2040 साली सिंचनाच्या पाण्यात अनुक्रमे 28%, 10%, 10% आणि 15% घट होणार.
- पेयजलाच्या प्रमाणात मध्यप्रदेशात 39%, दिल्लीत 22% आणि उत्तरप्रदेशात 25% घट दिसून येणार.
- भूजळाच्या वापराचे प्रमाण दुप्पटीपेक्षा जास्त होण्याचे अपेक्षित आहे.
केंद्रीय जल आयोग (CWC) बाबत
केंद्रीय जल आयोग (CWC) जलस्रोत क्षेत्रामधली भारताची एक प्रमुख तांत्रिक संघटना असून सध्या ते जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालयाशी संलग्न असलेले कार्यालय म्हणून कार्यरत आहे. याची 1945 साली स्थापना करण्यात आली.
हे मंडळ देशातल्या जलस्रोतांचा कार्यक्षम वापर करण्यासंबंधीच्या योजना तयार करण्यास व राबविण्यास जबाबदार आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 24 February 2019 Marathi | 24 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
मनप्रीत सिंग: AHFचा ‘2018 या वर्षाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू’
भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग ह्याला आशियाई हॉकी महासंघाकडून (AHF) ‘2018 या वर्षाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू (पुरुष)’चा पुरस्कार (Player of the Year) देवून सन्मानित करण्यात आले आहे.
शिवाय भारतीय महिला संघाची स्ट्रायकर लालरेम्सीआमी हिला ‘वर्षाचा उदयोन्मुख खेळाडू (महिला)’चा पुरस्कार दिला गेला आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघाला ‘2018 या वर्षातले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन’चा पुरस्कार (Best Performance) मिळाला.
आशियाई हॉकी महासंघ (AHF) बाबत
आशियाई हॉकी महासंघ ही आशियातली मैदानी हॉकी खेळासाठीची एक प्रशासकीय संस्था आहे. वर्तमानात याच्या 31 सदस्य संघटना आहेत. ही संस्था आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाशी संलग्न आहे. 1958 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. क्वालालंपुर (मलेशिया) येथे याचे मुख्यालय आहे.
तेंग्कू अब्दुल्ला सुलतान अहमद शाह हे संस्थेचे वर्तमान अध्यक्ष आहेत.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 24 February 2019 Marathi | 24 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
NITI आयोगातर्फे ‘भारतीय बँकिंगचे भविष्य’ विषयावरील परिषद आयोजित
दिनांक 22 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्लीत "भारतीय बँकिंगचे भविष्य" या विषयावरील परिषद संपन्न झाली.
फाऊंडेशन फॉर इकनॉमिक ग्रोथ अँड वेलफेयर (EGROW फाऊंडेशन) या ना-नफा संस्थेच्या भागीदारीने भारताच्या राष्ट्रीय परिवर्तनीय भारत संस्था (NITI) आयोगाने या परिषदेचे आयोजन केले होते.
या परिषदेत भारतातल्या बँकिंग क्षेत्रात होत असलेली वाढ तसेच भारतीय अर्थव्यवस्थेवर वाढत्या कर्जाचा भार याबाबत असलेल्या विविध पैलूंबाबत अंतर्दृष्टी प्रदान करणारी चर्चा केली गेली.
भारतीय बँकिंग प्रणाली
नागरिक, व्यापारी, शेतकरी, व्यवसायिक, उद्योजक, सरकार, शेयर मार्केट आणि देशी-परदेशी संस्था यांच्याशी आर्थिक व्यवहार करणार्या संस्थेस बँक म्हणतात.
भारतातल्या बँकांचे प्रकार -
- पेमेंट बँक
- व्यापारी बँक (शेड्यूल्ड बँक आणि नॉन शेडयूल्ड बँक असे दोन प्रकार)
- शेड्यूल्ड बँक (1934 सालच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कायद्यात दुसर्या क्रमांकाच्या शेड्यूल्डमध्ये नाव असलेल्या बँका, उदा. SBI आणि तिच्या उपबँका, HDFC बँक)
- नॉन-शेड्यूल्ड बँक (उदा. जम्मू अँड काश्मीर बँक)
- सहकारी बँक (नागरी आणि गैरनागरी)
- विभागीय/प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB) (उदा. महाराष्ट्र ग्रामीण बँक)
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 24 February 2019 Marathi | 24 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
गोरखपूरमध्ये PM-KISAN योजनेचा शुभारंभ करण्यात आला
दिनांक 24 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेशाच्या गोरखपूर शहरात ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना (ऊर्फ पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना /PM-KISAN) याचा शुभारंभ करण्यात आला.
या योजनेच्या अंतर्गत, 2 हेक्टर क्षेत्रफळापर्यंत स्वमालकीचा भूखंड असलेल्या छोट्या व किरकोळ शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6000 रुपये अनुदान दिले जाणार. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली जाईल.
योजनेविषयी
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM-KISAN) ही केंद्र सरकारची योजना आहे. पात्र लाभार्थींना आर्थिक मदत पुरविण्याच्या उद्देशाने दिनांक 1 डिसेंबर 2018 रोजी ही योजना देशात सुरू करण्यात आली.
भारतीय खते महामंडळ (Fertilizer Corporation of India) तर्फे ही योजना राबविण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment