Views
जनार्दन गोंधळेकर - (२१ एप्रिल १९०९ - ४ डिसेंबर १९८१) हे मराठी चित्रकार होते. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या ख्यातनाम कलासंस्थेचे ते पहिले भारतीय डीन होते.
जागतिक दिवस
- स्थापना दिन: रोम.
- तिरादेन्तेस दिन: ब्राझिल.
- ग्राउनेशन दिन: रासतफारी.
ठळक घटना/घडामोडी
- ७५३: रोम्युलसने रोम शहराच्या उभारणीस सुरुवात केली.
- १७९२: ब्राझिलच्या स्वातंत्र्यसेनानी तिरादेन्तेसचा वध.
- १८३६: सान जेसिंटोची लढाई - सॅम ह्युस्टनच्या नेतृत्त्वाखालील टेक्सासच्या सैन्याने मेक्सिकन सैन्याला हरवले.
- १९१८: पहिले महायुद्ध - जर्मनीच्या रेड बेरोन नावाने ओळखला जाणाऱ्या लढाउ वैमानिक मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेनचा लढाईत अंत.
- १९३०: कोलंबस, ओहायो येथील तुरुंगात आग. ३२० ठार.
- १९३२: नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
- १९४४: फ्रांसमध्ये स्त्रीयांना मताधिकार प्राप्त.
- १९६०: ब्राझिलची राजधानी रियो दि जानेरोहून ब्राझिलियाला हलवण्यात आली.
- १९६६: इथियोपियाच्या हेल सिलासीचे जमैकात आगमन. रासतफारी पंथातील एक महत्त्वाची घटना.
- १९६७: ग्रीसमध्ये कर्नल जॉर्ज पापादोपोलसने सत्ता बळकावली.
- १९७५: व्हियेतनाम युद्ध - दक्षिण व्हियेतनामच्या राष्ट्राध्यक्ष जुआन लॉकचे सैगोनहून पलायन.
- १९८७: श्रीलंकेत कोलंबो येथे बॉम्बस्फोट. १०६ ठार.
- १९८९: चीनची राजधानी बैजिंगच्या त्येनानमेन चौकात १,००,००० विद्यार्थी जमण्यास सुरुवात झाली.
- १९९७: भारतीय पंतप्रधान म्हणून इंद्रकुमार गुजराल यांचा शपथविधी.
जन्म/वाढदिवस
- १७२९: कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी.
- १९०९: ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार.
- १९२६: एलिझाबेथ दुसरी, इंग्लंडची राणी.
- १९३६: जेम्स डॉब्सन, ख्रिस्ती धर्मप्रसारक.
- १९४४: ग्विटी नोविन, इराणी-कॅनेडियन चित्रकार, ग्राफिक संकल्पक.
- १९५०: शिवाजी साटम, भारतीय अभिनेता.
- १९७६: शब्बीर अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- ७४८: गेन्शो, जपानी सम्राज्ञी.
- १०१३: पोप अलेक्झांडर दुसरा.
- १५०९: सातवा हेन्री, इंग्लंडचा राजा.
- १९१०: सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन, अमेरिकन लेखक.
- १९१८: मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेन, जर्मन लढाउ वैमानिक.
- १९३८: मुहमंद इकबाल, भारतीय कवी.
- १९७१: फ्रांस्वा डुव्हालिये, हैतीचा हुकुमशहा.
- १९७३: आर्थर फॅडेन, ऑस्ट्रेलियाचा तेरावा पंतप्रधान.
- १९८५: टँक्रेडो दि अल्मेडा नीव्ह्स, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
No comments:
Post a Comment