Views
राज कपूर
जीवन
राज कपूर हे हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते. जून २ १९८८ रोजी त्यांचे निधन झाले. राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि भाऊ शम्मी कपूर व शशी कपूर हेही चित्रपट अभिनेते होते.
राज कपूर यांना इ.स.१९८७ मेध्ये दादा साहेब फाळके पुरस्कार प्रदान केला गेला.
चित्रपट निर्मिती प्रशिक्षक्षण संस्था[स्रोत संपादित करा]
राज कपूर यांच्या पुणे जिल्ह्यातील राजबाग (लोणी काळभोर) येथील बंगल्यामध्ये राज कपूर यांचे स्मारक आहे. तेथेच पुण्याची माईर्स एमआयटी ही शिक्षणसंस्था चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण देणारी एक संस्था स्थापन करीत आहे. या संस्थेत दिग्दर्शन छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, व संकलन या विषयांचा तीन वर्षांचा, आणि पटकथा लेखन व कला दिग्दर्शन या विषयांचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम असणार आहे. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांच्या निर्मितीचाही एक वर्षाचा अभ्यासक्रम तेथे असेल.
No comments:
Post a Comment