Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, January 3, 2019

    Evening News : 3 January 2019 Marathi-Current Affairs | इवनिंग न्यूज़ 3 जानेवारी 2019 मराठी_करंट अफेयर्स

    Views
    20181211_220219
    Marathi Evening News / Current Affairs


    के. पी. जॉर्ज: अमेरिकेमध्ये टेक्सास येथील फोर्ट बेंड काउंटी न्यायाधीश



    Marathi Evening News / Current Affairs

    के. पी. जॉर्ज: अमेरिकेमध्ये टेक्सास येथील फोर्ट बेंड काउंटी न्यायाधीश

    भारतीय मूळ असलेल्या अमेरिकेमधील के. पी. जॉर्ज यांना टेक्सास येथील ‘फोर्ट बेंड काउंटी न्यायाधीश’ पदाची शपथ देण्यात आली आहे.
    यासोबतच के. पी. जॉर्ज हे अमेरिकेतल्या सर्वाधिक सांस्कृतिक विविधता असलेल्या प्रदेशाच्या कार्यालयात प्रथम पद धरण करणारी पहिली भारतीय-अमेरिकी व्यक्ती बनले आहेत.
    संयुक्त राज्ये अमेरिका (USA/US/अमेरिका) हा उत्तर अमेरिकेतला एक देश आहे. वॉशिंग्टन डी.सी. हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि अमेरिकन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.



    पोर्ट ब्लेअरचे वीर सावरकर विमानतळ अधिकृत ‘इमिग्रेशन तपास नाका’ म्हणून घोषित



    Marathi Evening News / Current Affairs

    पोर्ट ब्लेअरचे वीर सावरकर विमानतळ अधिकृत ‘इमिग्रेशन तपास नाका’ म्हणून घोषित

    सर्व प्रवाशांच्या प्रवासासाठी वैध प्रवासी दस्तऐवजांसह भारतात प्रवेश घेण्यासाठी / बाहेर जाण्यासाठी सुविधा म्हणून अंदमान-निकोबारच्या पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला अधिकृत ‘इमिग्रेशन तपास नाका’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
    इमिग्रेशन तपास नाक्याचा हेतू पूर्ण करण्यासाठी अंडमान आणि निकोबार पोलीस विभागाचे पोलिस अधीक्षक (CID) यांना 'नागरी अधिकारी' म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
    विमानतळापासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न तसेच आगमनासंबंधी ई-व्हिसा आणि व्हिसा सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.


    Marathi Evening News / Current Affairs

    बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलीनीकरणाला मंजुरी



    Marathi Evening News / Current Affairs

    बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना  बँकेच्या विलीनीकरणाला मंजुरी

    केंद्रीय मंत्रिमंडळाने बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना  बँकेच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. ही योजना दि. 1 एप्रिल 2019 पासून लागू होईल.
    निर्णयानुसार, हस्तांतरी (ज्याच्या नावावर संपत्ती किंवा कागदपत्रे हस्तांतरित केली आहेत अशी / transferee) बँक म्हणून बँक ऑफ बडोदा तर विजया बँक आणि देना बँक हस्तांतरक (transferor) बँका असतील.
    पुनर्रचना आणि प्रक्रिया  
    • योजना सुरु झाल्यानंतर हस्‍तांतरणकर्ता बँकांचे सर्व व्‍यवसाय हस्‍तांतरित बँकेला हस्‍तांतरित केले जातील आणि हस्‍तांतरित बँकेकडे सर्व व्‍यवसाय मालमत्ता, अधिकार, स्‍वामित्‍व, दावे,परवाने, मान्यता, अन्‍य विशेषा‍धिकार आणि सर्व संपत्ती, देणी, दायित्‍व असतील.
    • हस्‍तांतरणकर्ता बँकेचे सर्व स्‍थायी आणि नियमित अधिकारी किंवा कर्मचारी हस्‍तांतरित बँकेत अधिकारी आणि कर्मचारी असतील. हस्‍तांतरित बँकेत त्यांच्या सेवांसाठी दिले जाणारे वेतन आणि भत्‍ते हस्‍तांतरणकर्ता बँकांच्या वेतन आणि भत्त्यांपेक्षा कमी आकर्षक नसतील.
    • हस्‍तांतरित बँकांचे मंडळ हे सुनिश्चित करेल की हस्‍तांतरित होणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे हित सुरक्षित असेल.
    • हस्‍तांतरित बँक हस्‍तांतरणकर्ता बँकेच्या भागधारकांना समभाग अदला-बदली गुणोत्तरानुसार समभाग जारी करेल. यासंबंधी काही तक्रारी असतील तर त्या तज्ञ समितीच्या माध्यमातून मांडता येतील.
    विलीनीकरणाचा फायदा
    भारतातल्या बॅंकांचे हे पहिलेच त्रिपक्षीय विलीनीकरण असेल. विलीनीकरणांनंतर ही बँक देशातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी  सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनणार.
    विलीनीकरणामुळे  जागतिक पातळीवर मजबूत स्पर्धात्मक बँक तयार करण्यास मदत मिळेल आणि मोठ्या प्रमाणावर समन्वय साधण्यास सक्षम होईल. परस्परांचे बँकिंग जाळे, कमी खर्चाच्या ठेवी आणि तीन बँकांच्या सहायक संस्थांचा लाभ मिळेल आणि ग्राहक आधार, बाजार पोहोच, परिचालन कार्यक्षमता, अनेक उत्पादने आणि सेवा तसेच ग्राहकांच्या एकत्रित प्रवेशासाठी एकत्रित अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सहकार्य करण्याची क्षमता यात आहे.
    विलीनीकरणानंतर बँक वाढत्या अर्थव्‍यवस्थेच्या कर्जविषयक गरजा पूर्ण करणे, आघात सहन करणे आणि संसाधन वाढवण्याची क्षमता पूर्ण करण्यात उत्तम प्रकारे सज्ज असेल. बँकेचा वाढता व्यवसाय आणि नफा, व्‍यापक उत्‍पादन, तंत्रज्ञानाचा अवलंब शक्य होईल आणि व्यापक पोहोचच्या माध्यमातून खर्च कमी होईल, जोखीम व्यवस्थापन सुधारेल आणि आर्थिक समावेशकता वाढीला लागेल.
    विलीनीकरणामुळे जागतिक बँकांच्या तुलनेत मोठ्या बँकेची निर्मिती होईल इ भारतात आणि जगात स्पर्धा करायला सक्षम असेल. वैयक्तिक बँकांचे सामर्थ्य उदा. कमी खर्चात कासा ठेवीमध्ये देना बँकेची पोहोच, विजया बँकेचा नफा आणि भांडवल उपलब्‍धता तसेच बँक ऑफ बडोदाची व्‍यापकता, जागतिक जाळे, संचालन क्षमता आणि व्‍यापक उत्‍पादने आणि सेवा देण्याबाबत लाभ होईल.
    विलीनीकरणामुळे गुणवत्तेचे मोठे भांडार प्राप्‍त होईल आणि मोठा डाटाबेस मिळेल ज्याचा लाभ वेगाने डिजिटलाईज्ड होणाऱ्या बँकिंग प्रणालीत स्पर्धात्मक लाभ उठवण्यासाठी होईल. लोकांना मजबूत नेटवर्कच्या माध्‍यमातून व्‍यापक बँकिंग सेवा उपलब्ध होतील आणि कर्ज सहजपणे उपलब्ध होईल.



    Marathi Evening News / Current Affairs

    सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे निधन




    Marathi Evening News / Current Affairs

    सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे निधन

    क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे दि. 2 जानेवारी 2019 रोजी निधन झाले आहे. वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली.
    त्यांचा सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, बलविंदरसिंह संधू अशा अनेक खेळाडूंची कारकिर्द घडवण्यात मोठा वाटा होता.
    त्यांना भारत सरकारकडून 1990 साली क्रिडा क्षेत्रात प्रशिक्षकांना दिला जाणारा सर्वोच्च ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ देऊन सन्मान केला होता. शिवाय 2010 साली पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.


    Marathi Evening News / Current Affairs

    आसाम कराराच्या कलम 6 च्या अंमलबजावणीसाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यास मंजुरी




    Marathi Evening News / Current Affairs

    आसाम कराराच्या कलम 6 च्या अंमलबजावणीसाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यास मंजुरी

    केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘आसाम करारा’च्या कलम क्र. 6 याच्या अंमलबजावणीसाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यास तसेच करारातील काही निर्णय व बोडो समुदायाशी संबंधित काही बाबींनाही मंजुरी दिली आहे.
    सन 1979-1985 या काळात झालेल्या आसाम आंदोलनानंतर दि. 15 ऑगस्ट 1985 रोजी आसाम करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. कराराच्या कलम क्र. 6 अनुसार आसाम लोकांच्या सांस्‍कृतिक, सामाजिक, भाषिक ओळख आणि वारशाचे संरक्षण, प्रोत्साहन आणि जतन करण्यासाठी उचित घटनात्मक, कायदेशीर आणि प्रशासकीय उपाययोजना केल्या जातील.
    परंतु असे आढळून आले आहे की, आसाम कराराला 35 वर्षे उलटूनही कलम  क्र. 6 पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आलेले नाही. म्हणूनच मंत्रिमंडळाने एक उच्‍चस्‍तरीय समिती स्थापन करण्यास मंजुरी दिली, जी घटनात्मक, कायदेशीर आणि प्रशासकीय उपाययोजनांचे मूल्यांकन करेल.
    समिती सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून आसाममधील लोकांसाठी आसाम विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणासाठी जागांच्या संख्येचे विश्लेषण करेल.
    गृह मंत्रालय समितीची रचना आणि अटींसंदर्भात स्वतंत्र अधिसूचना जारी करेल. मंत्रिमंडळाने बोडो समुदायाशी संबंधित प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या विविध उपाययोजनांना देखील मंजुरी दिली आहे. बोडो करारावर 2003 साली स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. मंत्रिमंडळाने बोडो संग्रहालयासह भाषा व सांस्‍कृतिक अध्‍ययन केंद्राची स्‍थापना, कोकराझार येथील आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्राचे आधुनिकीकरण तसेच BTAD मार्गे जाणाऱ्या एका अतिजलद रेल्वे गाडीचे अरोनई एक्‍सप्रेस असे नामकरण करण्याच्या प्रस्तावांनाही मंजुरी दिली.


    Marathi Evening News / Current Affairs

    ‘व्यापार संघटना अधिनियम-1926’ मध्ये दुरुस्ती करण्यास मंजुरी




    Marathi Evening News / Current Affairs

    ‘व्यापार संघटना अधिनियम-1926’ मध्ये दुरुस्ती करण्यास मंजुरी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने व्यापार संघटनांच्या मान्यतेसंदर्भात तरतुदी करण्यासाठी ‘व्यापार संघटना अधिनियम-1926’ मध्ये दुरुस्ती करण्यास मंजुरी दिली आहे.
    कायद्यामधील दुरुस्तीमुळे केंद्र व राज्य पातळीवर व्यापार संघटनांना मान्यता दिली जाणार, त्रिपक्षीय संस्थांमध्ये कामगारांचे खरे प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे, सरकारकडून कामगारांच्या प्रतिनिधींची मनमानी नामनिर्देशन रोखणे आणि खटले आणि औद्योगिक अस्थिरता कमी करणे, अश्या बाबी सुलभ होतील.
    प्रस्तावित विधेयकामुळे सरकारद्वारे त्रिपक्षीय संस्थांमध्ये कामगारांच्या प्रतिनिधींचे नामांकन अधिक पारदर्शी होईल. म्हणून मान्यता प्राप्त व्यापार संघटना औद्योगिक सुसंवाद राखण्यासाठी जबाबदार असतील. केंद्र/राज्य पातळीवरील व्यापार संघटनांची मान्यता वेगवेगळ्या विभागांद्वारे अशा प्रकारच्या प्रक्रियांची लबाडी कमी करेल. मान्यताप्राप्त व्यापार संघटनांना केंद्रीय किंवा राज्य पातळीवर विशिष्ट भूमिका सोपवल्या जाऊ शकतात.


    Marathi Evening News / Current Affairs

    NHAची ‘राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण’ म्हणून पुनर्रचना करण्यास मंजुरी




    Marathi Evening News / Current Affairs

    NHAची ‘राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण’ म्हणून पुनर्रचना करण्यास मंजुरी

    प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी सध्याच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेची (NHA) राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) म्हणून पुनर्रचना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
    यानुसार सध्याची राष्ट्रीय आरोग्य संस्था विसर्जित होऊन त्याची जागा राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण घेणार. हे प्राधिकरण केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संलग्न राहणार.
    यासाठी नवा निधी मंजूर करण्यात आलेला नाही. मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आरोग्य संस्थेसाठी याआधी अर्थसंकल्पात मंजूर केलेला निधी या प्रस्तावित प्राधिकरणासाठी उपयोगात आणला जाईल.
    प्रधान मंत्री – जन आरोग्य योजना (PM-JAY) याची उत्तम अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. योजनेच्या सुलभ आणि त्वरित अंमलबजावणीसाठी एक प्रशासकीय मंडळ असणार आहे, ज्याचे अध्यक्ष केंद्र सरकारचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री असतील.


    Marathi Evening News / Current Affairs

    No comments:

    Post a Comment