उत्पल दत्त - २९ मार्च १९२९ - १९ ऑगस्त १९९३ ) भारतीय चित्रपट सृष्टितील एक प्रसिध्द अभिनेता होते, जे हिंदी व बंगाली चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली.एक अभिनेता म्हणुन ते सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. खासकरुन ते विनोदी अभिनेता म्हणुन ओळखले जातात. जागतिक दिवस
१६३२: सेंट जर्मेनचा तह - इंग्लंडने तीन वर्षांपूर्वी जिंकलेला कॅनडाचा क्वेबेक प्रांत फ्रांसला परत केला.
१७९२: स्वीडनचा राजा गुस्ताव तिसऱ्याचा मृत्यू. गुस्ताव चौथा एडोल्फ राजेपदी.
१८०९: स्वीडनमध्ये राजा गुस्ताव चौथ्या एडोल्फविरुद्ध उठाव. स्वीडनचा भाग असलेल्या फिनलंडने रशियाशी संधान बांधले.
१८४७: मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - जनरल विनफील्ड स्कॉटच्या नेतृत्त्वाखाली अमेरिकेच्या सैन्याने व्हेराक्रुझ शहर जिंकले.
१८४९: ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीने पंजाब खालसा केले.
१८५७: मंगल पांडे या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो.
१८८२: नाइट्स ऑफ कोलंबस या संस्थेची स्थापना.
१९३६: जर्मनीत एडॉल्फ हिटलरने जनतेकडे र्हाइनलँड बळकावण्यासाठी कौल मागितला. याला ९९.५% मतदारांनी उजवा कौल दिला.
१९६२: भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलिन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे अनावरण झाले.
१९४२: दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने जर्मनीतील लुबेक गावावर बॉम्बफेक केली.
१९४५: दुसरे महायुद्ध - इंग्लंडवर व्ही-१ या उडत्या बॉम्बचा शेवटचा हल्ला.
१९७१: व्हियेतनाम युद्ध-माय लाईची कत्तल - निरपराध व निःशस्त्र नागरिकांची हत्या करणाऱ्या अमेरिकन सैनिक लेफ्टनंट विल्यम कॅलीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
१९७३: व्हियेतनाम युद्ध - शेवटच्या अमेरिकन सैनिकांनी दक्षिण व्हियेतनाममधून माघार घेतली.
१९८२: एन.टी. रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली.
No comments:
Post a Comment