Currentaffairs 19 December 2017 - Hindi / English/Marathi
Hindi
सम्पूर्ण विश्व में सबसे अधिक भारतीय समुदाय: यूएन रिपोर्ट
संयुक्त राष्ट्र की एक रिपोर्ट के अनुसार, विश्व में सबसे ज्यादा प्रवासी भारतीय हैं। रिपोर्ट के मुताबिक 15.6 मिलियन से अधिक भारतीय विदेश में रहते हैं।
रिपोर्ट में कहा गया है कि साल 2015 में अंतरराष्ट्रीय प्रवासियों की संख्या 243 मिलियन होने का अनुमान लगाया गया था।
भारतीय समुदाय का गठन लगभग 6 प्रतिशत है। भारत के बाद मैक्सिको दूसरे नंबर पर आता है जिसके लोग विदेशों में ज्यादा रहते है। इस सूची में रूस (तीसरे), चीन (चौथे), बांग्लादेश (पांचवें) और पाकिस्तान (छठवें) स्थान पर है।
रिपोर्ट से जुड़े प्रमुख तथ्य:
संयुक्त राष्ट्र की एजेंसी इंटरनेशनल ऑर्गनाइजेशन फॉर माइग्रेशन द्वारा प्रकाशित वर्ल्ड माइग्रेशन रिपोर्ट (2018) के अनुसार डायस्पोरा का विकास स्थिर रहा है। साल 2010 से 2015 के बीच डायस्पोरा का विकास 3.2% से लेकर 3.3% तक है।
रिपोर्ट में कहा गया है कि साल 2015 में दुनिया भर के सभी अंतरराष्ट्रीय प्रवासियों में से आधे एशिया में पैदा हुए थे। मुख्य रूप से भारत, चीन और अन्य दक्षिणी एशियाई देशों से इनका स्तर ज्यादा रहा है।
खाड़ी देशों में भारतीय समुदाय का सबसे बड़ा हिस्सा प्रवास करता है - लगभग 3.5 मिलियन या कुल भारतीय डायस्पोरा का 22%।
वैश्विक प्रवासियों के आंकड़े वर्ष 2010 में दर्ज किए गए आकड़ों के मुकाबले 10% अधिक हो गए हैं। दूसरे शब्दों में, 7.3 अरब की वैश्विक आबादी में, 2015 में हर 30 में से एक व्यक्ति प्रवासी था।
साल 2015 में दुनिया में प्रवासियों के लिए अमेरिका शीर्ष गंतव्य स्थान रहा था जिसमें 46.6 मिलियन प्रवासियों ने उस वर्ष अमेरिका में प्रवेश किया। इन 46.6 मिलियन में भारतीय मूल के लगभग 2 मिलियन लोग शामिल थे।
टिप्पणी:
पिछले साल 2016 में जब माइग्रेशन रिपोर्ट प्रकाशित हुई थी तब यूएन डिप्टी सेक्रेटरी जनरल जेन एलियासन ने कहा था कि प्रवासियों को संरक्षण देने की जरूरत है। उन्होंने कहा था कि हमें हजारों प्रवासियों (पुरुषों, महिलाओं और बच्चों) के जीवन की सुरक्षा के लिए बड़ी जिम्मेदारी लेने की जरूरत है, जो खतरनाक और कभी-कभी जानलेवा यात्राएं करने के लिए मजबूर हैं।
पुरुषों, महिलाओं और बच्चें कई बार खतरनाक यात्राएं करने को मजबूर होते है इसलिए हमें प्रवासियों के हितों पर भी ध्यान देना चाहिए।
इंटरनेशनल ऑर्गनाइजेशन फॉर माइग्रेशन:
इंटरनेशनल ऑर्गनाइजेशन फॉर माइग्रेशन (आईओएम) एक अंतरसरकारी संगठन है जो सरकारों और प्रवासियों, जिनमें आंतरिक रूप से विस्थापित व्यक्ति, शरणार्थी, और प्रवासी श्रमिक शामिल हैं, को प्रवास के बारे में सेवाएं और सलाह प्रदान करता है। यह संयुक्त राष्ट्र का एक संबंधित संगठन बन गया है।
द्वितीय विश्व युद्ध के बाद विस्थापित हुए लोगों को उनके पुनर्वास में मदद करने के लिए प्रारम्भ में इसे 1951 में इंटरगवर्नमेंटल कमिटी फॉर यूरोपियन माइग्रेशन (आईसीईएम) के रूप में स्थापित किया गया था।
इंटरनेशनल ऑर्गनाइजेशन फॉर माइग्रेशन के 166 सदस्य देश और 8 पर्यवेक्षक देश हैं। इसका मुख्यालय जिनेवा, स्विट्जरलैंड में है।
English
India has the largest diaspora in the world: UN report
UN World Migration Report (2018) reported that India is having the world’s largest diaspora, with near about 16 Million Indians living outside the country they were born in. Further the report highlighted that 2 years back in 2015, the diaspora consisted of 6% of the total number of international migrants (people living outside the country of their birth), which was estimated at 243 million.
Highlights of the report:
- Following India Mexico hold the second largest diaspora then its Russia at the 3rdposition, china at the 4th and Pakistan at the 5th.
- The number of international migrants has grown faster than the world's population, with the share of migrants in the global population reaching 3.3 per cent in 2015. The international migrants figure has increased by 10% over that recorded in 2010.
- Since 1970, US is the top most country in terms of destination countries for global diaspora, followed by Germany and Russia. It is observed that the number of foreign-born people residing in US is almost 4 times from fewer than 12 million in 1970 to 46.6 million in 2015 of which nearly 2 million are from India.
- The richest Indian diaspora is in the US, where Indians counted for the third-largest ethnic group in 2015.
- Generally, the people in the age group of 20 to 64 years, account for nearly 72%, which accounts for significant chunk of international migrant population.
International Organisation for Migration
IOM is an intergovernmental organization that provides services and advice concerning migration to governments and migrants, including internally displaced persons, refugees, and migrant workers. IOM works to help ensure the orderly and humane management of migration, to promote international cooperation on migration issues, to assist in the search for practical solutions to migration problems and to provide humanitarian assistance to migrants in need, including refugees and internally displaced people.
IOM works in the four broad areas of migration management:
- Migration and development
- Facilitating migration
- Regulating migration
- Forced migration.
Marathi
UN-IMO चा 'वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट (2018)' प्रसिद्ध
संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतरण संघटना (IMO) द्वारा प्रसिद्ध केल्या गेलेल्या 'वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट (2018)' अनुसार, जगभरात सर्वाधिक संख्येने स्थलांतरण करण्यामध्ये भारतीय पुढे आहेत. 15.6 दशलक्षहून अधिक (जवळपास 6%) भारतीय परदेशात वास्तव्य करीत आहेत.
7.3 अब्ज जागतिक लोकसंख्येपैकी आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांमध्ये 2015 साली अंदाजे 244 दशलक्ष लोकांचा समावेश आहे. म्हणजेच प्रत्येक 30 व्यक्तींमध्ये 1 व्यक्ती स्थलांतरित होता. ही संख्या जागतिक लोकसंख्येच्या 2010 साली 3.2% आणि 2015 साली 3.3% स्थलांतरित होते. त्यामध्ये 52% पुरुष आहेत, 48% महिला आहेत.
जगभरात प्राथमिक अवस्थेत अर्ध्याअधिक आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांचा जन्म आशिया आणि मुख्य रूपात भारत, चीन आणि अन्य दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये झाला.
ठळक बाबी-
- जागतिक अंदाजानुसार आंतरिक स्थलांतर अधिक प्रचलित आहे आणि 2015 साली अंदाजे 740 दशलक्षहून अधिक लोकांनी आपल्या मूळ देशातच स्थलांतर केलेले आहे.
- गेल्या साडेचार दशकाच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांची संख्या वाढली आहे. 1990 दशकाच्या प्रारंभी मूळ देशातच जन्मलेल्या स्थलांतरितांची संख्या जवळपास 100 दशलक्ष होती तर हीच संख्या 2015 साली एकूण 244 दशलक्ष इतकी अंदाजित होती.
- 2015 साली बहुतेक आंतरराष्ट्रीय स्थलांतरित (सुमारे 72%) कामकरी (20 ते 64 वर्षे) वयोगटातील होते. 20 पेक्षा कमी वय असलेल्यांच्या बाबतीत सन 2000 आणि सन 2015 या काळात किंचित घट (17% ते 15%) झालेली आहे. तर 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटात ही संख्या स्थिर (जवळपास 12%) होती.
- 2015 साली युरोप आणि आशियामध्ये प्रत्येकी 75 दशलक्ष (62%) स्थलांतरित होते. त्यानंतर उत्तर अमेरिका (54 दशलक्ष, 22%), आफ्रिका (9%), लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन (4%) आणि ओशोनिया (3%) यांचा क्रमांक लागतो.
- प्रत्येक क्षेत्रातल्या लोकसंख्येच्या आकाराच्या तुलनेत 2015 साली आंतरराष्ट्रीय स्थलांतरित लोकांच्या बाबतीत ओशोनिया (एकूण लोकसंख्येच्या 21%), उत्तर अमेरिका (15%) आणि युरोप (10%) यामध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय स्थलांतरित होते. तर आशिया आणि आफ्रिका (प्रत्येकी 1.7%) आणि लॅटिन अमेरिका (1.5%) यामध्ये तुलनेने कमी होते. मात्र, आशियात सन 2000 आणि सन 2015 या दरम्यानच्या काळात निवासी स्थलांतरित लोकसंख्येत 50% पेक्षा जास्त (जवळपास 25 दशलक्ष) वाढ होती.
- अमेरिका 1970 सालापासून आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांसाठी मुख्य गंतव्यस्थान आहे. तेव्हापासून देशामध्ये वास्तव्यास असलेली परदेशी जन्मलेल्या लोकांची संख्या ही जवळपास चौपट झाली आहे, म्हणजेच 1970 साली 12 दशलक्ष तर 2015 साली 46.6 दशलक्ष इतकी आहे. त्यानंतर द्वितीय स्थानी 2015 साली 12 दशलक्षासह जर्मनीचा क्रमांक लागतो.
- 2015 साली जगभरातील सर्व आंतरराष्ट्रीय स्थलांतरित लोकांच्या जवळजवळ निम्मे लोक आशिया खंडात जन्माला आलेत, त्यामध्ये मुख्यतः भारतापासून (सर्वाधिक) आलेले आणि त्यानंतर चीन आणि अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तान यासारख्या इतर दक्षिण आशियाई देशातून आलेल्यांचा समावेश आहे. मेक्सिको हे मूळचे दुसरे सर्वात मोठे राष्ट्र होते, त्यापाठोपाठ युरोपमधील अनेक देशांचा क्रमांक लागतो.
- देशांच्या उत्पन्नाच्या गटानुसार, 2015 साली आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांमध्ये जवळजवळ दोन तृतीयांश (सुमारे 157 दशलक्ष) उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वास्तव्यास आहेत. तुलनेने मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये (एक तृतीयांश) 77 दशलक्ष आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांत 9 दशलक्ष होते.
- 2016 साली जगभरात 7,927 स्थलांतरित मरण पावलेत किंवा बेपत्ता झालेत, जे की 2015 सालच्या तुलनेत 26% अधिक होते.
- स्थलांतरित कामगारांमध्ये, 2013 च्या आकडेवारीवर आधारित स्थलांतरित कामगारांची संख्या अंदाजे 150.3 दशलक्ष होती. 2013 साली उच्च-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सर्वाधिक स्थलांतरित कामगार (अंदाजे 112.3 दशलक्ष / 75%) होते. तर 34.4 दशलक्ष (23%) स्थलांतरित कामगार मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आणि फक्त 2% कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होते.
- परदेशातून पाठवविलेल्या पैश्याला प्राप्त करणार्या देशांच्या बाबतीत 2016 साली भारत, चीन, फिलीपीन्स, मेक्सिको आणि पाकिस्तान (उतरत्या क्रमाने) हे देश शीर्ष स्थानी होते. चीन आणि भारत या दोन्ही देशांनी प्रत्येकी USD 60 अब्ज हून अधिक प्राप्ती केली होती.
- 2016 साली सलग तिसर्या वर्षात टर्की जगात 2.9 दशलक्षसह सर्वाधिक निर्वासितांचे घर बनलेला आहे, प्रामुख्याने सिरियातून (2.8 दशलक्ष) आलेले. त्यानंतर पाकिस्तान आणि इराण यांचा क्रमांक लागतो.
No comments:
Post a Comment