इवनिंग न्यूज़ ११ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

हिंदी
बहुपक्षीय वायु सेना अभ्यास 'एक्स संवेदना' 12 मार्च से शुरू होगा:
- दक्षिण एयर कमांड द्वारा आयोजित 'एक्स संवेदना', बहु-पक्षीय वायुसेना अभ्यास है जिसका आयोजन 12 से 17 मार्च, 2018 को किया जा रहा है। 'संवेदना' का अर्थ 'सहानुभूति' होता है और यह अभ्यास पड़ोसी मित्र देशों के बीच बेहतर समझ व जवाबी प्रक्रिया साझा सुनिश्चित करेगा।
- दक्षिण एशियाई क्षेत्र में यह पहला संयुक्त एचएडीआर (मानवीय सहायता व आपदा राहत) वायु अभ्यास है। बांग्लादेश, श्रीलंका, संयुक्त अरब अमीरात और म्यांमार की वायु सेना ने पहले से ही इस अभ्यास के लिए अपने संसाधनों और कर्मियों को समर्पित किया है।
- अंतर्राष्ट्रीय सौर गठबंधन (आईएसए), अफ्रीकी विकास बैंक (एएफ़डीबी), एशियाई विकास बैंक (एडीबी), एशियाई बुनियादी ढांचा निवेश बैंक (एआईआईबी), ग्रीन जलवायु फंड (जीसीएफ) और नई विकास बैंक (एनडीबी) ने 10 मार्च 2018 को संयुक्त वित्तीय साझेदारी घोषणा पर हस्ताक्षर किए हैं। अंतर्राष्ट्रीय ऊर्जा एजेंसी (आईईए) ने भी आईएसए के साथ एक संयुक्त साझेदारी घोषणापत्र पर हस्ताक्षर किए हैं।
- आईएसए ने इससे पूर्व तीन सहयोगियों विश्व बैंक, यूरोपीय निवेश बैंक और यूरोपीय पुनर्निर्माण और विकास बैंक (ईबीआरडी) के साथ समझौते पर हस्ताक्षर किए थे।
- इस समझौते का उद्देश्य नवीनीकरण उर्जा के समर्थन में उनके सहयोग को गहरा करना है। आईएसए 1000 से अधिक गीगावॉट की सौर ऊर्जा के प्रसार के लिए काम कर रहा है और वर्ष 2030 तक 1000 अरब अमरीकी डॉलर से अधिक सौर ऊर्जा के लिए खर्च करने के लिए प्रयासरत है।
- अक्षय ऊर्जा की विश्व की सबसे बड़ी वित्त पोषक संस्था यूरोपीय निवेश बैंक (ईआईबी) ने नवीन एवं नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय के तहत आने वाली भारतीय अक्षय ऊर्जा विकास एजेंसी (इरेडा) को 10 मार्च 2018 को 15 करोड़ यूरो अर्थात लगभग 12 अरब रुपए का बिना सरकारी गारंटी वाला दीर्घकालिक ऋण दिया है।
- यह लाइन ऑफ़ क्रेडिट (एलओसी) 15 वर्ष की अवधि के लिए है जिसमें 3 साल की रियायती अवधि भी शामिल है। इसका उपयोग भारत में अक्षय ऊर्जा और ऊर्जा दक्षता परियोजनाओं के वित्तपोषण के लिए किया जाएगा।
- लाइन आफ क्रेडिट के रूप में दिए गए इस ऋण के निवेश से उत्पादित अक्षय ऊर्जा से देश के 11 लाख से ज्यादा घर रोशन होंगे तथा रोजगार के सैंकड़ों अवसर सृजित होंगे। यह पैसा देश भर में फोटोवोल्टिक सौर ऊर्जा तथा पवन ऊर्जा की परियोजनाओं में लगाया जाएगा।
- नई दिल्ली में 11 मार्च 2018 को पहला अंतरराष्ट्रीय सौर गठबंधन शिखर सम्मेलन शुरू हुआ है, कई देशों के राष्ट्राध्यक्ष इस सम्मेलन में इसमें भाग ले रहे हैं। सौर ऊर्ज़ा को बढ़ावा देने के लिए वित्तीय तंत्र, क्राउड फंडिंग और तकनीक हस्तांतरण के मुद्दों पर विचार-विमर्श हो रहा है।
- भारत पहले अंतरराष्ट्रीय सौर गठबंधन सम्मेलन की मेज़बानी कर रहा है, जबकि फ्रांस इस कार्यक्रम का सह-मेज़बान है। इस सम्मेलन में 23 देशों के राष्ट्राध्यक्ष और कई देशों के 10 मंत्री स्तरीय प्रतिनिधि भी शिरकत करेंगे।
- अंतरराष्ट्रीय सौर गठबंधन की शुरुआत पेरिस में 30 नवंबर, 2015 को संयुक्त राष्ट्र जलवायु सम्मेलन के दौरान भारत के प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी और फ्रांस के तत्कालीन राष्ट्रपति ने संयुक्त रूप से की थी। आईएसए की स्थापना में भारत का महत्वपूर्ण योगदान है। आईएसए के लिए भारत ने ही पहल की थी और 175 करोड़ रुपए का शुरुआती योगदान भी दिया था।
- भारत ने सौर ऊर्जा को बढ़ावा देने के लिए नवीकरणीय ऊर्जा के अंतर्गत 175 गीगावाट स्वच्छ ऊर्जा क्षमता जुटाने के लिए संयंत्र स्थापित करने का लक्ष्य रखा है। इस नवीकरणीय ऊर्जा में 100 गीगावाट सौर ऊर्जा और 60 गीगावाट पवन ऊर्जा के उत्सर्जन का लक्ष्य है।
- आर्थिक अपराध करके विदेश भाग जाने की घटनाओं को रोकने के लिए सरकार ने अब सरकारी बैंकों से 50 करोड़ रुपए से ज्यादा का लोन मांगनेवालों के लिए पासपोर्ट डीटेल देना अनिवार्य कर दिया है।
- सरकार का यह कदम लोन फर्जीवाड़े की स्थिति में त्वरित और आसान कार्रवाई सुनिश्चित करेगा और धोखाधड़ी करनेवालों को देश से भागने पर रोक लगाएगा।
- इससे पहले, केंद्रीय कैबिनेट से फ्यूजिटिव इकनॉमिक ऑफेंडर्स बिल को हरी झंडी मिल चुकी है। साथ ही, बैंकों को 250 करोड़ रुपये से ज्यादा के लोन की निगरानी करने का भी आदेश दिया गया है।
- मिलन अभ्यास के दसवें संस्करण के एक हिस्से के रूप में, 10 मार्च 2018 को समुद्र में पहली बार बहु-राष्ट्रीय नौसैनिक अभ्यास, माइल्स-18 (MILES-18), अंडमान सागर में शुरू हुआ है। 8 देशों के 11 नौसैनिक जहाज और नौ भारतीय जहाज इस तीन दिवसीय अभ्यास में भाग ले रहे हैं।
- अन्तः सञ्चालन को बढ़ावा देने के लिए, अभ्यास का उद्देश्य खोज और बचाव प्रक्रियाओं को तेज करना, समुद्री हस्तक्षेप ऑपरेशन्स, कोर संचालन कौशल और विभिन्न समुद्री सुरक्षा परिदृश्यों का प्रयोग करना है।
- नोबेल पुरस्कार विजेता ब्रिटेन के वैज्ञानिक जॉन सल्सटन का निधन हो गया है। उन्होंने मानव जीनोम को डिकोड करने में सहायता की थी। वह 75 साल के थे।जीनोम रीसर्च सेंटर वेलकम सैंगर इंस्टीट्यूट के उत्तराधिकारी ने उनके निधन की पुष्टि की।
- वैज्ञानिक जॉन सल्सटन को जीन की आंतरिक संरचना को नियंत्रित करने के काम के लिए वर्ष 2002 में पुरस्कृत किया गया था। इसके अलावा उन्होंने वयस्क नेमाटोड वार्म सी. इलीगैंस की कोशिका को बांटने और उससे कुछ नया बनाने में कामयाबी पाई थी। उनके इंस्टीट्यूट के मुताबिक उनकी इस खोज से कैंसर कैसे विकसित होता है, पता चला था।
- अंतर्राष्ट्रीय निशानेबाजी खेल परिसंघ की विश्व कप निशानेबाजी प्रतियोगिता में भारत के अखिल शेरॉन ने मैक्सिको में पुरुषों की 50 मीटर राइफल थ्री-पोजीशन स्पर्धा में स्वर्ण पदक जीत लिया है।
- इससे पहले, भारत के मनु भाकर, ओम प्रकाश मिथरवाल और शहजर रिज़वी स्वर्ण पदक जीत चुके हैं। भारत अब नौ पदकों के साथ पदक तालिका में शीर्ष पर है।
- सुल्तान अजलान शाह कप के आखिरी दिन फाइनल में ऑस्ट्रेलिया ने इंग्लैंड को 2-1 से हराकर ख़िताब जीता। भारतीय हॉकी टीम का मुकाबला आयरलैंड से पांचवें स्थान के लिए हुआ था, जिसे भारतीय टीम ने 4-1 से जीत लिया और टूर्नामेंट में पांचवा स्थान प्राप्त किया।
- इसके अतिरिक्त तीसरे स्थान के मुकाबले में अर्जेंटीना ने मलेशिया को 3-2 से हरा दिया। ऑस्ट्रेलिया ने 10वीं बार इस ख़िताब को अपने नाम किया है।
- स्लोवाकिया की हेनरिएटा फर्कासोवा ने 10 मार्च 2018 को प्योंगचांग शीतकालीन पैरालिपिक्स का पहला स्वर्ण पदक जीता है। उन्होंने महिलाओं विजन इम्पेयर्ड डाउनहिल स्कीइंग प्रतियोगिता में यह स्वर्ण पदक जीता है।
- हेनरिएटा फर्कासोवा और उसकी मार्गदर्शिका नतालिया सबरटोवा ने इसे 1 मिनट 29.72 सेकंड में पूरा किया जबकि दूसरे स्थान पर ब्रिटेन की खिलाड़ी और उनकी गाइड, फर्कासोवा से .86 सेकंड पीछे रहीं।
इंग्लिश
मराठी
वायुदलांचा बहुपक्षीय 'संवेदना' सराव 12 मार्च पासून सुरू
- केरळच्या तटीय क्षेत्रात 12 मार्च ते 17 मार्च या कालावधीत दक्षिण आशियाई क्षेत्रीय राष्ट्रांसोबत भारतीय वायुदलाचा 'संवेदना' नावाचा पहिला मानवतावादी मदत व आपत्ती निवारण (HADR) सराव आयोजित केला गेला आहे.
- या बहुपक्षीय अभ्यासात श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) या देशांचा सहभाग आहे. दक्षिण आशियाई क्षेत्रात पहिल्यांदाच असा संयुक्त HADR सराव आयोजित करण्यात आला आहे. हा सराव भारताच्या पश्चिम तटामध्ये सुनामी परिस्थितीवर आधारित आहे.
स्त्रोत: ट्रिब्यून इंडिया
ISA-ADB, NDB, GCF, AfDB आणि AIIB संयुक्त वित्तीय भागीदारी घोषणापत्र
- आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) आणि आफ्रिका विकास बँक (AfDb), आशियाई विकास बँक (ADB), आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB), ग्रीन क्लायमेट फंड (GCF) आणि नवीन विकास बँक (NDB) यांनी संयुक्त वित्तीय भागीदारी घोषणापत्रावर स्वाक्षर्या केल्या आहेत.
- आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA) यांनी सुद्धा ISA सोबत एक संयुक्त भागीदारी घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आहे. या कराराचा उद्देश्य नवीनीकरण ऊर्जेच्या समर्थनात त्यांच्या मदतीला अधिक बळकट करणे आहे. ESA सौर ऊर्जेच्या 1000 हून अधिक गीगावॉटच्या तैनातीसाठी आणि सौर ऊर्जेत सन 2030 पर्यंत USD 1000 अब्जहून अधिक निधी जमविण्यासाठी काम करीत आहे.
- आशियाई विकास बँक (ADB) ही एक क्षेत्रीय विकास बँक आहे, ज्याची स्थापना 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधील आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी केली गेली. ही बँक UN इकोनॉमिक कमीशन फॉर एशिया अँड फार ईस्ट (UNESCAP) आणि गैर क्षेत्रीय विकसित देशांच्या सदस्यांना सामावून घेते.
- आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे आणि जानेवारी 2016 पासून ही सेवेत आहे. याचे मुख्यालय चीनची राजधानी बीजिंग येथे आहे. वर्तमानात जगभरात याचे 80 सदस्य आहेत. ही बँक आशियामधील पायाभूत सुविधांसंबंधी विकास प्रकल्पांसाठी आर्थिक मदत प्रदान करते.
- आफ्रिका विकास बँक (AfDb) ही आफ्रिकेतल्या देशांच्या आर्थिक विकासासाठी आणि सामाजिक प्रगतीसाठी योगदान देण्यासाठी लास्टोन एम. द्वारा स्थापित एक बहुपक्षीय विकास वित्त संस्था आहे. AfDB ची 10 सप्टेंबर 1964 रोजी स्थापना झाली आणि त्यात तीन संस्थांचा समावेश आहे. ते आहेत - आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक, आफ्रिकन डेव्हलपमेंट फंड आणि नायजेरिया ट्रस्ट फंड. 1983 साली भारत AfDB मध्ये सहभागी झाले. याचे मुख्यालय ट्यूनिस, ट्युनिशिया येथे आहे. यात 78 देशांची सदस्यता आहे.
- नवीन विकास बँक (NDB) (पूर्वीची BRICS विकास बँक) ही BRICS राष्ट्रांद्वारे (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) स्थापन करण्यात आलेली बहुपक्षीय बँक आहे. 15 जुलै 2014 रोजी NDB ची स्थापना करण्यात आली. या बँकेचे पहिले आणि सध्या कार्यरत अध्यक्ष भारताचे के. व्ही. कामत हे आहेत. बँकेचे मुख्यालय शांघाय (चीन) येथे आहे. NDB उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी पुरविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आले आहे.
- ग्रीन क्लायमेट फंड (GCF) हा कोष UNFCCC च्या कार्यचौकटी अंतर्गत विकसित करण्यात आला आहे, ज्यामधून हवामान बदलाशी जुळवून घेण्याकरिता आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पद्धतींसाठी विकसनशील देशांना मदत पुरवल्या जाते. याची सन 2010 मध्ये स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय दक्षिण कोरियातील इंचेऑनच्या न्यू सोंगदो जिल्ह्यात आहे.
स्त्रोत: PIB
IREDA आणि युरोपीय गुंतवणूक बँक यांच्यात 150 दशलक्ष युरोचा कर्ज करार
- अक्षय ऊर्जा क्षेत्रात वित्त पुरवठा करणारी जगातली सर्वात मोठी संस्था युरोपीय गुंतवणूक बँक (EIB) याने नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीत भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था (IREDA) याला 150 दशलक्ष (15 कोटी) युरो (जवळजवळ 12 अब्ज रुपये) चे दीर्घकालिक कर्ज देण्यासाठी करार केला आहे.
- पतमर्यादेचा कालावधी 15 वर्षांचा आहे. हा निधी भारतात अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या प्रकल्पांसाठी खर्च केला जाणार आहे. या निधीतून तयार होणाऱ्या स्वच्छ उर्जा निर्मितीपासून 1.1 दशलक्षांपेक्षा जास्त घरांना लाभ मिळण्याचे अपेक्षित आहे.
- भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था (IREDA) ही एक मिनीरत्न (श्रेणी-I) भारत सरकार उपक्रम आहे, जे केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आहे. IREDA ही 1987 साली स्थापित करण्यात आलेली बिगर-बँकिंग वित्तीय संस्था म्हणून असलेली एक सार्वजनिक मर्यादित शासकीय कंपनी आहे, जी अक्षय ऊर्जा प्रकल्पाचा विकास, त्यासाठी वित्तपुरवठा आणि प्रोत्साहन देते.
स्त्रोत: PIB
नवी दिल्लीत प्रथम आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) परिषदेला सुरुवात
- नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनमध्ये 11 मार्च 2018 पासून आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) च्या पहिल्या परिषदेला सुरुवात झाली आहे.
- फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रो यांनी परिषदेचे उद्घाटन केले आहे. यामध्ये भारतासह 23 देशांच्या राष्ट्रपतींसोबतच 10 मंत्रिस्तरीय प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.
- पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे. गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) ची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. ISA 121 सदस्य देशांमधील सौर ऊर्जा प्रकल्पांना उभारण्यासाठी समन्वय साधणारा उपक्रम आहे. आतापर्यंत 19 देशांनी याला स्वीकृती दिली आहे आणि 48 देशांनी ISA कार्यचौकट करारावर स्वाक्षर्या केल्या आहेत.
स्त्रोत: TOI
50 कोटी रुपयांहून अधिकचे बँक कर्ज घेण्यासाठी पारपत्र सादर करणे सक्तीचे: शासन आदेश
- आर्थिक गुन्हे करून देश सोडून फरार होणाचे गुन्हे पाहता भारत सरकारच्या नव्या आदेशानुसार शासकीय बँकांना 50 कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज घेणार्या व्यक्तीला त्याच्या पारपत्र (passport) याची संपूर्ण माहिती देणे सक्तीचे आहे.
- यासोबतच ज्या लोकांवर 50 कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज आहे, त्यांच्याकडून 45 दिवसांच्या आत पारपत्राची माहिती घेण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहे.
स्त्रोत: लाइव्हमिंट
‘माइल्स-18’ – प्रथम बहूराष्ट्रीय नौदलांच्या सरावाला सुरुवात
- अंदमान समुद्रात 10 मार्च 2018 रोजी ‘माइल्स-18’ नावाने प्रथम बहूराष्ट्रीय नौदल सरावाला सुरुवात करण्यात आली आहे.
- तीन दिवस चालणार्या या सरावात 8 देशांच्या नौदलांची 11 जहाजे आणि 9 भारतीय जहाजांचा सहभाग आहे. विविध समुद्री सुरक्षा परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला आहे.
स्त्रोत: AIR
मानवी अनुवांशिकता क्षेत्रातले प्रसिद्ध जॉन सल्सटन यांचे निधन
- मानवी अनुवांशिकता क्षेत्रात प्रसिद्ध शास्त्रज्ञ जॉन सल्सटन यांचे निधन झाले आहे. ते 75 वर्षांचे होते.
- ब्रिटनचे शास्त्रज्ञ जॉन सल्सटन यांनी मानवी अनुवांशिकता शोधून काढण्यामध्ये मदत केली होती. त्यांना आनुवंशिकतावाहक (gene) याच्या आंतरिक संरचनेला नियंत्रित करण्याच्या कार्यासाठी सन 2002 मध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी औषधी वर्गात ब्रेनर आणि राबर्ट हारवित्झ यांच्यासह नोबेल सामायिक केला. याशिवाय त्यांनी केलेल्या ‘सी. इलेगंस’ या नेमाटोड कृमीच्या अभ्यासातून कर्करोग कसा विकसित होती याविषयी माहिती मिळाली.
स्त्रोत: द हिंदू
ISSF विश्व चषकमध्ये अखिल शिओरनला सुवर्णपदक
- मॅक्सिकोमध्ये खेळल्या जात असलेल्या ISSF विश्व चषक स्पर्धेत भारतीय नेमबाज अखिल शेओरन याने 50 मीटर रायफल 3-पोजिशन (3P) प्रकारात सुवर्णपदक पटकावले. हे भारताचे स्पर्धेतले चौथे सुवर्ण आहे.
- अखिल शेओरनचे हे पहिलेच विश्व चषक आहे. आतापर्यंत भारताला 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्यपदक प्राप्त झाली आहेत.
- 1986 साली आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) कडून ऑलंपिक स्पर्धांमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी एक एकसंध प्रणाली म्हणून ISSF विश्वचषक स्पर्धेची स्थापना करण्यात आली. दरवर्षी चार स्पर्धां घेतल्या जातात. सर्वोत्तम नेमबाजांसाठी 1988 सालापासून विश्वचषक अंतिम आयोजित करण्यात येत आहे. 1907 साली ISSF ची स्थापना करण्यात आली.
स्त्रोत: इंडियन एक्सप्रेस
ऑस्ट्रेलियाने सुल्तान अजलान शाह चषक जिंकला
- मलेशियात खेळल्या गेलेल्या ‘2018 सुल्तान अजलान शाह चषक’ या हॉकी स्पर्धेत अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 2-1 असा पराभव करत विजेतेपद जिंकले आहे.
- या स्पर्धेत भारतीय संघाने पाचव्या क्रमांकावर आपली यात्रा संपवली.
- सुल्तान अजलान शाह चषक ही मलेशियात आयोजित केली जाणारी वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरुष हॉकी स्पर्धा आहे. या खेळाची सुरुवात सन 1983 मध्ये झाली.
स्त्रोत: डीडी न्यूज
स्लोवाकियाच्या हेनरीटा फारकासोवा हिने हिवाळी पॅरालंपिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले
- स्लोवाकियाची स्कीयर हेनरीटा फारकासोवा हिने 2018 हिवाळी पॅरालंपिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले आहे.
- दक्षिण कोरियात प्योंगचांग येथे खेळल्या जात असलेल्या 2018 हिवाळी ऑलंपिकमध्ये महिलांच्या दृष्टीबाधित डाउनहिल स्कीइंगमध्ये हेनरीटाने पदक मिळवले.
- आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समिती (IOC) हे जागतिक ऑलंपिक चळवळीचे सर्वोच्च प्राधिकरण आहे. स्वित्झर्लंडमधील लुसाने येथे याचे मुख्यालय आहे. IOC ची निर्मिती पिअरे डी कौर्बर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी केली आणि डेमेट्रीओस विकेलस यांची प्रथम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. याचे 105 सक्रिय सदस्य, 32 मानद सदस्य, 2 प्रतिष्ठित सदस्य (सेनेगल आणि अमेरिका) आहेत.
स्त्रोत: टाइम्स नाऊ
No comments:
Post a Comment