Albert Einstein | अल्बर्ट आईन्स्टाईन- (१४ मार्च १८७९ - १८ एप्रिल १९५५) हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षतावादाचा सिद्धान्त, (विशेष सिद्धान्त, सामान्य सिद्धान्त), प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. त्यापैकी प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धान्तासाठी आणि "त्यांच्या सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी" इ.स. १९२१ साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन "सन्मानित" केले गेले. आइन्स्टाइन यांना त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानंतर जगभर अफाट प्रसिद्धी मिळाली आणि ते जगातील प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक बनले.आइन्स्टाइन यांनी सबंध आयुष्यात एकूण ३०० वैज्ञानिक शोधनिबंध आणि १५० गैरवैज्ञानिक निबंध प्रकाशित केले आहेत.[३] त्यांच्या अनेक महान बौद्धिक कामगिऱ्या आणि त्यांची विलक्षण कल्पनाशक्ती यामुळे अलौकिक बुद्धिमत्ता या अर्थाने आइन्स्टाइन हा शब्द वापरला जाऊ लागला.
International Day | जागतिक दिवस
------
ठळक घटना/घडामोडी
- १४८९: सायप्रसची राणी कॅथरिन कॉर्नारोने आपले राज्य व्हेनिसला विकले.
- १८८९: फर्डिनांड फोन झेपेलिनने बलूनचा पेटंट घेतला.
- १९००: गोल्ड स्टँडर्ड ऍक्ट मंजूर झाल्यावर अमेरिकेचे चलन अमेरिकन डॉलरची किंमत सोन्याशी निगडीत झाली.
- १९१३: पहिला भारतीय बोलपट आलम आरा (हिंदी चित्रपट) मुंबईमध्ये प्रदर्शित.
- १९१५: पहिले महायुद्ध - फॉकलंड द्वीपांजवळ रॉयल नेव्हीशी लढताना पराभव अटळ दिसल्यावर जर्मनीच्या लाइट क्रुझर एस.एम.एस. ड्रेस्डेनच्या खलाशी व अधिकार्यांनी नौका सोडून बुडवली.
- १९२६: कॉस्टा रिकामध्ये आगगाडी रियो व्हिरियामध्ये पडली. २४८ ठार, ९३ जखमी.
- १९३१: पहिला भारतीय बोलपट ‘आलमआरा’ नॉव्हेल्टी या सिनेमागृहात दाखवला गेला.
- १९३९: दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने चेकोस्लोव्हेकियाचे बोहेमिया व मोराव्हिया प्रांत बळकावले.
- १९४३: दुसरे महायुद्ध - पोलंडच्या क्राकोव शहरातील ज्यूंचे राहण्याचे ठिकाण बेचिराख करण्यात आले.
- १९७८: ऑपरेशन लिटानी - इस्रायेलच्या सैन्याने लेबेनॉनचा दक्षिण भाग बळकावला.
- १९७९: बीजिंगजवळ सीएएसी कंपनीचे सिडली ट्रायडेंट प्रकारचे विमान कोसळले. विमानातील १२ आणि जमिनीवरील ३२ व्यक्ती ठार. २०० पेक्षा अधिक जखमी.
- १९८०: वॉर्सोजवळ विमान कोसळले. ८७ ठार.
- १९८४: शिन फेनच्या नेता जेरी ऍडम्स वर बेलफास्टमध्ये असफल खूनी हल्ला.
- १९८८: जपानमध्ये समुद्रांतर्गत रेल्वे वाहतुकीस प्रारंभ.
- १९९४: लिनक्सची १.० आवृत्ती प्रकाशित.
- १९९८: इराणमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप.
जन्म/वाढदिवस
- १८०४: योहान स्ट्रॉस, सिनियर, ऑस्ट्रियन संगीतकार.
- १८२३: थियोडोर दि बॅनव्हिल, फ्रेंच लेखक.
- १८४४: उंबेर्तो पहिला, इटलीचा राजा.
- १८६२: विल्हेल्म ब्येर्क्नेस, नॉर्वेचा भौतिकशास्त्रज्ञ.
- १९६५: आमिर खान, बॉलिवूड अभिनेता
- १८७९: अल्बर्ट आइनस्टाइन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८८२: वाक्लाव सियेरपिन्स्की, पोलिश गणितज्ञ.
- १९३३: मायकेल केन, इंग्लिश चित्रपट अभिनेता.
- १९५८: आल्बर्ट दुसरा, मोनॅकोचा राजा.
- १९६०: कर्बी पकेट, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- १९६३: ब्रुस रीड, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९६५: आमिर खान, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९८६: एल्टन चिगुंबुरा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- १८८३: कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक.
No comments:
Post a Comment