Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, February 19, 2019

    Current affairs 19 February 2019 Marathi | 19 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219
    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 19 February 2019 Marathi | 19 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    मनुष्य आणि प्राण्यांमध्ये प्रतिजैविकांच्या नियंत्रित वापरासाठी भारत सरकारचा 'वन हेल्थ' उपक्रम

    मनुष्य आणि प्राणी अश्या दोन्हींचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी त्यांना दिल्या जाणार्‍या प्रतिजैविकांचा नियंत्रित वापर करण्यासाठी भारत सरकारने ‘वन हेल्थ' उपक्रम सुरू करण्याची योजना आखली आहे. प्रस्तावित योजनेनुसार, जैवतंत्रज्ञान विभाग आणि भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांच्यात एका करार झाला आहे, ज्याच्या अंतर्गत लसीकरणामधून प्रतिबंध केल्या जाऊ शकणार्‍या रोगांना संबोधित करण्यासाठी "अनिवार्य" ‘राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम’ चालविला जाणार आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 19 February 2019 Marathi | 19 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    अणुऊर्जासह अन्य क्षेत्रात सहकार्यासाठी भारताने अर्जेंटिनासोबत 10 करार केलेत

    अर्जेंटिनाचे राष्ट्रपती मॉरीशीओ मॅक्री यांच्या भारताच्या राजकीय भेटीदरम्यान दिनांक 18 फेब्रुवारी 2019 रोजी दहा करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या. नागरी अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्यासाठी भारताचे वैश्विक अणुऊर्जा भागीदारी केंद्र  (GCNEP) आणि अर्जेंटिनाचे CNEA यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या झाल्या.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 19 February 2019 Marathi | 19 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    18 राज्यांमधील धरणांच्या पुनरुत्थानासाठी जागतिक बँकेकडून 11,000 कोटी रुपयांचे कर्ज

    पुढील 10 वर्षांमध्ये 18 राज्यांमधील 733 मोठ्या धरणांच्या संरचनेबाबत सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या परिचालन कामगिरीत वाढ करण्यासाठी भारताला 11,000 कोटी रुपयांचे कर्ज प्रदान करण्यासाठीच्या प्रस्तावाला जागतिक बँकेकडून मंजूर करण्यात आले आहे. 2020 सालापर्यंत जागतिक बँकेकडून समर्थित भारताच्या ‘धरण पुनर्वसन आणि दुरूस्ती प्रकल्प’ (DRIP) अंतर्गत हा निधी वापरला जाणार आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 19 February 2019 Marathi | 19 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    अमेरीकेमधील राष्ट्रीय आणीबाणीच्या मुद्द्यावरून 16 राज्यांनी राष्ट्रपती ट्रम्प यांच्या विरोधात खटला दाखल केला

    मेक्सिकोलगत असलेल्या सीमेवर भिंत उभारण्यासाठी निधीबाबत दिलेल्या वचनाला पूर्ण करण्यासाठी देशात लागू केलेल्या राष्ट्रीय आणीबाणीच्या मुद्द्यावरून अमेरीकेच्या 16 राज्य सरकारांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात कायदेशीर खटला दाखल केला आहे. राष्ट्रीय आणीबाणीमुळे आता ट्रम्प यांना पेंटागॉन आणि इतर योजनेसाठीचा संकल्पित निधी इतरत्र वापरण्यासाठी संसदेची मंजुरी घ्यावी लागणार नाही.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 19 February 2019 Marathi | 19 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    हवाई परिवहन क्षेत्रात भारतीयांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी सिंगापूरसोबत करार

    हवाई परिवहन क्षेत्रात भारतीयांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी सिंगापूरसोबत करार 20-24 फेब्रुवारी या कालावधीत बेंगळुरूमध्ये होणार्‍या ‘एरो इंडिया शो 2019’ या कार्यक्रमादरम्यान हवाई परिवहन क्षेत्रात भारतीय युवक-युवतींना कौशल्य प्रदान करण्याच्या उद्देशाने प्रशिक्षणासाठी भारत सिंगापूरसोबत एक करार करणार आहे. भारताच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाची (NSDC) एरोस्पेस व एव्हिएशन क्षेत्र कौशल्य परिषद सिंगापूर पॉलिटेक्निक आणि सिंगापूरच्या एका खासगी कंपनीसोबत हा करार करणार आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 19 February 2019 Marathi | 19 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    भारताने मोरोक्कोसोबत चार सामंजस्य करार केलेत

    भारताच्या परराष्ट्र कल्याण मंत्री सुषमा स्वराज या मोरोक्को देशाच्या दौर्‍यावर असताना दिनांक 18 फेब्रुवारी 2019 रोजी प्रतिनिधिमंडळाच्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी चार सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या केल्या. दहशतवाद-विरोधी, गृहनिर्माण व मानवी वसाहत, बिजनेस व्हिसासंबंधी प्रक्रियेत सुलभता, युवा कल्याण या क्षेत्रात सहकार्यासाठी करार झाले आहेत.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 19 February 2019 Marathi | 19 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    राष्ट्रपतींच्या हस्ते वर्ष 2014, 2015, 2016 साठी टागोर पुरस्कारांचे वितरण

    भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी वर्ष 2014, वर्ष 2015 आणि वर्ष 2016 साठी ‘सांस्कृतिक सलोख्यासाठीच्या टागोर पुरस्कार’चे वाटप केले. वर्ष 2014 साठी राजकुमार सिंघजित सिंग (मणीपूरी नर्तक), वर्ष 2015 साठी बांग्लादेशची ‘छायानट’ ही सांस्कृतिक संस्था, वर्ष 2016 साठी राम वाणजी सुतार (शिल्पकार) यांना हा पुरस्कार दिला गेला.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 19 February 2019 Marathi | 19 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी


    भारतात प्रथमच डीझेलवर चालणार्‍या लोकोमोटिव्हला विजेवर चालणार्‍यामध्ये रूपांतरित केले गेले

    भारतात प्रथमच डीझेलवर चालणार्‍या लोकोमोटिव्हला विजेवर चालणार्‍यामध्ये रूपांतरित केले गेले आणि या रूपांतरित विद्युत लोकोमोटिव्ह जुळ्या इंजिनचे 18 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीत अनावरण करण्यात आले आहे. 10 हजार हॉर्स पॉवर क्षमता असलेले हे रुपांतरित लोकोमोटिव्ह इंजिन सेवेत आल्याने आता इतर डीझेल-आधारित गाड्यांना देखील लवकरच बदलले जाणार आहे.

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 19 February 2019 Marathi | 19 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी

    No comments:

    Post a Comment