जागतिक दिवस
- व्हॅलेन्टाईन्स डे
ठळक घटना/घडामोडी
- ८४२: टकल्या चार्ल्स व जर्मन लुइसने तह केला.
- १०१४: पोप बॉनिफेस पहिल्याने बव्हारियाच्या हेन्रीला जर्मनीचा राजा म्हणून मान्यता दिली.
- १०७६: पोप ग्रेगोरी सातव्याने पवित्र रोमन सम्राट हेन्री चौथ्याला वाळीत टाकले.
- १७४३: हेन्री पेल्हाम इंग्लंडच्या पंतप्रधानपदी.
- १७७९: जेम्स कूक सँडविच आयलंड(हवाई)च्या रहिवाश्यांकडून मारला गेला.
- १८०३: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायाधीश जॉन मार्शलने जाहीर केले की अमेरिकन संविधानाच्या विरुद्ध असलेला कुठलाही कायदा लागू करता येणार नाही.
- १८०४: सर्बियात ऑट्टोमन साम्राज्याविरूद्ध उठाव.
- १८५९: ओरेगोन अमेरिकेचे ३३वे राज्य झाले.
- १८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रेने एकाच दिवशी दूरभाष यंत्रणेच्या पेटंटसाठी अर्ज केला.
- १८७९: चिलीने बॉलिव्हियाच्या अँटोफागस्टा शहरावर हल्ला केला. दोन्ही देशात युद्ध सुरू.
- १८९९: अमेरिकेत निवडणुक यंत्र वापरण्यास सुरूवात.
- १९००: दक्षिण आफ्रिकेत दुसरे बोअर युद्ध सुरू.
- १९१२: अॅरिझोना अमेरिकेचे ४८वे राज्य झाले.
- १९१२: ग्रोटोन, कनेक्टिकट येथे पहिली डीझेल पाणबुडी तयार झाली.
- १९१८: एडगर राइस बरोच्या टारझनवरील पहिला सिनेमा प्रदर्शित झाला.
- १९१९: रशिया व पोलंडमध्ये युद्ध सुरू.
- १९२४: संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एमची स्थापना.
- १९२९: शिकागोत माफिया ऍल कपोनच्या गुंडांनी विरुद्ध टोळीतील सात गुंडांना गोळ्या घातल्या.
- १९४३: दुसरे महायुद्ध - रोस्तोव, रशियाला रशियन सैन्याने जर्मन वेढ्यातुन मुक्त केले.
- १९४३: दुसरे महायुद्ध - कॅसेरिन पासची लढाई - ट्युनिसीयात फील्ड मार्शल एर्विन रोमेलच्या आफ्रिका कोरने कॅसेरिन घाटातील दोस्त राष्ट्रांच्या सैन्यावर कडाडून हल्ला चढवला.
- १९४४: दुसरे महायुद्ध - जावात जपानी सैन्याविरुद्ध उठाव.
- १९४५: दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने जर्मनीच्या ड्रेस्डेन शहरावर तुफानी बॉम्बफेक केली व शहर बेचिराख केले.
- १९४५: चिली, इक्वेडोर, पेराग्वे व पेरू संयुक्त राष्ट्रात दाखल.
- १९४५: अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट व सौदी अरेबियाचा राजा इब्न सौद यांच्यात बैठक. अमेरिका व सौदी अरेबियात राजकीय संबंध सुरू.
- १९४६: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण.
- १९४६: पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.
- १९४९: इस्रायेलच्या संसदेची (क्नेसेट) पहिली बैठक सुरू.
- १९५२: नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे सहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९६१: १०३ क्रमांकाचा मूलभूत पदार्थ, लॉरेन्सियमची प्रथमतः निर्मिती.
- १९६६: ऑस्ट्रेलियन डॉलरचे दशमान पद्धतीत रूपांतर.
- १९८०: अमेरिकेत लेक प्लॅसिड येथे तेरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९८१: आयर्लंडची राजधानी डब्लिन येथील नाइट क्लबला लागलेल्या आगीत ४८ ठार.
- १९८९: भोपाळ दुर्घटना - युनियन कार्बाइडने भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले.
- १९८९: ईराणच्या रुहोल्ला खोमेनीने ब्रिटीश लेखक सलमान रश्दीच्या खूनाचा फतवा काढला.
- २००५: लेबेनॉनच्या भूतपूर्व पंतप्रधान रफिक हरिरिचा हत्या.
जन्म/वाढदिवस
- १४८३: बाबर, मोगल सम्राट.
- १६३०: सॅम्युएल बटलर, इंग्लिश कवी.
- १९१३: जिमी हॉफा, अमेरिकन कामगार नेता.
- १९३३: मधुबाला, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९४२: मायकेल ब्लूमबर्ग, न्यूयॉर्कचा महापौर.
- १९४६: बर्नार्ड डोवियोगो, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४७: सलाहुद्दीन, क्रिकेट खेळाडू, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६८: क्रिस लुईस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७३: एच.डी. ऍकरमन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- १४००: रिचर्ड दुसरा इंग्लंडचा राजा.
- १४०५: तैमुर लंग, मोंगोल राजा.
- १५२३: पोप एड्रियान सहावा.
- १८३१: व्हिसेंते ग्वेरेरो, मेक्सिकोचा स्वातंत्र्यसैनिक.
- १८९१: विल्यम टेकुमेश शेर्मन, अमेरिकन सेनापती.
- १९७५: पी.जी.वुडहाउस, ब्रिटीश लेखक.
- १९८९: जेम्स बॉन्ड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ.
- १९९५: उ नु, म्यानमारचा राजकारणी.
- २००५: रफिक हरिरि, लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष.
No comments:
Post a Comment