Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, April 27, 2018

    २७ एप्रिल दिनविशेष | April 27 in History |२७ अप्रैल दिनविशेष

    Views
    विनोद खन्ना - (६ ऑक्टोबर १९४६ - २७ एप्रिल २०१७) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता, निर्माता व भारतीय राजकारणी होते.

    जागतिक दिवस


    • स्वातंत्र्य दिन: टोगो, सियेरा लिओन.
    • मुक्ति दिन: दक्षिण आफ्रिका.

    ठळक घटना/घडामोडी


    • ११२४: डेव्हिड पहिला स्कॉटलंडच्या राजेपदी.
    • १२९६: डनबारची लढाई - एडवर्ड पहिल्याने स्कॉटलंडचा पराभव केला.
    • १५०९: पोप ज्युलियस दुसर्‍याने व्हेनिसला वाळीत टाकले.
    • १५२१: माक्टानची लढाई - पृथ्वीप्रदक्षिणा करणारा फर्डिनांड मॅगेलन फिलिपाईन्समध्ये स्थानिक रहिवाश्यांशी लढताना मृत्युमुखी.
    • १६६७: अंध व हलाखीत दिवस काढणार्‍या जॉन मिल्टनने आपले महाकाव्य पॅरेडाईझ लॉस्ट १० ब्रिटीश पाउंडला विकले.
    • १७७३: भारतातील युद्धांच्या खर्चामुळे डबघाईला आलेल्या ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीला वाचवण्यासाठी ब्रिटीश संसदेने टी ऍक्ट करून कंपनीला उत्तर अमेरिकेशी व्यापार करण्याचा मक्ता दिला.
    • १८१०: बीथोव्हेनने आपले प्रसिद्ध पियानो संगीत फ्युर एलिझ रचले.
    • १८१३: १८१२चे युद्ध - अमेरिकेने कॅनडातील ऑन्टारियो प्रांताची राजधानी यॉर्क(आताचे टोरोन्टो शहर) काबीज केली.
    • १८६१: अब्राहम लिंकनने अमेरिकेत हेबिअस कोर्पसचा मूलभूत हक्क निलंबित केला. यामुळे सरकारला कोणासही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकण्यास मोकळीक मिळाली.
    • १८६५: अमेरिकन गृहयुद्धातील उत्तरेचे सुटलेले युद्धबंदी घेउन जाणारे जहाज सुलतानावर मिसिसीपी नदीत स्फोट. १,७०० ठार.
    • १९०८: लंडनमध्ये चौथे ऑलिंपिक खेळ सुरू.
    • १९०९: तुर्कस्तानच्या सुलतान अब्दुल हमीद दुसर्‍याची हकालपट्टी.
    • त्याचा भाउ मुरात पाचवा गादीवर.
    • १९४१: दुसरे महायुद्ध - जर्मनीचे सैन्य ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये शिरले.
    • १९४५: दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने फिनलंडमधून पळ काढला.
    • १९५०: दक्षिण आफ्रिकेत वंशभेद अधिकृत करणारा कायदा मंजूर झाला.
    • १९६०: टोगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
    • १९६१: सियेरा लिओनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
    • १९८१: झेरॉक्स पार्कने माउस वापरण्यास सुरुवात केली.
    • १९९२: सर्बिया व मॉन्टेनिग्रोने एकत्र येउन युगोस्लाव्ह प्रजासत्ताकची स्थापना केली.
    • १९९४: दक्षिण आफ्रिकेत निवडणुका. श्यामवर्णीय व्यक्तिंना मतदान करण्यास प्रथमतः मुभा.
    • २००५: एरबसने आपले ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक दाखवले.
    • २०११: अमेरिकेच्या दक्षिण भागातील सहा राज्यांत टोर्नॅडोंचा उद्रेक. ३०० पेक्षा ठार, कोट्यावधी अमेरिकन डॉलरचे नुकसान.

    जन्म/वाढदिवस


    • १७०१: चार्ल्स इमॅन्युएल तिसरा, सार्डिनीयाचा राजा.
    • १८२२: युलिसिस एस. ग्रँट, अमेरिकेचा १८वा राष्ट्राध्यक्ष.
    • १९२७: कोरेटा स्कॉट किंग, मार्टिन ल्युथर किंगची पत्नी.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


    • ६२९: अर्देशर तिसरा, पर्शियाचा राजा.
    • १५२१: फर्डिनांड मॅगेलन, पोर्तुगीझ शोधक.
    • १६०५: पोप लिओ अकरावा.
    • २०१७: विनोद खन्ना, भारतीय अभिनेता.

    No comments:

    Post a Comment