Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, March 29, 2018

    इसरो ने संचार उपग्रह जीसैट-6ए को प्रक्षेपित किया:करेंट अफेयर्स २९ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    करेंट अफेयर्स २९ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी




    हिंदी

    इसरो ने संचार उपग्रह जीसैट-6ए को प्रक्षेपित किया:
    भारतीय अंतरिक्ष एजेंसी इसरो ने संचार उपग्रह जीसैट-6ए को सफलतापूर्वक लांच किया है। अंतरिक्ष प्रौद्योगिकी के क्षेत्र में भारत 29 मार्च 2018 को जीसैट-6ए के प्रक्षेपण के साथ यह वित्तवर्ष पूरा करेगा। यह प्रक्षेपण श्रीहरिकोटा के अंतरिक्ष केन्द्र से प्रक्षेपण किया गया।
    श्रीहरिकोटा के सतीश धवन अंतरिक्ष केन्द्र के दूसरे लॉन्‍च पैड से प्रस्तावित जीएसएलवी-एफ08 का प्रक्षेपण शाम चार बजकर 56 मिनट पर किया गया। यह इस प्रक्षेपण यान की 12वीं उड़ान थी। इसरो ने कहा कि उपग्रह की एक मुख्य बात मल्टी बीम कवरेज सुविधा के जरिये भारत को मोबाइल संचार प्रदान करना है।
    इसरो के चेयरमैन के. सिवन ने आईएएनएस से कहा कि जीसैट-6ए के बाद एक नेविगेशन उपग्रह का प्रक्षेपण किया जाएगा, जो अगले वित्तवर्ष में लांच होगा।
    जीसैट-6ए से जुड़े प्रमुख तथ्य:
    • GSAT-6A में 6 मीटर व्यास वाला एंटीना लगा है। यह सामान्य से तीन गुना चौड़ा है। इससे बेहतर कम्युनिकेशन प्राप्त होगा।
    • यह सैटेलाइट 10 साल की अवधि तक काम करेगा। इसे जियोसिंक्रोनस लॉन्च व्हीकल (जीएसएलवी-एफ08) से भेजा गया। इसकी लागत 270 करोड़ रुपए है। इसका वजन 21.40 क्विंटल है।
    • जीसैट-6ए, जीसैट-6 का ही एक जुड़वाँ रूप है जिसमें एक उच्च शक्ति वाला एस-बैंड संचार उपग्रह प्रयोग किया गया है, जिसे आई-2के उपग्रह बस पर बनाया गया है।
    • आई-2के बस इसरो ने ही बनाया है। यह सैटेलाइट को 3119 वॉट पावर देता है। जीसैट-6 को 2015 में लॉन्च किया गया था।
    • एस-बैंड मोबाइल की 4-जी सर्विस के लिए इस्तेमाल किया जाता है। यह मौसम की जानकारी देने वाले रडार, शिप रडार, कम्युनिकेशन सैटेलाइट में भी इस्तेमाल होता है। जीसैट-6ए मोबाइल कम्युनिकेशन में मदद करेगा। इसे सेना के प्रयोग के हिसाब से भी डिजाइन किया गया है।
    • इसरो के मुताबिक यह सैटेलाइट जनरल संचार सेवाओं के लिए किसी ट्रांसपॉन्डर क्षमता को नहीं बढ़ाएगा, बल्कि यह उपग्रह खास तौर पर रिमोट एरिया में मौजूद सेनाओं की टुकड़ियों के बीच बेहतर संचार प्रणाली विकसित करने में मददगार होगा।
    जीएसएलवी रॉकेट से जुड़े प्रमुख तथ्य:
    • जियोसिनक्रोनस उपग्रह प्रक्षेपण यान (जीएसएलवी-एफ08) की यह 12वीं उड़ान है, जबकि इंडीजीनियस क्रायोजेनिक अपर स्टेज की यह 6वीं उड़ान है।
    • इसकी ऊंचाई 49.1 मीटर ऊंचाई है। और इसका वजन 415.6 टन है।



    इंग्लिश








    मराठी

    ISRO चा GSAT-6A दळणवळण उपग्रह अवकाशात

    भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कडून 29 मार्च 2018 रोजी आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन स्वदेशी बनावटीच्या ‘GSAT-6A’ या दळणवळण उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.
    भारताच्या आजवरचे सर्वात मोठे स्वदेशी बनावटीचे GSAT-6A उपग्रह भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान GSLV-F08 अग्निबाणाद्वारे सोडण्यात आले.
    उपग्रहाची वैशिष्ट्ये
    2066 किलोग्राम वजनाच्या या उपग्रहाच्या बांधणीसाठी 270 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे.
    • हा एक उच्च-शक्ती एस-बॅंड तंत्र आधारित संपर्क उपग्रह आहे. उपग्रह
    • या उपग्रहाची आयुर्मर्यादा 10 वर्षांची ठरविण्यात आली आहे.
    • हा उपग्रह 6 मीटर आकाराचा एस-बॅंड अनफर्लेबल अॅंटीना, पृथ्वीवरील केंद्र आणि नेटवर्क व्यवस्थापन तंत्रज्ञानाने सुसज्जित आहे.
    • हा उपग्रह मोबाइल संपर्काच्या क्षेत्रात उपयोगात आणला जाणार आहे.
    • GSAT-6 शृंखलेतला हा दुसरा उपग्रह आहे. यापूर्वी ऑगस्ट 2015 मध्ये GSAT-6 अवकाशात सोडले गेले होते. GSAT-6A हा GSAT-6 ला जोड म्हणून कार्य करणार.
    उपग्रहाची उपयुक्तता
    GSAT-6 उपग्रह भारतात कुठेही उपग्रह आधारित मोबाइल कॉलिंग आणि संपर्क सुलभ बनविण्यास मदत करणार. याचा सर्वाधिक फायदा दुर्गम भागात लष्करी संपर्कात होऊ शकणार. सोबतच उपग्रहात सी-बॅंड संपर्कासाठी एक 0.8 मीटर लांबीचा अँटीना बसविण्यात आला आहे, जो पारंपारिक संपर्क उपकरणांची क्षमता वाढविणार.
    एस-बॅंड हे एक विद्युतचुंबकीय लहरींच्या वारंवारीतेमधील एक भाग आहे, ज्यामध्ये 2 GHz ते 4 GHz (गीगाहर्त्झ) यादरम्यान वारंवारिता (frequency) समाविष्ट आहेत. हे मुख्यत: हवामानाशी संबंधित रडार, जहाजावरील रडार आणि काही दळणवळण उपग्रहांमध्ये वापरले जाते, जेथे भक्कम आणि अखंड संपर्क सेवा अपेक्षित असते. हे 4G सेवेसाठी लागणार्‍या 2.5 GHz बँडसाठी तसेच मोबाइल ब्रॉडबँड सेवेसाठी अतिशय उपयुक्त आहे.
    ISRO चा ऐतिहासिक प्रवास
    भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले.
    ISRO ने 1999 सालापासून व्यावसायिक शाखेच्या मदतीने विदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचा कार्यक्रम सुरू केला. ISRO ने साधलेल्या प्रशंसनीय यशाचा आढावा पुढीलप्रमाणे आहे -
    • 19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या मदतीने आपला पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.
    • 1980 साली पुर्णपणे स्वदेशी बनावटीच्या SLV-3 प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.
    • 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली. या मोहिमेमधून चंद्राच्या ध्रुव क्षेत्रात पाणी असण्याची पुष्टी केली.
    • ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात आणि अगदी कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.
    • फेब्रुवारी 2017 मध्ये एकाचवेळी 7 देशांचे 104 उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा 37 उपग्रहांचा विक्रम मोडीत काढला.
    • ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV) आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (GSLV) विकसित केले.
    • सॅटलाइट सुचालन प्रणाली ‘गगन’ आणि क्षेत्रीय सुचालन उपग्रह प्रणाली ‘IRNSS’ विकसित केले.
    • यानाला पुढे नेणारे अत्यावश्यक असलेले स्वदेशी ‘क्रायोजेनिक इंजन’ तयार केले.
    भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (Geostationary satellite launch vehicle -GSLV) - GSLV हे प्रामुख्याने पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत (साधारणतः 3500 किलोमीटर) उपग्रहाच्या INSAT वर्गातील उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याकरिता विकसित केले गेले. GSLV हे उपग्रहाच्या GSAT मालिकेच्या प्रक्षेपणासाठी वापरले जात आहे. GSLV मध्ये तीन टप्पे आहेत - घन इंधन वापरणारे रॉकेट मोटर स्टेज, अर्थ स्टोअरेबल लिकुइड स्टेज आणि क्रायोजेणीक स्टेज. या वाहनाची 49.13 मीटर उंची आहे. GSLV चे प्रथम उड्डाण 18 एप्रिल 2001 रोजी केले गेले होते.
    2017 साली तयार करण्यात आलेला ‘जियोसिंक्रोनस सॅटलाइट लॉंच व्हेइकल मार्क-III’ (GSLV Mk-III) हा भारताने आतापर्यंत बनविलेले सर्वात भारी अग्निबाण आहे आणि हे सर्वाधिक वजनी उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. याला ‘फॅट बॉय’ असे टोपणनाव दिले आहे. भारताने आतापर्यंत बनविलेले हे जवळपास 640 टन वजनी सर्वात भारी अग्निबाण आहे आणि हे सर्वाधिक वजनी उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. हा अग्निबाण पृथ्वीच्या वातावरणाच्या खालच्या परिभ्रमन कक्षेत 8 टन वजनापर्यंतचे अंतराळ केंद्र पोहोचवण्यास सक्षम आहे.



    No comments:

    Post a Comment